|
Moodi
| |
| Wednesday, February 08, 2006 - 9:19 am: |
| 
|
मश्रुम आम्लेट : 3-4 अंडी फोडुन फेसुन घ्या त्यात १०० gram मश्रुमचे ताजे अथवा १० ते १२ gram सुकलेल्या मश्रुमचे तुकडे अन थोडी मलई किंवा दुधावरची साय एक चमचा घालुन अर्धा तास किंवा १५ मिनिटेही मुरु द्या. नंतर त्यात हिरवी मिर्ची अन कोथिंबीर, मीठ, मीरपुड घालुन नेहेमीप्रमाणे आम्लेट करा. स्वतः खा अन मुलानाही द्या.
|
Zakki
| |
| Thursday, February 01, 2007 - 2:10 pm: |
| 
|
काल TV वर पाहिले. न्यू यॉर्क मधे १०००. डॉ. चे ऑमलेट मिळते. त्यात मोठ्या प्रमाणावर बेलुगा caviar असते. त्यावरून एक प्रश्न: भारतात caviar खातात का? इथल्यासारखे बरेचदा?
|
Dineshvs
| |
| Friday, February 02, 2007 - 6:42 am: |
| 
|
भारतात कॅव्हियर कुणाला परवडणार बरेचदा खायला ? पण असे अति महाग पदार्थ, काहि हॉटेल्स मधे मिळतात.
|
Maanus
| |
| Sunday, March 23, 2008 - 3:02 am: |
| 
|
What's the secret to making a great omelet?
|
Zakki
| |
| Sunday, March 23, 2008 - 10:19 pm: |
| 
|
माणसा, आता लग्न कर नि बायको घेऊन ये. मग ऑम्लेटच काय, इतरहि 'ग्रेट' पदार्थ खायला मिळतील. फक्त इच्छा व्यक्त करायची. ही 'रेसिपी', 'झक्की रेसिपी' म्हणून मायबोलीवर प्रसिद्ध आहे! फारच खात्रीलायक.
|
फक्त त्या रेसिपीचा उल्लेख 'समानतेच्या' बीबीवर करु नकोस. अगदी ग्रेट नसलं तरी छान ऑमलेटसाठी काही टिप्स्: *कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, हिरवी मिरची हे सगळं बारिक चिरून तेलावर किंवा तुपावर परतून घे. (भाज्यातलं पाणी निघून गेल्यावर ऑमलेट नंतर पाणीदार होणार नाही.) परतताना त्यात मीठ आणि मिरपूड घाल. थंड होऊ दे. (नाहीतर बलकात मिसळताना गरम असलं की तिथे बाऊलमधेच एग प्रोटीन्स कोऍग्युलेट होतील) *सॉसेजेस शिजवून बारिक तुकडे करून भाज्यांमधे मिसळ. सॉसेज ऐवजी (किंवा बरोबर) डेलीचं जे काही मीट घरात असेल तेही बारिक करून घालता येईल. *२ अंडी फेटून त्यात अगदी चमचाभर दुध घाल. म्हणजे मग ऑमलेट जळून रबरी होणार नाही, फ्लफी राहील. *फेटलेल्या बलकात भाज्या घालून मग तव्यावर टाकलं तरी चालेल. किंवा ऑमलेट होत असताना वरून ह्या भाज्या आणि मीट घालायचं.
|
Maanus
| |
| Monday, March 24, 2008 - 3:10 pm: |
| 
|
धन्यवाद तसे मला अंडे प्रकार जास्त आवडत नाही, वासामुळे. पण try करुन बघायला हरकत नाही. आनंदराव, सल्ल्या बद्दल मंडळ आभारी आहे , पण आजकाल मुलींना काय झालेय माहीत नाही. त्या अमेरीकेत येवुन सगळी कामे स्वतः करावी लागतात म्हणुन ईकडे यायचे नाही म्हणतात.
|
भल्या माणसा, मग कुणासाठी इतक्या आवर्जून सिक्रेट विचारतो आहेस?
|
Arch
| |
| Monday, March 24, 2008 - 8:46 pm: |
| 
|
माणसा, मलाही पदार्थाला अंड्याचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे, ऑम्लेट करताना मी त्यात हिंग, आलं आणि लसूण अगदी बारीक चिरून घालते. आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि थोडसं दूध. अंड्याचा वास अजिबात येत नाही. बघ try करून.
|
Sashal
| |
| Monday, March 24, 2008 - 8:54 pm: |
| 
|
त्या लिंक वर दिलेलां उत्तर हे Food TV वरच्या Alton Brown च्या Good Eats show वरून जसंच्या तसं कॉपी केलंय ..
|
हात्तीच्या!! ती लिंक होती होय? मी आपलं उगीच लिहित बसले! (सवयीचा परिणाम! दुसरं काय?)
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|