|
Priya
| |
| Thursday, April 27, 2006 - 9:12 pm: |
| 
|
हिरव्या सफरचंदाचे रायते - साहित्य : हिरवे सफरचंद (शक्य तेवढे घट्ट आणि करकरीत बघून घ्यावे), दीड वाटी घट्ट दही, दोन - तीन हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर दोन्ही चवीप्रमाणे कृती : हिरवेगार आणि करकरीत सफरचंद घ्यावे. ते बघून कच्चे वाटले तरी चवीला किंचीतच आंबट असते. बाहेरुन साल तजेलेदार दिसते. आधी एका काचेच्या भांड्यात दही घोटून घ्यावे. त्यात हिरवी मिरची वाटून, मीठ, साखर चवीप्रमाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळे मिसळून तयार ठेवावे. आवडत असेल त्याप्रमाणे मिरची कमीजास्त करावी. आईला मिरची चालत नाही त्यामुळे ती आली होती तेव्हा मी मिरची अजिबात न घालता केले होते, तेही चांगले लागले. दही तयार करुन बाजूला ठेवले की सफरचंद धुवून त्याचे साल काढावे. Apple cutter ने सफरचंदाचे तुकडे करुन घ्यावे. किंवा नुसत्या सुरीने, उभ्या साधारण आठ फोडी करुन घ्याव्या आणि बिया काडून टाकाव्या. प्रत्येक फोडीच्या पुन्हा उभ्या चार फोडी करुन त्या चिराव्या. हे तुकडे खूप बारीक नाही आणि जास्त मोठेही नाहीत, असे असावेत. जसजसे चिरुन होईल तशा फोडी दह्यात मिसळत जाव्या. आधी दही तयार असले की सफरचंदाच्या फोडी रंग बदलायच्या आत दह्यात मिसळता येतात. पटकन होते आणि छान लागते. सफरचंदाची किंचीत आंबट, करकरीत चव छान वाटते. दही घट्ट असले की फारसे पाणीही सुटत नाही.
|
Dineshvs
| |
| Friday, April 28, 2006 - 4:15 pm: |
| 
|
प्रिया, मी खाल्ले आहे, पण भारतात अगदी क्वचितच दिसते हे बाजारात. हे बहुदा जास्त करुन शिजवण्यासाठीच वापरतात. जॅम मधे पण चांगले लागते.
|
Lalu
| |
| Friday, April 28, 2006 - 5:59 pm: |
| 
|
छान आहे रेसिपी. लोणच्याचा मसाला घालून instant लोणचेही चान्गले होते या सफरचंदांचे. थोडा गूळ पण घालायचा. कैरीची तहान सफरचंदावर!
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|