Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
खतखतं

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » मिश्र भाज्या » खतखतं « Previous Next »

Lalitas
Thursday, December 30, 2004 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खतखतं

खतखत्यांत अरवी (मुंडल्या), लाल भोपळा, शिराळी, कच्ची पपई, कच्ची केळी, भेंडी, पांढरा मुळा, शेवग्याच्या शेंगा ह्या भाज्या वापरतात. प्रत्येक घरांत आवडीप्रमाणे वेगवेगळी
combinations असतात.
अरवी घालायची असल्यास सोलून कुकरमधून पाणी घातल्याशिवाय उकडून घ्यावी आणि मग भाजीत घालावी. अरवी जर पाणी घालून उकडल्या तर भाजीला भेंडीसारखा चिकटपणा येतो.
भाज्यांचे मोठे तुकडे चिरून घ्यावे. अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धा तास भिजवून ठेवावी.
एक किलो भाजीला एक मोठा नारळ खवून घ्यावा. दहा बारा त्रिफळं पाव वाटी पाण्यांत भिजवून ठेवावी. नारळ व सुक्या मिरच्यांचं (जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणांत मिरच्या घ्याव्या) वाटण तयार करून घ्यावं
थोड्या पाण्यांत तुरीची डाळ शिजवत लावावी. डाळ अर्धी शिजल्यावर त्यांत पपईच्या फोडी घालून एक वाफ आणावी नंतर शिराळी, भेंडी, कच्ची केळी वगैरे घालून एक दणदणीत वाफ येऊ द्यावी. मग त्यांत आमसुलं, खोबर्‍याचं वाटण, मीठ, गूळ, हळद व त्रिफळं जरा ठेचून भिजवलेल्या पाण्यासकट घालावी. खतखत्यांत जितका रस हवा असेल तितकं पाणी घालून ढवळून शिजत ठेवावे. मधून मधून ढवळत राहावे. सर्व भाज्या पूर्ण शिजू द्याव्या. मी मंद आचेवर कमीत कमी पंधरा मिनिटं खतखतं शिजवते. त्यामुळे डाळ नीट शिजवली जाते, सर्व भाज्यांचा अर्क त्यांत उतरतो व खतखतं छान मुरतं.

टीप वाटण करतांना अगदी थोडीशी चिंच घालावी. आमसुलं वरून घालायची असल्याने चिंच चिमटीभरच घ्यावी. फक्त आमसुलं घातली तरीही चालतं, पण चिंच घातल्याने खतखतं चविष्ट होतं.
बांगड्याचं त्रिफळाचं सुकं किंवा आमटी करतांना आमसुलांबरोबर चिंच जरूर घालावी.


Amayach
Wednesday, April 12, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिराळी म्हणजे काय आहे?? कुठ्ली भाजी आहे की नोन वेज आहे??

Dineshvs
Wednesday, April 12, 2006 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिराळी म्हणजे दोडकी. याला ईंग्लिशमधे रिज गार्ड म्हणतात. साधारण फुटभर लांब हिरवी भाजी असते आणि वरती ठळक शिरा असतात.
वेलाला लागते म्हणजे नॉन व्हेज नसावी बहुदा !


Nalini
Thursday, April 13, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते दिसायला असे असतात.


नेमस्तक ही पोस्ट काही दिवसांनी ऊडवू शकता.


Amayach
Thursday, April 13, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलीनी आणी दिनेश धन्यवाद!! आणखीन एक शन्का आहे तिरफ़ळ म्हणजे काय प्रकार आहे??

Moodi
Thursday, April 13, 2006 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिरफळे ही कोकण गोवा या बाजूला मासे अन इतर कालवणाकरता वापरली जातात. याचे बी टाकुन फक्त वरचे सालच वापरले जाते कालवणात. अगदी खुपच छोट्या बोरासारखे फळ दिसते हे. बी कडू असते ते वापरु नये.

Dineshvs
Thursday, April 13, 2006 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिरफ़ळं हा खास गोवा आणि कारवारमधे वापरला जाणारा मसाला आहे. साधारण अर्धा सेमी व्यासाचे गोल तपकिरी काळसर रंगाचे हे फ़ळ असते. झाड कडीपत्त्याच्या झाडासारखेच दिसते.
हे फ़ळ गुच्छाने लागते, व तसेच बाजारात विकायला येते. सुकले कि हे फळ ऊकलते व आतली काळी चमकदार बी, दिसु लागते, ही बी अखाद्य असते, त्यामुळे ती काढुन टाकावी लागते.
तिरफळाला, किंचीत झणझणीत व किंचीत तुरट चव असते. पण त्याला अनोखा स्वाद असतो. मासे, खास करुन बांगडे वैगरे शिजवताना हे वापरतात. त्यामुळे एक सुंदर आणि भुक चाळवणारा वास येतो.
गोवा पद्धतीचे जे वाटप असते, म्हणजे ओले खोबरे, धणे, लाल मिरच्या व चिंच, याबरोबर तिरफळाचा स्वाद जास्त खुलतो.
शाकाहारी पदार्थात खतखते व कटाची आमटी यामधे चांगले लागते.
हे फ़ोडणीत घालत नाहीत तर कालवणात तसेच शिजत घालतात. हे वाटणातहि घेत नाहीत. पण कालवणातील शिजलेले तिरफळ चोखुन खायला फार छान लागते.
या तिरफळाचे काहि औषधी गुणधर्म पण आहेत, व त्याचे चुर्ण करुन देतात.
पण हे चुर्ण आणि त्रिफळा चुर्ण हे पुर्णपणे वेगळे.
ते चुर्ण तीन फळांचे म्हणजे, आवळा, हिरडा आणि बेहडा यांचे केलेले असते. ते पोटात घेतात, केस व चेहरा धुण्यासाठीहि त्याचा ऊपयोग होतो.


Amayach
Thursday, April 13, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूदि, दिनेश धन्यवाद परत एकदा पण आपण तिरफ़ळाशिवाय खतखत करु शकणार नाही का??? रेसीपी वाचुन करुन पहायची इछा होते आहे म्हणुन एव्हढे प्रश्न तुम्हल?

Dineshvs
Thursday, April 13, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो करता येईल कि, पण जर तिरफळाचे खतखते खाल्लेत तर मात्र, अस्सल गोवेकरासारखे त्या वासासाठी जीव टाकणार.

Sunidhee
Thursday, August 23, 2007 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रकार छान आहे. दिनेश,ललिता तिरफळ ला अमेरिकेत काय नावाने शोधु कारण ते दिसते कसे हे पण माहीत नाही. ?

Vinaydesai
Thursday, August 23, 2007 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिरफळ अमेरिकेत अजून आलेले दिसत नाही.. चोरून आणावे लागते भारतातून येताना...



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators