Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 03, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Menu Combinations » Archive through May 03, 2006 « Previous Next »

Arch
Thursday, April 27, 2006 - 8:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, हिरव्या सफ़रचंदाच रायत कस करतेस ग?

सावनी

Ninavi
Thursday, April 27, 2006 - 8:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

द्राक्ष, सफरचंदाच्या / पेअरच्या फोडी, संत्र्याच्या फोडी, मेलन्स च्या फोडी चाट मसाल्याबरोबर मिक्स करून चिल्ड छान वाटतात.

Savani
Thursday, April 27, 2006 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं students असतील तर जरा casual मेनु ठेव. म्हण्जे वडापाव, मिसळ, दही वडे, पाव भाजी असले चट्पटीत चौपाटी प्रकार आवडतात सगळ्याना. आणि नेहमीच्या साग्रसंगीत जेवणापेक्षा जरा वेगळं.

Savani
Thursday, April 27, 2006 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि चिकनचा काहीतरी appetizer मधला प्रकार कर.

Priya
Thursday, April 27, 2006 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, हिरव्या सफरचंदाचे रायते
इथे लिहीले आहे

Maitri
Thursday, April 27, 2006 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे १२ १३ जण जेवायला येणार आहेत आणि सगळे जाॅब वाले आहेत. काहीतरी मेनु सुचवाल का? व्हेज हवय सगळ.
मराठी मेनु हवाय.
[दह्यातली काकडी काय आहे?]


Mrinmayee
Thursday, April 27, 2006 - 10:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, कुणाचे आई-वडिल पण येणार आहेत म्हणून इतका साज्रसंगीत मेन्यु ठेवलाहेस का? (बर्‍याच आई-बाबा पिढितल्या लोकांना चटपटित पेक्षा सरळसोट पदार्थ आवडतात)! पालकाचं चरमरित फोडणी घातलेलं वरण अगदीच साधं वाटेल का? पटकन होणारा आणखी एक पदार्थ म्हणजे बेबी पोटेटोज आणि मटर चा रस्सा. (बटाटे उकडून लाल असतील तर साल काढायची गरज नाही, आणि फ़्रोझन मटर. सुकं खोबरं, हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर, लवंग आणि दालचिनिचं वाटण तेलात बारिक चिरलेला कांदा घालून परतायचं. हळद आणि लाल तिखट घालायचं नाही. छान परतल्यावर त्यात बटाटे, आवडत असल्यास तेलात वेगळे परतून, खरपूस करून घेतलेले आणि मटर घालायचे. थोड पाणी घालून उकळी आली की लिंबाचा रस घालायचा. हा हिरवा रस्सा छान लागतो नान बरोबर).

Prady
Friday, April 28, 2006 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Mrinmayee. छान आहे रेसेपी. अगं बरोबर ओळखलंस. आई वडील आहेत म्हणून थोडं साग्रसंगीत.

Lalu
Friday, April 28, 2006 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेवायला येणारं पब्लिक कोण आहे याचा आणि त्यांच्या आवडीनिवडीचा विचार केला म्हणजे ५०% काम झालं. :-). काही वेळा occasion ला पण महत्व येतं. प्राडी, तू तसा विचार करते आहेस ते बरोबरच आहे. नाहीतर मस्त तळले मासे आणि कोलंबीचे कालवण करायचे आणि पाहुणे कोण, तर प्रिया आणि दिनेश! :-) ~d

या student लोकाना घरचं, जे बाहेर restaurant मधे मिळत नाही ते किंवा सावनीने म्हटल्याप्रमाणे चटपटीत आवडतं. मालवणी चिकन हा प्रकार त्यांना नक्कीच आवडेल. तन्दुरी बाहेर खाल्ली जाते, पण त्यान्ची ती फर्माईश असेल तर भाग वेगळा. नान तू विकत आणणार आहेस असं समजते. तुला घरी चपात्या करायला जमत असेल तर बघ. हल्ली एवढे अप्रूप राहिले की नाही माहित नाही पण मागे हे student लोक चपत्यावर तुटून पडायचे. आता बाहेर पण मिळायला लागल्या आहेत म्हणा. तुझ्या इथे कोणी घरगुती करुन देत असतील तर आणू शकतेस. नसेल तर साधे नान ठेव. गार्लिक नान हे कमी मसालेदार गोष्टीबरोबर चांगले जातात. बाकी लोकानी म्हटल्याप्रमाणे एक व्हेज डिश ठेवता येईल आणि appetizers पाहिजेतच.


Seema_
Friday, April 28, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुकानात ज्या ताज्या चपात्या विकत मिळतात त्या कोण करुन देतात ती चौकशी करुन पहा दुकानदाराकडे. प्रत्यक्ष जावुन order देवुन चपाती करुन घेता येतात निदान आमच्या इथे तरी .
अगदी छोटे बटाटेवडे किंवा , कोबीचे वडे किंवा साबुदाण्याचे वडे ठेवता येईल snack म्हणुण .
मैत्री दह्यातील काकडी म्हणजे काकडीची कोशिंबीर .


Dineshvs
Friday, April 28, 2006 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखादे ताजे लोणचे, वा चटणी हमखास आवडीने खाल्ली जाते.
लालु आता कधी बोलावलस ना तर वाढायच्या आधी, ताटाचा पण वास घेऊन बघणार मी आणि प्रिया.


Savani
Friday, April 28, 2006 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्री, श्यामली ने सांगितल्याप्रमाणे भरीत किंवा भरली वांगी, ठेचा, असे तिखट काहीतरी किंवा मग अगदी कार्यात असतो तसा साग्रसंगीत मेनु ठरव. पण सन्ध्याकाळी येणार असतील तर मग तसा नको. appetizer म्हणुन साबुदाणे वडे किंवा कोथिन्बीर वडी असं काहीतरी बघ. भाज्यांमधे फ़्लॉवर बटाटा रस्सा, पालकाची ताकातली भाजी. आणि भातामधे मसाले भात किंवा तोंडली भात. हिरवी चटणी, खमंग काकडी
गोड म्हणून कसली तरी खीर बघ.
मी आपले नुस्ते पदार्थ सांगीतले. तू बघ कसं combination करायचे:-)


Maitri
Friday, April 28, 2006 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी,आर्च,शामली
ख़मंग काकडी, ताकातली भाजी, पोळ्या, मसाले भात,ख़ीर[शेवयाची] असं करू का?


Maitreyee
Friday, April 28, 2006 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खमन्ग ककडी आणि ताकातली भाजी जवळच्या चवीचे आहे, दोन्ही दह्यातले. आणि त्याबरोबर खीर तेवढी suit नाही होणार गं! ताकातल्या भाजी पेक्षा भरली वांगी किन्वा मटार बटाट रस्सा, मटार उसळ असे काही केलेस तर बाकी सगळे छान वाटेल.

Arch
Saturday, April 29, 2006 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, अग खमंग काकडीत दही नसत. पण तुझ बरोबर आहे दोन्हीत दाण्याचा कूट असतो.

Punyanagarikar
Wednesday, May 03, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

३० ते ३५ लोकांना जेवायला बोलावायचं आहे. menu काय ठेवावा काही suggestions ?

menu veg हवा आहे, आणि गोड गुलाब जाम ठरले आहेत


Lalu
Wednesday, May 03, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरेशा माहिती अभावी काही सान्गता येत नाही.
कधी, कशासाठी, कोण लोक, किती कष्ट करायाची तयारी आहे हे सान्गावे. ~d
तुला ही सगळी माहिती आहे त्यावरुन तुझ्या डोक्यात काय आहे ते आधी लिही. मग बाकीचे लोक सुचवतील. (फेरफार करतील किंवा पूर्ण मेनू बदलतील. ~d :-))


Ana
Wednesday, May 03, 2006 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PN काय शुर आहेस ग एतक्या लोकांच घरी बनवणार आहेस!.

Mepunekar
Wednesday, May 03, 2006 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mazyakade 7,8 jani chaha, snacks sathi yenar ahet. Teva chaha barobar veg snacks kay thevta yeil? Jara vegla prakar pan far time consuming nako ani hamkhas n bighdnara hava. Pls suchva.

Sas
Thursday, May 04, 2006 - 1:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PN
३०-३५ लोकांसाठि,
राजमा / छोले , मिक्स व्हेज, बटाटा ड्राय भाजि,
जिरे राईस, दाल फ्राय, सलाद/रायता ;सोबत नान/पुरि/
साधा पराठा (मि गेल्या शुक्रवारि केलेल)OR
पावभाजि एकदम सोप काम भाजि करा व पाव विकतचे

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators