|
Savani
| |
| Thursday, April 20, 2006 - 8:35 pm: |
| 
|
हो, हो आर्च. तुझ्याच सगळ्या रेसिपीज
|
Arch
| |
| Thursday, April 20, 2006 - 8:39 pm: |
| 
|
हो, हो आर्च. तुझ्याच सगळ्या रेसिपीज >> म्हणजे जोरदार हळदिकुंकू होणार आणि जास्त वेळ न लागता 
|
Lalu
| |
| Friday, April 21, 2006 - 4:04 pm: |
| 
|
किती गोंधळ . चैत्रागौरीच्या हळदीकुंकवाला कैरीची डाळ (म्हणजेच आंबेडाळ) करतात ना? वाटली डाळ (मोकळं तिखट) नव्हे, ती गणपती विसर्जनानंतर देतात. आणि कैरीची ' वाटली' डाळ हा काय प्रकार आहे? बरं सावनी, जे काय असेल ते खायला येत आहे.
|
Ninavi
| |
| Friday, April 21, 2006 - 4:18 pm: |
| 
|
आणि आलेल्या लोकांना पण सांग आर्चच्या रेसिपीज आहेत हे. म्हणजे तेही निमूटपणे कौतूक करतील. 
|
सावनी, ईतका बढिया मेनू ठरवायचा, आमच्या तोंडाला पाणी सुटेपर्यंत त्याची चर्चा करायची, आमंत्रणदेखिल करायचं, पण कुठे राहतो याचा पत्ता नाही लागु द्यायचा हे काही बरं नव्हे. लालू, गोंधळाशिवाय समारंभ केला तर त्यात काय मजा?
|
Dineshvs
| |
| Friday, April 21, 2006 - 4:36 pm: |
| 
|
Arch आणि सगळ्या कोकणप्रेमींसाठी, आता ईंस्टंट सोलकढी बाजारात आलीय. छान चव आहे. पन्ह्याची पाकिटे पण मिळायला लागलीत. तुम्ही मागणी केलीत तर जवळचे सुपरमार्केट ऊपलब्ध करुन देईल.
|
आर्च, जर apple sauce चं पन्ह चांगलं होत असेल तर कैरी न घातलेल्या कैरीच्या डाळीत ही लिंबाऐवजी apple sauce चांगला लागेल का? म्हणजे थोडा करूनच बघतो पण कुणाला अनुभव आहे का?
|
Maitreyee
| |
| Saturday, April 22, 2006 - 4:43 am: |
| 
|
अमेय अरे खरच म्हणतोयस का गंमत करतोयस नाही रे ऍपल सॉस गोड असतो!
|
oh मला वाटलं apple sauce अच कैरी सारखा लागतो... उद्या शेजार्यांना आमंत्रण आहे डाळ पन्ह्याचं
|
निनावी, मैत्रेयी, आर्च, सीमा... apple sauce rocks... मेहमान लोकांना एकदम आवडलं पन्ह आणि विचारलं कैर्या कुठून आणल्या btw मला कैर्या ही मिळाल्या पण त्या तिखट आणि मीठ लावून नुसत्या खाण्यासाठी ठेवल्यात
|
Prady
| |
| Thursday, April 27, 2006 - 7:39 pm: |
| 
|
माझ्या कडे परवा ८ जणं जेवायला आहेत. सध्या तरी पुढील प्रमाणे मेनू आहे. चिकन करी तंदूरी चिकन गार्लिक नान जीरा राइस कांदा, काकडी, टोमॅटो चकत्या करून green salad सोल कढी. गोड्: गाजर हलवा आणी vanilla ice cream please अजून काही तरी सुचवा. वरील combination मधे काही बदल आवश्यक असतील तर ते सुचवा. Thanks in advance .
|
Mrinmayee
| |
| Thursday, April 27, 2006 - 7:53 pm: |
| 
|
प्रज्ञा, एखादी भाजी? पातळ नाही तर कोरडी?
