|
Grihini
| |
| Tuesday, March 21, 2006 - 10:40 pm: |
| 
|
तुप बनवताना आलेला प्रोब्लेम लिहिला आहे फ़क्त. कुणी आहे का जागे.
|
Grihini
| |
| Wednesday, March 22, 2006 - 1:48 am: |
| 
|
मिलिन्दा कळ्ले रे बाबा लोल म्हनजे काय ते.
|
Psg
| |
| Wednesday, March 22, 2006 - 4:57 am: |
| 
|
गृहिणी काय problem आला? बरं आहे रूप अस लिहिल आहेस कि! छान कविताही केली आहेस.. मग prob काय आहे?
|
Grihini
| |
| Wednesday, March 22, 2006 - 3:22 pm: |
| 
|
अग पुनम त्याचा वास कसा येतोय माहितिय? थोडासा केरोसिन सारखा.
|
Psg
| |
| Thursday, March 23, 2006 - 4:28 am: |
| 
|
केरोसिन? अरे बापरे! कॉस्को मधून आणलेल्या बटर चे असे व्हायला नको unsalted butter ना? तूप करताना लागले नाहीये न? का बर अस व्हाव??
|
Maanus
| |
| Thursday, March 23, 2006 - 4:11 pm: |
| 
|
घरचे साजुक तुप दुधावरच्या सायीपासुन बनवतात ना?
|
Savani
| |
| Thursday, March 23, 2006 - 4:21 pm: |
| 
|
माणूस दुधाची साय, सायीचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याचे तूप आले का लक्षात?
|
Maanus
| |
| Thursday, March 23, 2006 - 5:48 pm: |
| 
|
हो पन इथे लोक unsalted butter बद्दल बोलतायत ते काय असते. एके काळी १०० म्हशी पाळायचो... पन हा प्रकार त्यांनी कधीच दिला नाही मला.
|
Junnu
| |
| Thursday, March 23, 2006 - 10:24 pm: |
| 
|
मीठ न घातलेले लोणी. grocery shop मधे मिळत हे. butter/cheese बरोबर ठेवलेल असत.
|
Storvi
| |
| Thursday, March 23, 2006 - 11:55 pm: |
| 
|
>>एके काळी १०० म्हशी पाळायचो... पन हा प्रकार त्यांनी कधीच दिला नाही मला.>>ते गायीच्या दुधाचं असावं बहुदा 
|
Psg
| |
| Friday, March 24, 2006 - 5:03 am: |
| 
|
माणूस, म्हशी salted असो वा unsalted , पण एकदम butter देतात का? दूधच देतात ना? घरचे साजूक तूप म्हणजे घरी केलेले साजूक तूप, विकत आणलेले नाही.. आणि ते करताना येणार्या अडचणी, अनुभव इथे लिहिणे अपेक्शीत आहे! सगळं सविस्तर सांगावे लागते बाबा! ती गृहिणी कुठे गेली पण?
|
Bee
| |
| Friday, March 24, 2006 - 5:39 am: |
| 
|
सावनी, साईपासून दही नाही बनवत तर दुधाला विरजण लावून दही होत. तू लिहिण्यात चूक केली असेल मात्र दही बरोबर करत असशील. थेट साईपासूनही छान तूप होते पण रोज रोज दही तापसून साय गोळा करावी लागते ह्यात. माणूस, बाजारात लोणी मिळते ते घरी तापवून त्याचे जे तूप होते ते साजूक तूप. साजूक म्हणजे चांगले. मी एकदा तूप केले ते चांगले झाले. दुसर्यांदा केले ते फ़सले. कमाल आहे
|
Zakki
| |
| Friday, March 24, 2006 - 2:20 pm: |
| 
|
अरे वा, म्हणजे आता मी fat free दुधापासून घरच्या घरी fat free साजूक तूप, अगदी मीठ विरहित, करू शकतो. माझी recipe तुम्हाला माहीतच आहे, कुठलिही गोष्ट त्या एकाच recipe ने बनते! शिवाय ते fat free असल्याने, पाहुण्यांना द्यायला नको! पुणेकर होतो ना काही वर्षे, म्हणून असले विचार पटकन सुचतात!

