|
Lalitas
| |
| Wednesday, February 02, 2005 - 8:13 am: |
| 
|
उडीदमेथी २ टेबलस्पून उडीद डाळ मंद आंचेवर कोरडीच गुलाबी होईपर्यंत तव्यावर परतावी. नंतर थोडसं तेल घालून लाल होईपर्यंत परतावी. त्यांत पांच - सहा धन्याचे व काळ्या मिर्याचे दाणे, सुक्या मिरच्या (तिखट कमीजास्त आवडीप्रमाणे) परताव्या. शेवटी सपाट टीस्पून मेथीचे दाणे घालून परतावे व तवा उतरवून त्यांतच गार होऊ द्यावे. ह्या मसाल्याची मिक्सरमधे सुकी पावडर करून घ्यावी. अर्ध्या नारळाचं वेगळं वाटण करावं. दोन आंबट कैर्यांच्या साल काढून मोठ्या फोडी करून घ्याव्या. तेलांत मोहरी, कढीपत्ता, हिंग व हळद घालून फोडणी करावी, त्यांत कैर्यांचे तुकडे, उडीदमेथीची वाटलेली सुकी पावडर, पाणी, मीठ व गूळ घालून कैर्या शिजेपर्यंत उकळावें. शेवटी खोबर्याचं वाटण घालून पांच मिनिटें मंद उकळत ठेवावें. (दाटपणा जसा आवडेल त्याप्रमाणांत पाणी घालावे, पण उडीदमेथी नंतर उडीदाच्या पावडरीने दाट होतेच.) मीठ, गुळ व कैरीच्या आंबटपणाचे रसायन जमले की उडीदमेथी चांगली होते. आदल्या दिवशीची शिळी व मुरललेली उडिदमेथी जास्त चविष्ट लागते.
|
Mbhure
| |
| Wednesday, February 02, 2005 - 5:08 pm: |
| 
|
]DdmaoqaIcaa Kra Aasvaad GaoNyaasaazI kOrI ikMvaa XaoMgaapoxaa %yaat baaMgaDa saÜDavaa.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|