|
Seema_
| |
| Wednesday, March 15, 2006 - 5:45 pm: |
| 
|
मिलिंदा मागच्या जन्मी काय सासु होतास काय रे ? ~D
|
Tanutai
| |
| Wednesday, March 15, 2006 - 7:59 pm: |
| 
|
KitKat thaks for suggestions. mala tondalichya upkarichi kruti dyal ka?
|
Savani
| |
| Wednesday, March 15, 2006 - 11:33 pm: |
| 
|
सीमा, दोन्ही रेसिपीज टाक ना. आर्च अगं व्हेज करणार आहे सगळं. छान मेनू सुचवा सगळ्याजणी.
|
Arch
| |
| Friday, March 17, 2006 - 4:03 am: |
| 
|
सावनी बघ कसा वाटतो हा मेनु. भरली वांगी भरल्या बटाट्यासहीत. म्हणजे कोणाला वांग आवडत नसेल तर ते बटाटा खातील. ओल्या मटारची उसळ. मटार बघून घ्यावे लागतील. जे शिजल्यावर india तल्यासारखे दिसतात गुळगुळीत नाहीत. आमच्या इकडे fresh market मध्ये मिळतात. भरपूर कोथिंबीर, खोबर, लिंबू घालून उसळ कर. मटार नाही मिळाले तर भेंडिची परतून भाजी. त्यातपण सढळ हाताने कोथिंबीर, खोबर घाल. खमंग काकडी, टोमॅटोच सार किंवा मूगाच्या डाळीच जिरे, हिंग, मिरची आणि कोथिंबिरीची फ़ोडणी देऊन वरण. सार केलस तर मसालेभात नाहितर साधा साजूक तुपातला भात. वांग्याच्या भाजीत बटाटा घातला नाहीस तर बटाट्याची मेथी घालून भाजी. सीमाने गोडाच सुचवल आहेच. बघ, लाल, पिवळा, हिरवा सगळे रंग टेबलावर दिसतील. स्वयंपाकाला जास्त वेळ लागणार नाही.
|
Itke khamanga menu vachun tondala paani sutla!!! Ek suggestion..chholyanbarobar zatpat bhature! He padhdhat me internet war bahun keli aani khoop phuglele naahi tari faar chavishta bhature zale: Pillsburry che biscuit rolls ghyave, tyanna jamtil titke paatal latun garam telat talavet. Khuskhushit bhature (equivalent) tayar!!
|
Mita
| |
| Friday, March 17, 2006 - 7:51 pm: |
| 
|
एका family ला जेवायला बोलवले आहे. नवरा मराठि,बायको ख्रिश्चन. त्याना आपले माशाचे जेवण हवे आहे. काहि सुचवा न.. पापलेट फ़्राय, कोलबी खोबरे मसाला,सोलकढी, veggi मटारची उसळ करावी असा विचार करत आहे. starters,rice dish,side,sweet काय करू हा प्रश्न पडला आहे. आणि काहि वेगळा मेन्यु असेल तर तोही सुचवा.
|
Prady
| |
| Friday, March 17, 2006 - 8:40 pm: |
| 
|
मीता स्टार्टर साठी आलू टिक्की आणी डाळवडा कस वाटतय. आलू टिक्की ला बटाट्याच्या लगद्या मधे थोडा पालक घालून पण छान लागत आणी त्याच्या आत कोर्नच्या दाण्याच स्टफ़ीन्ग करायच. छान लागत. कालवण सगळे मसालेदार असल्याने साधा जीरा राइस किन्वा खड्या मसाल्याची फ़ोडणी देऊन भाता मधे मटार, कोर्न चे दाणे आणी बारिक चिरलेल गाजर घालुन साधाच भात छान लगेल. गाजर हलवा आणी वनीला आइसक्रीम गोड. कस वाटतय.
|
Mita
| |
| Friday, March 17, 2006 - 9:25 pm: |
| 
|
प्रद्या, जीरा राईसचा विचार मी पण केला होता. आलु टिक्किची आयडिया चांगली आहे. अजून हवेत गारठा आहे त्यामुळे आइसक्रिम पेक्शा हलवा बरा पडेल. हलवा मराठि डिश आहे का?? आणि माशाच्या जेवणावर जाइल का??
