Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 08, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » मुलांचे खाणे » लहान बाळांसाठी खाद्य » Archive through March 08, 2006 « Previous Next »

Bee
Wednesday, December 14, 2005 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा, दिनेश धन्यवाद. इतर माहिती मी योग्य त्या बीबीवर जाऊन आधी तो बीबी वाचेन आणि नंतरच नविन माहिती विचारीन :-)

Harini
Thursday, December 15, 2005 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks everybody.
storvi, thanks a million! very useful info. any more ideas most welcome.
अग मी पहिला प्रश्न विचारला तेव्हा माझी मुलगी सहा महिन्याची होती. आता ती आठ महिन्याची होईल लवकरच. आता तुझ्या recipes try करेन हळूहळू. आता ती वरण भात वगैरे थोडं खाते आहे. texture तिला आवडतं आहे त्यामुळे पूर्ण mash न करता उकडलेल्या भाज्या देते.

आणखी एक प्रश्न, पचायला जड म्हणजे काय? त्याने काय होतं? मी तिला तूरडाळ अजून देत नाही, कुणीतरी सान्गितलं पचायला जड म्हणून. आणि इतर कडधान्यं कधी द्यायची? मटकी वगैरे? त्यान्च्या साली काढायच्या ना?


Prajaktad
Thursday, December 15, 2005 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरिणि!पचायला जड जाते म्हणजे बाळाला gases किवा constipation होणे...पचायला सोपी म्हणुन मुगाचि दाळ चांगली.
कडधान्य पण एक सव्वा वर्षानंतरच द्यावे.


Dineshvs
Thursday, December 15, 2005 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कडधान्यात मुग पचायला सगळ्यात हलके तर चणे, ऊडीद हे सगळ्यात कठीण. ( गुढीपाडव्याला आंबा डाळ चापली कि पोट कसे गच्च होते, आठवले का ? )
पण त्यामानाने भारतीय पोटाला कडधान्यांची बर्‍यापैकी सवय असते.
आपल्याकडे मोड काढणे. शिजवताना जिरे, ओवा हिंग वापरणे या ऊपायाने ती पचायला मदत होते.
तुरीची डाळ भिजवुन. हळद हिंग घालुन शिजवली तर त्यातले निव्वळ पाणी देऊन बघावे.
माझ्या शेजारचे सात महिन्याचे बाळ मॅश केलेली ऊसळ आवडीने खाते, माझ्या हातुन.


Storvi
Thursday, December 15, 2005 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kDQaanya Vayalaa hrkt naahI ]DId AaNaI caNaa DaL saÜDlaI tr maI AarÜhIlaa sava- DaLI idlyaa. Ô> naohmaIcaa allergy caa inayama paLayacaa. idlyaa naMtr ga^saosa vagaOro hÜtahot Asao vaaTlao tr %varIt qaaMbavaayacao.

iXavaaya protiens saazI maI baircaXaI maTkI maÜD AaNauna vaaLvaUna pUD k$na zovato AaNaI iXajavauna jyaat %yaat Gaalato.


Bee
Friday, December 16, 2005 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, शिल्पा साधारणतः कितव्या महिन्यापासून मुगाची डाळ द्यायला चालते?

मला आठवत आई डाळीचे पाणी, भाताचे पाणी, फ़ळांचे गर, पोळ्यांचा काला हे सर्व साधारणतः सहावा महिना संपला की देत असे.. पण वैद्यकीय अंदाज काय म्हणतो माहिती नाही..

दिनेश तुमचे बरोबर आहे कडधान्याची आपल्याला पोटाला बरीच सवय असते. पण चणा डाळ खरच जड आहे पचायला. उडद डाळीची चव सर्वात छान लागते.


