|
Dineshvs
| |
| Tuesday, March 28, 2006 - 3:28 pm: |
| 
|
सांडगी मिरच्या पुर्वी आमच्या घरी या मिरच्या फ़क्त तळुन खाल्ल्या जात असत. त्या नीट तळल्या गेल्या नाहीत तर फार तिखट लागत, पण मग मी जे प्रयोग करायला सुरवात केली, त्यातुन या मिरच्यांची चटक लागली. पाव किलो भरायच्या मिरच्या. ( जाड्या बुटक्या कमी तिखट बघुन घ्याव्यात ) घेतल्या तर दोन मोठे चमचे मिरचीच्या लोणच्याचा तयार मसाला घ्यावा. ( तो नसेल तर मोहरी, मेथी, हिंग हळद जरा भाजुन पुड करावी. ) एक वाटी आंबट दहि, दोन चमचे तीळ भाजुन त्याची पुड, एक चमचा धणे जिरे पुड, अर्धा चमचा मीठ, घ्यावे. मिरच्याना ऊभी चिर द्यावी. बाकिचा सगळा मसाला दह्यात कालवुन घ्यावा. हा मसाला मिरच्यात भरावा. हे भरण्यासाठी मेंदीसारखा कोन केला तर सोपे जाते. मग या मिरच्या ताटात पसरुन कडकडीत ऊन्हात वाळवाव्यात. यांचा रंग बदलुन पांढरा व्हायला पाहिजे व देठ खटकन तुटायला पाहिजे. आता हा खटाटोप घरी करायची तशी गरज नाही, कारण आता त्या तयार मिळतातच. दह्यात भिजवलेला साबुदाणा, मीठ व जिरेपुड घालुन पण या मिरच्या भरतात. या ऊपवासाला चालतात. ही. ही. ही. ( बाकिच्यानी चेष्टा करण्या आधीच हसुन घेतोय ) आता याचे ऊपयोग बघु. डाळीच्या आमटीला या फ़ोडणीत कुस्करुन दहिबुत्ती बरोबर तळुन. कटाच्या आमटीच्या फ़ोडणीला. हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी या मिरच्या कुस्करुन केलेली लाल माठाची भाजी फ़ार चवदार लागते. कांदे पोहे करताना या मिरच्या वापरल्या तर छान चव येते. ( फ़क्त रंग पिवळा येत नाही. म्हणुन दाखवताना करु नयेत. ) चणा डाळ व तुरीची डाळ एकत्र करुन त्यात कैरी घालुन ते शिजवुन घ्यावे. मग या मिरच्यांची फ़ोडणी करुन त्यात ते मिश्रण घालावे. गुळ व लाल तिखट घालावे. हळद हिंग शिजतानाच घालावे. तोंडाला चव आणते हि आमटी. ( आत्ताच केलीय )
|
Moodi
| |
| Tuesday, March 28, 2006 - 3:34 pm: |
| 
|
दिनेश.... व्वा!! मस्त. भारतातुन पहिल्यांदा इकडे आणता आल्या नाही म्हणुन आमच्या इथे साऊथॉल, वेंबली अन हाउन्स्लो ही शहरे भटकलो या मिरच्यांकरता. अहो साऊथ इंडीयन्स खुप आहेत ना तिथे, त्यामुळे लगेच मिळाल्या. दहीभाताबरोबर सही लागतात. आता केप्रच्या आणल्यात. 
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|