|
Savani
| |
| Friday, March 24, 2006 - 8:10 pm: |
| 
|
आर्च, सीमा, मी ह्या w/E ला घाट घातला आहे जेवणाचा. मेनु असा ठरवला आहे बघा.. बटाटे वडे( स्टार्टर्स), विकतचे snacks including chips for kids चिन्चेची चटणी, भरली वान्गी, मटार उसळ, फ़्लॉवर बटाटा रस्सा, खमंग काकडी, मसालेभात, टमाट्याचे सार, बून्दी रायतं. आणि dessert दुधी हलवा, आईस्क्रीम तुम्हाला सगळ्याना आमंत्रण बरं का! आणि धन्यवाद छान मेनु सुचवल्याबद्दल.
|
Lalu
| |
| Friday, March 24, 2006 - 8:24 pm: |
| 
|
आमास्नी आवताण हाय का नाय? आणि चपाती, पोळ्या, फुलके असलं कायतरी हाय न्हवं? त्ये फ़्लावर बटाट्याच्या रश्श्यात टमाटं घालनार असशिला तर परत टमाट्याच्या साराऐवजी मठ्ठा करा, वान्ग्याबरुबर झ्याक जाईल, कसं? समदंच खमन्ग मसालेदार नगं, एकदोन सपक गोष्टी बर्या त्येच्यात. आनि त्ये बटाटं वडं लई मोटं करु नगा, न्हाईतर त्येनीच प्वाट भरल्याव जेवान जायाचं न्हाई. ~D
|
सावनी, सगळं झालं की ह्या सगळ्या मेनू नी भरलेल्या ताटाचा एक फ़ोटो टाक इकडे...
|
Savani
| |
| Friday, March 24, 2006 - 8:43 pm: |
| 
|
अय्या, खरचं की ग लालू, माझ्या कसं लक्षात आलं नाही ते. मसालेभाताबरोबर मठ्ठा चान्गला लागेल नाही का? मग तसच करते. आणि बटाटे वडे छोटे छोटेच करणार आहे. आणि तुला पण आमंत्रण ग. ये उद्या सन्ध्याकाळी. अमेय, टाकते फोटू नक्की.
|
चाईनीज लंच मेनुला सुट होईल असा गोड पदार्थ सुचवा...यावेळचा पॉट्लॉग चाईनीज स्पेशल आहे.
|
Mrinmayee
| |
| Tuesday, April 11, 2006 - 10:31 pm: |
| 
|
प्राजक्ता, ह्या link वर जा. मून केक (एक चायनीज खासियत) ची सोपी recipe आहे बघ. http://www.dltk-kids.com/world/china/easy_chinese_mooncakes.htm
|
Mrinmayee
| |
| Tuesday, April 11, 2006 - 10:47 pm: |
| 
|
साबुदाणा वडे, ओल्या नारळाची चटणी, आणि शेवयीचा उपमा ह्या sanacks च्या combination ला साजेसं काहीतरी गोड सुचवा नं please !
|
Arch
| |
| Wednesday, April 12, 2006 - 1:28 am: |
| 
|
मृणमयी, सगळ गरम आहे न? मग fruit salad छान राहील.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, April 12, 2006 - 1:47 am: |
| 
|
ये हुई ना बात!!! fruit salad it is!!! Thank you आर्च! ज्यांना बोलवलंय ते आहेत american . आत्तापर्यंत रुमाली वड्यांपासून पिठलं भातापर्यंत सगळ खायला घातलंय त्यांना. आणि मंडळींनी सगळं दाबून खाल्लं आहे अगदी आनंदानी. ह्यावेळी snacks ला बोलवलं आहे.
|
Seema_
| |
| Wednesday, April 12, 2006 - 2:40 pm: |
| 
|
प्राजक्ता honey,noodles with vanila ice cream कर ना . मस्त लागत एकदम . तुमच्या तीथे noodles तयार fry केलेल्या मिळत असतील तर अगदीच fast होईल .
|
Prajaktad
| |
| Wednesday, April 12, 2006 - 5:08 pm: |
| 
|
सीमा!ह्याचि रेसीपी आहे का मायबोलिवर?..दुसर अस कि चायनीज स्पेशल म्हणजे नूडल चि मेन डिश आहेच,शिवाय फ़्राईड राईस, या गोश्टी असतिल..तेव्हा स्विट मधे नुडल रिपिट नको... mango moose नेवु का?
|
Seema_
| |
| Wednesday, April 12, 2006 - 7:45 pm: |
| 
|
अच्छा. या ज्या noodles मी म्हणती आहे त्या crispy noodles आणि थोड्या चपट्या असतात.इथे hg वर नाही दिसली रेसिपी.माझ्याकडे पुस्तक आहे त्यात आहेत chinese dessert .त्यात आहे. असो. mango moose ची idea छान आहे पण ते चायनिज होणार नाही.पण न्यायला हरकत नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|