|
अगदी झटपट होणारा प्रकार आहे. सुके बोंबिल तव्यावर किंवा आगिवर भाजुन घ्यावेत. छोटे तुकडे करुन थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवावेत. कांदा बारिक चिरुन घ्यावा. भिजत ठेवलेले बोंबिल थोडे चेचुन घ्यायचे. तेल गरम करुन लसुण आणि कांदा परतुन घेतल्या नंतर त्यात लाल मिरचि चि पुड, थोडा गरम मसाला आणि बोंबिल घालुन परत एकदा परतुन घ्यावेत. नंतर थोडस पाणि आणि कोकम किंवा व्हिनेगर आणि चवि पुरत मिठ टाकावे.(सुके बोंबिल आगोदरच खारवलेले असतात हे ध्यानात असुद्या.) वाफ़ेवर २-३ मिनिटे ठेवावे. हि चटणि चपाति बरोबर एकदम छान लागते. किंवा कशाबरोबर हि चालुन जाते उदा. दाळ-भात बरोबर हि
|
पापकृती छान आहे, शुभेच्छा.. -तात्या.
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 22, 2006 - 5:22 am: |
| 
|
बघा बघा, मासे खाणे पाप असते. तात्या दिवे घ्या हो.
|
दिनेश, फक्त कृती पाप असते, मासे खाणे नाही... 
|
Anilbhai
| |
| Tuesday, August 22, 2006 - 2:25 pm: |
| 
|
पाक = पाप 
|
Tonaga
| |
| Wednesday, March 26, 2008 - 2:37 pm: |
| 
|
दिनेश सुकटीची चटणी कशी बनवतात?
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 26, 2008 - 4:16 pm: |
| 
|
सुकटी, म्हणजे जवळा, झिंगे सारखे प्रकार पाखडून घ्यायचे. मग तव्यावर ते भाजुन घ्यायचे. यावेळी तेल तुप वगैरे काहि घालायचे नाही. मग त्यात कच्चा कांदा बारिक कापुन घालायचा. आवडीप्रमणे तिखट घालायचे. लागले तर मीठ घालायचे. वेळ असेल तर त्यात बारिक चिरलेली कैरी, आणि कोथिंबीर घालायची. आणि हौस असेल तर एक निखारा लाल तापवुन घ्यायचा तो चटणीवर ठेवायचा. वरुन थोडे खोबरेल तेल घालायचे. आणि त्यातून धूर यायला लागला की सुकट त्यावर झाकायचे. यात थोडे ओले खोबरेही घालतात. शाकाहारी मंडळीनी हा प्रकार ( कोळसा सोडून ) भाजुन कुस्करलेल्या पापडासह करावा.
|
Manuswini
| |
| Thursday, March 27, 2008 - 4:17 am: |
| 
|
अहाहा, ह्याच्याबरोबर तांदूळाची भाकरी, गावी नेहमी आजी करून द्यायची. हे खावून बरीच वर्षे झाली. ह्यात सुकी मोदकं,जवळा, सुकी करंदी वगैरेचे करु शकतात. दिनेश,तुम्ही मांसाहार करत नाही पण डीटेल मध्ये कसे माहीती non-veg dishes .
|
Dineshvs
| |
| Friday, March 28, 2008 - 2:51 am: |
| 
|
मी मासांहार करत नाही असे नाही, मी खात नाही, पण " करतो, म्हणजे शिजवतो " मित्रमैत्रीणींसाठी. अगदी चार वर्षाचा असल्यापासून मी मासांहार सोडला, पण त्यापुर्वीच्या चवी लक्षात आहेत. ( म्हणून मला कोणी फ़सवू शकत नाहीत. )
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|