Storvi
Friday, December 16, 2005 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असं काही नसतं रे. साधरण सहा महिन्या पासुन देतात. पण आपण पहायच, मूल खयला तयर आहे कि नाही ते. आपण जेवतांना जर बाळ आपल्या कडे बघून तोंड हलवू लागले, आपल्या जेवणात interest दाखवू लागले, teething सुरू झाले, की मग जेवण देऊ लागावे. आता इथे ६ महिन्यांनी द्यावं असं सांगतात, पण आरोही ३-४ महिन्यातच आमच्या जेवणात interest दाखवू लागली आणि तोंड हलवू लागली त्यामुळे मी तिला थोडे लवकरच सुरू केले जेवण.

Harini
Monday, December 19, 2005 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks all of you. पण पचायला जड पदार्थ थोडे थोडे देऊन सुरुवात करता येते का? कारण नाहीतर तूरडाळ कशी देणार?

आणि बाळांच्या जेवणात जास्त तूप तेल घालावं का? for more calories? सासूबाई सांगतात भरपूर तूप ओत म्हणून. पण मला ते unhealthy वाटतं.

माझी मुलगी कच्ची फळं खाण्यात विशेष interest घेत नाहीये अजून. त्यावर काही उपाय आहे का?


Storvi
Monday, December 19, 2005 - 10:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरिणी हळु हळु सुरुवात करायला काहीच हरकत नाही. आणि या वयात तूप द्यायला काहीच हरकत नसतेमध्यन्तरी आरोहीचे वजन पुरेसे वाढले नव्हते तेंव्हा तिच्या डॉ. ने तिला भरपूर तूप घाला म्हणून सांगितले इथलेच आहेत तिचे डॉ.) :-)

मऊ चवीला गोड असतात अशी फ़ळं दे सुरुवातीला. म्हणजे पेयर, केळं, द्राक्षं(बरीक तुकडे करून, हे देतांना अगदी बारीक लक्ष ठेवायला हवं), कलिंगड, पपयी अशी फ़ळं दे आधी आणि आवडायला लागली की इतर फ़ळं दे.

Nilyakulkarni
Monday, December 19, 2005 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक सवा वर्षाच्या मुलाला वजन वाढण्यासाथी काय काय द्यावे.. तो आता पाले भाज्या टोमाटो सुप,पोळि, केळ, चिकुचा ज्युस.. वगैरे सर्व खातो.. पन म्हनावे तसे वजन वाढत नाही.. डो. नि आता कैल्शिअम ची पवडर दिलि आहे.. सवा वर्शाचा असुन त्याचे वजन आता ८.५ आहे..
किती असायाला हवे आनि अजुन काय द्यावे


Storvi
Tuesday, December 20, 2005 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

८.५ म्हणजे कमी आहे. माझी मुलगी पण सव्वा वर्शाची आहे, तिचे वजन २४ पऊंड म्हणजे जवळ जवळ १२ आहे. भरपूर तुप घालावे, सुप पित असेल तर त्यातुन heavy cream लोणी तुप असले घालुन द्या. माझ्या मते, breakfast lunch, dinner असे रोकठोक तीन किंवा चार वेळ चे खाणे न ठेवता येता जाता खायला द्यावं थोडं थोडं. अश्याने मुलं पूर्णं जेवण करत नसली तरी त्यापेक्शा जास्त अन्न पोटात जातं. आणि एक लक्षात ठेवावं आता मुलं चालती पळती होतात त्यामुळे खाल्लेल सगळं जिरतं तेव्हा पुर्वी इतक झपाट्याने वजन वाढत नाही. शिवाय सधारण पणे भारतीय मुलं वजनाने कमी असतात तेव्हा या गोष्टी ला फ़ार घाबरू पण नये.

Seema_
Tuesday, December 20, 2005 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nilya बाळाची height आणि weight percentile chart मध्ये कितपत आहे हे बघितलत का?. तसच खजुर वैगरे चालत असेल तर काहीच हरकत नाही द्यायला. also u can try pediasure after discussing with dr .

Harini
Tuesday, December 20, 2005 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks storvi अग सुरुवातीला केळं आवडीने खायची पण आता दात येण्याची वेळ आहे बहुतेक त्यामुळे मऊ काहीच आवडत नाहीये. Gerber ची फळंसुध्दा आवडत नाहीत.

Prajaktad
Tuesday, December 20, 2005 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

finger food चे काही options सांगता येतिल का?


Storvi
Tuesday, December 20, 2005 - 10:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिखटामिठाच्या पुर्‍या पोळ्या(भाज्या घालून पण ह्या करता येतात) फ़ळांचे काप, कोथिंबीरीच्या वड्या, भाज्यंच्या वड्या, कोबीचे कोफ़्ते, sweet potato fries, cheerios , भडंग, गाजरच्या चक्त्या

Bee
Wednesday, December 21, 2005 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिल्या तीन महिन्यात आईचे दुध आणि dry fruits ची घुटी ह्या खेरीच formula milk powder मिळतात ते दिले तर चालते का? लहान मुले खूप झोपतात तेंव्हा त्यांना dehydration होऊ नये म्हणून जागे करून पाजायला पाहिजे का?

इथे सगळेच जण छान माहिती देत आहेत. सगळ्यांना धन्यवाद..


Bee
Wednesday, December 21, 2005 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आत्ताच बाळगुटीचा बीबी पूर्ण वाचला. काहीकाही पोष्ट तर पुन्हा पुन्हा वाचलेत. काही नवीन terms कळलेत. माहिती मिळाली. बरे झाले.

पण सगळ्यांचे पोष्ट वाचून एक conflict होतो आहे. म्हणजे शिकलेली लोक वेगळे सांगतात, अनुभवी वेगळे, परत Dr वेगळे, भारतातले वेगळे. त्यामुळे खरे काय हे ठरविणे कठीण जाते आहे.

आता साधा प्रश्न आहे, बाळाला अगदी पहिल्या दिवसापासून पाणी पाजावे की नाही? पाजावे तर किती? साखरपाणी द्यावे का? कुठली साखर वापरावी?

तर ह्यावर ढीगभर conflicting answers मिळालेत. काहींनी तर उत्तर दिले, हो पाजावे, पण बाळाला हवे तितकेच. महिनाभराचा बाळाला पाणी पुरे झाले हे कसे ठरवावे?

Gerber , नागली काय प्रकार आहे हे मला कुणी सांगेल का?


Asami
Wednesday, December 21, 2005 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

It's simple mate, every child is different.

Gerber he eka companyche naav ahe je lahan mulnsathi vegveglya vastu banvataat.

Prajaktad
Wednesday, December 21, 2005 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी!नागली....म्हणजे " नाचणि " ,किंवा " राग्गी " ,किंवा "red millet flour" ...याचि खिर करुन देतात.(६ व्या महिन्यानंतर म्हणजे बाळ सहा महिन्याचे झाल्यावर्)

gerber हे baby food कंपनिचे नाव आहे.
अगदि लहान मुल जास्तच झोपतात,उठवायचि गरज नाही!भुक लागली कि तेच उठतात.
आईचे दुध बाळाला पुरत नसेल तरच formulaa milk supplimentary म्हनुन द्यावे.


Bee
Friday, January 20, 2006 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रश्न इथे चालेल असे वाटते म्हणून विचारतो आहे.

आईला cholostrum म्हणजे बाळ जन्मल्यानंतर पिवळसर रंगाचे दुध किती तासानंतर येते आणि किती तास ते राहू शकते ह्याबद्दल कुणी सांगू शकेल का? मी असे वाचले आहे की cholostrum बाळाला लगेच द्यायला पाहिजे त्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती वाढते. बरोबर आहे का हे? माझ्या बहिणीचे c-section झाले होते तेंव्हा बाळाला लगेच पाजता आले नाही आणि खूप तासानंतर बाळ आईजवळ दिले. त्यामुळे माहिती नाही, तिला cholostrum मिळाले की नाही. पण आता दुसर्‍या ताईच्या वेळेस मी खबरदारी घेईन. मी जात आहे तिच्या बाळंतपणाला. बरीच बारीकसारीक वस्तुंची खरेदी चालली आहे. माहिती मिळवने सुरू आहे. धन्यवाद मंडळी उत्तर देण्यापूर्वी!!!!!!!


