|
Lalitas
| |
| Friday, July 01, 2005 - 6:06 am: |
| 
|
रायवळ आंब्याचें सासव रायवळ आंबे धुऊन सोलून घ्यावे, सालीत थोडें पाणी घालून त्या कुस्करून त्याच रस काढावा व तो आंब्यांत घालावा. एक डझन आंबे असतील तर एक लहान नारळ खवून घ्यावा. त्याचं लाल मिरची घालून वाटण करावं. वाटणांत शेवटी चवीपुरतें मीठ व गूळ घालून मिक्सर फिरवावा. अर्धा चमचा मोहरी सुकीच तव्यावर वा फोडणीच्या पळीत भाजावी. पूर्वी वाटणांत ही मोहरी शेवटी पाट्यावर वाटून लावत असत. पण मिक्सरमधे ओल्या वाटणांत ही मोहरी वाटली जात नाही म्हणून मी भाजलेल्या मोहरीची खलबत्यांत वेगळी पूड करून वापरते (ड्राय मिक्सरमधे पूड करता येते). वाटण व मोहरीची पूड आंब्यांत घालून नीट मिसळावें, मीठ, गूळ आंब्याच्या गोडीप्रमाणें ऍडजस्ट करावें
|
ह्याला 'मोहोरी चढवणे' अस म्हणतात ना? साधारण अमेरिकेतल्या horseradish सारखी नाकात फ़सफ़सायला पाहिजे.. पुन्हा धन्यवाद ग ललिता, खुप दिवस ही कृती शोधत होते...
|
Ninavi
| |
| Friday, July 01, 2005 - 1:56 pm: |
| 
|
मोहरी कोरडी दळून 'चढते' का? नाही मला वाटतं. शिवाय लाल मोहरी 'चढते', काळी नाही.
|
नाही ग निनावी, माझ्या सांगण्याचा उद्देश असा की ती मोहोरी दळून फ़ेटायची असते.. मग ती चढते.. लाल की काळी ते मात्र माहित नाही..
|
Lalitas
| |
| Friday, July 22, 2005 - 5:57 am: |
| 
|
सासवांत मोहरी चढवत नाहीत, ती स्वादासाठी वापरतात. मोहरी कोरडी भाजून दळली तर मला वाटत नाही ती चढेल.
|
ललिता, सासवात मोहोरी चढवतात की नाही मला सुद्धा माहित नाही. मला त्याची चव आवडते म्हणुन मी सासवात चढवलेली मोहोरी घालते.. मोहोरी ऐवजी horseradish ची पेस्ट वापरली तर काही फ़रक पडतो का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|