|
Maanus
| |
| Friday, March 24, 2006 - 2:43 pm: |
| 
|
थेट साईपासूनही छान तूप होते >>>>> तेच खरे तुप. unsaulted butter वाल्या तुपाची चव माहीत नाही, पन नक्कीच ते सायीच्या तुपासारखे चांगले नसनार. अजुन एक माहीती असावी म्हणुन, गायीच्या दुधाच्या सायीपासुन बवलेले तुप कित्येक वर्ष without preservative टिकते; घरी काहीतरी १० वर्ष जुने तुप पन मी पाहीलेय. अशा तुपाचा औषधी उपयोग पन होतो, कसा ते आठवत नाही कदाचीत मुडी ला माहीत असेल.
|
Moodi
| |
| Friday, March 24, 2006 - 2:51 pm: |
| 
|
बी चुक तु करतोयस. तापवलेल्या दुधाची साय वेगळी काढुन तिला विरजण लावले जाते. दुधाला विरजण लावतात पण त्यातुन लोणी निघायची शक्यता जवळ जवळ १० ते २० टक्केच असते. लोणी हे विरजण लावलेल्या सायीचे दही बनुन मग त्याच्यापासुन निघते. त्याचे मग तुप होते, विरजण लावलेल्या दुधापासुन ना ssssssssssssss ही. बाजारात जे दही खाण्यासाठी मिळते ते साय काढलेल्या दुधाला विरजण लावुन तयार होते.
|
Moodi
| |
| Friday, March 24, 2006 - 2:53 pm: |
| 
|
माणुस या तुपाचे उपयोग मला भरपुर माहीत आहेत पण इथे देणे योग्य नाही. आश्विनीने आयुर्वेदाच्याच एका बीबीवर सगळ्या गोष्टींची अतिशय सुंदर माहिती दिलीय बघ. तो बीबी जर बंद पडला असेल तर मग तिथले आधी वाचुन दुसरीकडे मी नवीन माहिती देईन. 
|
Chioo
| |
| Friday, March 24, 2006 - 3:00 pm: |
| 
|
Nusatya sayipasunahi toop banavata yete. Virjan lavayachi garaj nasate. Bangali lok asech toop banavatat aani te aapalya virajan lavun kelelya toopasarakhech lagate. te virajan lavane, tak karane, loni kadhane ya sagalya goshtina poorn fata detat. Kunala exact kruti havi asel tar mi mazya sasula vicharun sangen.
|
Dineshvs
| |
| Friday, March 24, 2006 - 4:00 pm: |
| 
|
विरजण लावुन, ताक घुसळुन काढलेले तुपच आयुर्वेदाला अपेक्षित आहे. सायीचे तुप होते हे खरे, पण चवीचा फरक जाणवतोच.
|
Savani
| |
| Friday, March 24, 2006 - 4:26 pm: |
| 
|
बी, मूडी ने सान्गितल्याप्रमाणे सायीचे दही लावून त्याचे नन्तर घुसळून लोणी काढून तूप करतात. आणि आपल्याकडे हे असे एक गाणे आहे जे लहान मुलाना मजेत शिकवतात. त्याची सुरुवात दत्त, दत्त, दत्ताची गाय, गायीचं दुध.. अशी आहे. असो. आणि मला आठवतं लहान असताना आजी नेहमी ओरडायची सायीच्या दह्याला हात लावला की. कारण ते खास बाजूला ठेवायचे तूप करण्यासाठी. आणि आम्हा लहान मुलाना ते घट्ट दहीच जास्त आवडायचे.
|
Maanus
| |
| Friday, March 24, 2006 - 4:51 pm: |
| 
|
मला माहीत असलेले तुप बनवायचे दोन प्रकार. प्रकार १. - रोज पातेल्यात तापवलेल्या दुधावर जी साय येते ती एका भांड्यात काढुन फ्रिज मधे ठेवा. - महीन्या नंतर खुप साय साठली की त्याला विरजण लावुन दही बनवायचे. - दही तयार झाल्यावर, ते लाकडाच्या रवी ने घुसळुन त्यातले पाणी व लोणी separate करा. - हे लोणी गॅसवर मंद आचेवर तापायला ठेवायचे की मग मग साधारण तासाभराणे त्याचे तुप बनते. - लोणी तापवताना त्यात एक किंवा दोन तुळशीची पाने पन टाकतात. त्याने अजुन चांगली चव येते. ही process एक महीन्याची आहे, त्यामुळे तेवढा patience असलेल्या व्यक्तीनेच हे करावे. शेवटी सब्र का फल मिठा. आमाच्याकडे direct 8 fat चे पाणी न घातलेले दुध असायचे त्यामुळे दर १५ दिवसाला उत्तम तुप बनायचे. प्रकार २. दुध उप्तादक हे करतात, - म्हशीचे दुध 8-9 fat चे असते, ईतक्या fat वाले दुध पचवणे अशक्य असते. म्हणुन दुध उप्तादक त्यातुन २ fat काढुन घेतात व साधारण 5.5 / 6% fat वाले दुध बाजारत विकतात. - ही काढलेली 2% fat ला विरजण लावुन त्याचे तुप बनवले जाते. - बाजारामधे हे असले तुप विकतत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|