Dineshvs
Saturday, January 21, 2006 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, याची चर्चा ईथे केली तर चालेल का, याची जरा शंका वाटतेय. कोलस्ट्रम लगेच येते. कॉर्ड कटिंगच्याहि आधी बाळ ते घेऊ शकते. सी. एस. झाले तर आईला शुद्ध आली कि लगेच फ़ीडींग करता येते. ते दोन ते चार दिवस मिळते. आणि त्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ति वाढते हे खरे आहे.
आईच्या पोटात बाळ पुर्णपणे निर्जंतुक वातावरणात असते. त्याला प्रथम घेणार्‍या नर्सकडुन त्याला बॅक्टेरिया मिळतात. यापैकी बरेचसे आपल्याला आवश्यक असतात. पण जे नको असतात, त्याना प्रतिकार करण्याची शक्ति यातुन मिळते.
बरेचसे बॅक्टेरिया आपल्या शरिरात आणि शरिरावरहि कायम वस्तीला असतात. ( म्हणजे ईंग्लंडच्या राणीसारखे, आपणहि स्वतला, आम्ही म्हणुन घ्यावे ) प्रतिजैवकाचा मोठा कोर्स केला तर त्यातले अनेक नष्ट होतात. त्यावेळी त्यांची पुन्हा वाढ करणे आवश्यक असते.


Bee
Sunday, January 22, 2006 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश!!!!!

शेवटचा परिच्छेद फ़ारच विनोदी केला :-)


Moodi
Saturday, February 04, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कास माहिती अन विवेचन.

http://www.esakal.com/20060204/sakalvis73.html .

Leenas
Wednesday, March 08, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मुलगी ३ महिन्यांची आहे. तिला दुधाव्यतिरिक्त काय देता येइल? ४ थ्या महिन्यापासुन पेज देता येइल का? किंवा दळिंब, कलिंगड याचे रस हळूहळू, दिवसातून एकदा? मला ऑफ़िस जॉइन कराव लागलं. ती ३ महिन्याची आहे आता.

Savani
Wednesday, March 08, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लीना, तु तिला भाताची पेज सुरु करु शकते. सुरु करताना अगदी पातळ दे. आणि पहिल्या दिवशी अगदी चमचाभरच देउन बघ. नन्तर रोज हळू हळू प्रमाण वाढव. आणि consistency पण. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, वेळेच्या बाबतीत काटेकोर रहा. तिच्या खाण्याची रोज वेळ बदलू नकोस. आणि शक्यतो दुपारच्या जेवणात तिला दे. कारण रात्री कदाचीत पोटात gas धरायची शक्यता असते.
त्यानन्तर २ आठवड्याने वरणाचे पाणी दे. मुगाच्या डाळीचे दे. त्यात थोडा हिन्ग, एखादा मेथी दाणा घालावा.पोटासाठी उत्तम.
भाज्यान्चा नुस्ता stock द्यावा. पण सगळ्या मधे थोडे मीठ आणि किन्चीत जीरे पुड घाल. मुलाना चव लागली की आवडते.
always make sure की जे देते आहेस त्यात कसालाही कण नाहिये की काही घशात अडकेल.
फ़ळान्चा रस तु देतेस आहेसच.
एक general rule मात्र पाळ. एकाच आठवड्यात २ नवीन प्रकार सुरु करु नकोस. प्रत्येक नवीन गोष्ट सुरु केली की एक आठवड्याने दुसरी दे. तु जर भाताची पेज सुरु करणार असशील तर आधी थोडे दुध दे. मग पेज आणि परत दुध असे दे.
बघ, हे बरोबर वाटतय का? अजुन इथे मैत्रिणी सल्ले देतिलच.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators