|
Dineshvs
| |
| Tuesday, March 21, 2006 - 1:51 pm: |
|
|
खाली आणि वर रसगुल्ला आणि मधे खवा या प्रकाराला आईस हलवा, किंवा मलाई सॅंडविच म्हणतात. मलाई बर्फी चे तंत्र जरा जमावे लागते, म्हणुन आधी थोड्या प्रमाणात करुन बघायला हवी. आताहि जरा घाईत आहे, म्हणुन थोडक्यात लिहितो. दोन वाट्या मावा किसुन घ्यावा. थोडावेळ ऊघडा ठेवावा. दीड वाटी साखरेचा पक्का पाक करावा. परत साखरेचे कण दिसायला हवेत, ईतका पक्का पाक हवा. मग त्यात मावा घालुन घोटावे. मंद आचेवर सगळीकडुन बुडबुडे येऊ लागले कि ऊतरुन घोटत रहावे. मग ताटात थापुन वड्या कापाव्यात. बदाम पिस्ते वर्ख आवडीप्रमाणे
|
Deemdu
| |
| Wednesday, March 22, 2006 - 5:35 am: |
|
|
ओह म्हणजे मलई बर्फी मध्ये मलई म्हणजे साय वापरायचीच नसते का? कारण मी चितळ्यांकडुन घेतलेली मलई बर्फी पांढरी स्वच्छ, दाणेदार आणि अगदी मऊ होती, पाक जर इतका घट्ट केला तर बर्फी कडक होणार नाही का?
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 22, 2006 - 11:31 am: |
|
|
बर्फीचा पाक असाच करावा लागतो. पण खवा घातल्यावर मिश्रणाला जरा पाणी सुटते. साखर काळपट नसेल तर बर्फी शुभ्र होणारच. जर पाक काळा वाटला तर त्यात अर्धा कप दुध व थोडे ताक घालावे. त्याने सगळी मळी निघुन येते. हा पाक गाळुन घ्यावा व पुढची कृति करावी. हे सगळे साखर विरघळल्याबरोबर करावे. विकतची बर्फी जरा कच्च्या पाकातली असते. दुकानात फ़्रीजमधे असल्याने ती टिकते, पण बाहेर टिकणार नाही. शिवाय त्याच्या वड्या ठिसुळ असतात. शिवाय खुपदा माव्याबरोबर दुधाचा छाना वापरलेला असतो. त्यामुळे वड्या दाणेदार होतात.
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 22, 2006 - 11:36 am: |
|
|
नुसत्या सायीची पण बर्फी करतात. पुर्ण स्निग्धांश असलेले दुध घेऊन त्यावरची साय ताटात काढुन घ्यावी. वर थोडी पिठीसाखर व जायपत्रीची पुड घालावी. असे चार पाच थर द्यावेत. त्यासाठी दुध वेगवेगळ्या भांड्यात ठेवावे. मग हे ताट फ़्रीजमधे ठेवावे. व वरुन साखर घालुन काहि सेकंद ओव्हनमधे ठेवावे. याना सायीच्या वड्या म्हणतात. मैद्याची पातळ पोळी लाटुन जरा शेकावी व त्यावर सायीचा पापुद्रा ठेवुन त्याची गुंडाळी करावी. ती फ़्रीजमधे ठेवुन घट्ट करावी. मग त्याचे रोल कापुन ते तुपात शॅलो फ़्राय करावेत. त्याना मालनवड्या म्हणतात.
|
हो, साखरेतली मळी काढावी लागते. खरच पाक छान पारदर्शक आणि स्वच्छ होतो अशानं. ताक नसेल घरात तर नुसतं दूध पण चालतं कपभर. मी कोणताही पाकातला पदार्थ करताना मळी काढतेच. रव्याचे लाडू असोत, गुलाबजाम असोत किंवा साखरांबा.
|
Moodi
| |
| Thursday, May 11, 2006 - 12:09 pm: |
|
|
सायीची करंजी. साहित्य : दाट घट्ट साय येणारे दुध, बदाम पिस्ते अन चारोळी किंवा काजु यांचा भरडसर चुरा, थोडे वेलेदोडे पुड अन साखर. कृती : दुध एकदा उकळुन ते घरातील तापमानपर्यंत होईल असे गार करुन वेगवेगळ्या ५ ते ६ वाट्यांमध्ये ओतावे अन फ्रिजमध्ये ठेवावे. दुपारपर्यंत त्या वाट्यांमध्ये त्या दुधावर घट्ट सायीचा थर जमा झालेला असेल. एकीकडे बदाम पिस्ते काजूच्या पुडीत साखर अन वेलदोडा पुड एकत्र करुन ठेवा. प्रत्येक वाटीतील दुधाला कडेने धरदार सुरी फिरवुन उलथन्याने फक्त सायीचाच थर काढुन उलट बाजु करुन ताटलीत ठेवा. त्या प्रत्येक थरावर थोडे बदामाचे सारण घालुन सुरीनेच एक बाजू दुमडुन करंजीसारखी त्या सारणावर दुसरी बाजू ठेवा. कडेने कातण्याने कापुन घ्या. अन मग एका डिशमध्ये काढुन ती फ्रिझरमध्ये ठेवा. या तळायच्या नाहीत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|