|
भरलं पापलेट साहित्य :- स्वच्छ केलेले अख़्ख़े पापलेट(त्याचा डोळा, पोटतली घाण वैगरे स्वच्छ करुन घ्यावे) ओले खोबरे एक वाटी २-३ लाल सुक्या मिरच्या ५-६ लसुण पाकळ्या, धणे, बडीशेप एक एक चमचा पाव चमचा हळद १ मोठा चमचा तांदळाचे पीठ मसाला २ चमचे ४ ते ५ कोकमं पण कुस्करलेली मीठ चवीनुसार तेल कृती :- स्वच्छा केलेली पापलेट धुवुन घ्यावित. मधुन त्याला चिरुन घ्यावे आणि त्याला मीठ, हळद आणि मसाला लावुन ठेवावे. ओले खोबरे, लाल मिरच्या, धणे, बडीशेप, लसुन हळद सगळे एकत्र करुन त्याचे मिक्सर मधुन बारिक वाटण करुन घ्यावे(जास्त पातळ करु नये सुकेच ठेवावे). त्याला नंतर हा मसाला लावुन, तसेच त्याला आता स्टफ़ करुन घ्यावे. तांदळाचे पीठ, मसाला आणि कोकमं एकत्र करुन त्याचे स्टफ़ पापलेटला आवरण करावे. फ़्राय पॅनमधे तेल घेउन ते अख़्ख़े पापलेट मंद आचेवर डीप फ़्राय करावे. भरलं पापलेट तयार….
|
Neelu_n
| |
| Wednesday, April 26, 2006 - 10:56 am: |
| 
|
वा रुपाली मस्तच.. हे घ्या रुपालीने केलेले भरलं पापलेट 
|
Kokni
| |
| Wednesday, April 26, 2006 - 11:02 am: |
| 
|
नीलु पापलेट मस्तच हा..... बघुनच पोट भरला.....
|
Pinku
| |
| Wednesday, April 26, 2006 - 2:11 pm: |
| 
|
फोटो बघुन तोन्डाला पाणी सुटले.... पण हे अख़्ख़े पापलेट स्वछ कसे करायचे. इकडच्या चायनिज स्टोर मधुन आणले आहे. मासे स्वछ करायच्या कहि टिप्स असल्या तर please सान्गाना.
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 26, 2006 - 5:01 pm: |
| 
|
पिंकु, सुपरमार्केटवाले हवे तसे कापुन देतात, तिथे सोय नव्हती का ? पापलेटाची शेपटी कापायची, खालचे आणि वरचे पंख कापायचे, कल्ले कापायचे. मग डोळ्यापर्यंत डोके कापायचे. काहि जण डोके खातात. ( पापलटचे ) या माश्याला खवले नसतात, त्यामुळे ते काढायचा त्रास वाचतो. तिथुन पोटाची जागा ऊघडे होते, तिथले सगळे काढुन टाकायचे. कधी कधी त्यात ओव्हरी म्हणजे गाभोळी सापडते, ती घ्यायची. आता याचे साधारण एक सेमीचे तुकडे करायचे हे कालवणात वा तळायला वापरायचे. जर अख्खा करायचा असेल तर त्याला दोन्ही बाजुने नुसत्या चिरा द्यायच्या. अख्खा भरायचा असेल तर त्याला खालच्या बाजुने चिर द्यायची व तिथुन तो साफ करायचा. मग सुरी फिरवुन आणखी जागा करुन घ्यायची. अशी सुरी फिरवताना सुरीने काटे कापायचे नाहीत. मग त्यात सारण भरुन, ऊघडलेली बाजु हवी तर शिवुन घ्यायची.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|