|
Priya
| |
| Thursday, April 27, 2006 - 7:55 pm: |
| 
|
प्रज्ञा, बाकी सगळा मेन्यू उत्तर भारतीय आहे, त्यात सोल कढी तितकीशी बसत नाही असं वाटतं. टोमॅटोचं सूप / सार किंवा दुसरे एखादे सूप असं काही तरी जास्त बरं बाटेल का? आणि कोणतीच भाजी दिसत नाहीये, तर ते सगळ्यांना चालण्यासारखे आहे ना? पाहुणे भारतीय आहेत की परदेशीही आहेत?
|
Prady
| |
| Thursday, April 27, 2006 - 7:57 pm: |
| 
|
गेव्ही वाले आलू गोभी कसे वाटतात.
|
Prady
| |
| Thursday, April 27, 2006 - 7:59 pm: |
| 
|
पाहुणे सगळे मराठी आहेत आणी चिकन मालवणी पद्धतीचं करणार आहे.
|
Mita
| |
| Thursday, April 27, 2006 - 8:03 pm: |
| 
|
prady , मेन्यु चांगला आहे.पण एखादि व्हेज डिश हवी असे नाही वाटत तुला?? हे आपले माझे मत. पालक पनीर or आलु मेथी किंवा अगदि आपली साधी फ़्लोवर्-गाजर्-बटाट्याची सुकी भाजी ठेवलीस तरी चालेल. म्हणजे अगदिच कोणाचा मूड नसेल नोनव्हेजचा(तसे होण्याची शक्यता कमीच ) तर आपली तयारी असलेली बरी,नाही का? आणि चकत्या करुन तंदुरीवर सजव. पण सलाड ऐवजी आपली दहिवाली कोशिंबीर नान बरोबर जाइल.
|
Priya
| |
| Thursday, April 27, 2006 - 8:05 pm: |
| 
|
मग चालेल सोल कढी. बाकी सगळं घरी करणार आहात का? तसे असेल तर इंडियन स्टोअरमधून तयार appetizer आणून नुसते गरम करता येईल - पात्रा, कचोरी, छोटे सामोसे यापैकी काहीतरी. हिरव्या सफरचंदाचं रायतंही छान वाटेल.
|
Savani
| |
| Thursday, April 27, 2006 - 8:07 pm: |
| 
|
प्रज्ञा, चिकन च्या २ डिशेस ठेवण्यापेक्षा एखादी व्हेज का नाही ठेवत? येणारं पब्लिक भारतीय आहे की अमेरिकन? आणि अजून एक काकडी गाजर घालून रायते कर. नुस्त्या चकत्या ठेवण्यापेक्षा. बाकी आर्च, लालू तुला आणखी छान टीप्स देतील.
|
Savani
| |
| Thursday, April 27, 2006 - 8:18 pm: |
| 
|
मी ही तेच म्हणणार होते. प्रज्ञा, ताकाची कढी सुद्धा छान वाटेल. भातावर घेता सुद्धा येईल. आणि सगळे मराठीच असतील तर मग एखादी उसळ सुद्धा चांगली वाटेल. चिकन, मटारची उसळ, हळद घालून कढी, जिरा राईस, ट्माटा कांदा घालून कोशिंबीर. बघ छान रंगसंगती पण दिसेल. आर्च, तुझ्यामुळे मला पण ह्या रंगसंगती प्रकाराचं वेड लागलं आहे.
|
Prady
| |
| Thursday, April 27, 2006 - 8:33 pm: |
| 
|
सावनी अगं हाच सगळा group मागच्या शनिवारी पण भेटला तेव्हा छोले आणी मटार उसळ, दह्यातली काकडी टोमॅटो, कांद्याची कोशिंबीर steam rice असा मेनु होता. so ते repeat नाही करता येणार. तरी खूप छान छान tips येताहेत. भाजीचं मला सुचत नव्हतं काय करू. veg. हवंच गं. flower बटाटा भाजी आणी pineapple रायता कसं वाटेल? students आहेत गं सगळे. आणी त्यातल्या एकाचे आई वडील. आहेत सगळे मराठी. आणी त्यांना सगळ्यांना आमच्या कडे येऊन चिकन करायचय. त्यामुळे चिकन चा मेनू त्यांच्या आवडी प्रमाणे आहे. पण बाकी डावा उजवी बाजू मला सांभाळायला हवी ना.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|