|
Bee
| |
| | Wednesday, March 15, 2006 - 2:41 am: |
| 
|
आमच्या इथल्या महाराष्ट्र मंडळामध्ये गुढीपाडव्यानिमित्त पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. बटाटा हा मुळ घटक ठेवून मराठी कि.व्ना अमराठी किंवा परदेशीय पदार्थ बनवू शकतो. मला काही चांगल्या कृती मिळतील का इथे. निदान उत्तेजनार्थ तरी बक्षिस मिळायला हवे नाहीतर मायबोलिचे नाव जाईल तेंव्हा मंडळी मदत करा मदत करा मदत करा
|
Chingutai
| |
| | Wednesday, March 15, 2006 - 11:09 am: |
| 
|
बी बेबी पोटेटोची येक रेसिपी बेबी पोटेटोज किंचीत हळद आणि मीठ घातलेल्या पाण्यात टाकून १५ मिनीटे उकळून घ्यावेत. थंड झाल्यानंतर सुईनी भोकसून, त्यांना दह्यात कलवलेले मसाले (लाल तिखट,हळद,धना-जीरे पावडर,बडीशेप पावडर,चाट मसाला, सुंठ पावडर, लवंगाची पूड) चोळून लावून घ्यावेत. अर्धा तास ठेवुन द्यावेत, मुरण्यासाठी. तेलाची फोडणी (राई, जीरे,हिंग) करुन त्यामध्ये लसूण ठेचून घालावा. कसुरी मेथी घालावी. मग ते बटाटे परतून घ्यावेत. मीठ, साखर घालून लिम्बू पिळावा. वरुन कोथिंबीर चिरून घालावी. बेस्ट लक. चिंगी
|
Moodi
| |
| | Wednesday, March 15, 2006 - 11:25 am: |
| 
|
बी तुला कशा प्रकारच्या रेसेपीज हव्यात ते आधी जरूर स्पष्ट कर. म्हणजे बटाट्याची भाजी रस्सा, कोरडी, उकडुन अशा प्रकारची भाजी की चटकन तयार होणारे बटाटयाचे snacks , की वडे किंवा बटाट्याचे सर्व स्तरातील असे पदार्थ ते पण लिही म्हणजे तशा रेसेपी पण येतील. माझे म्हणणे तुला कळले असेलच. 
|
Milindaa
| |
| | Wednesday, March 15, 2006 - 11:34 am: |
| 
|
बी, मी तुला सूचना करेन की तू आधी उपाहार आणि menu combinations या बीबींवर जाऊन ये. तेथे बटाट्याच्या असंख्य रेसिपीज आहेत. त्या वाच. त्यात तुला एखादी रेसिपी आवडू शकते. तसं झालं तर बरंच आहे. नाहीतर एवढंच होईल की त्याच त्याच रेसिपीज परत लिहील्या जातील आणि जो / जी मॉडरेटर इथली साफसफाई करेल त्याचं / तिचं काम वाढेल. हे पटलं नाही तर तू तुला पाहिजे ते करायला नेहमीप्रमाणे मोकळा आहेसच.
|
तुझी सुचना रास्त हे पर काय हे ना की रोजच्या जेवणाकर्ताची रेसिपी अन स्पर्धेकरताची रेसिपी यात काहीच फरक असणार नाही का? फरक नसेल अस वाटत असेल तर २००५ च्या गणेशोत्सव स्पर्धेतल्या रेसिपी बघ! अन हे पटल नाही तर तू नेहेमीप्रमाणे सुचना करायला मोकळा आहेसच! DDD
|
Psg
| |
| | Wednesday, March 15, 2006 - 11:46 am: |
| 
|
मिही हेच सुचवणार होते बी.. बटाट्याच्या कृती असा वेगळा thread आहे इथे.. त्यात बघ. तुला काही specific हवे असेल तर विचार.
|
Psg
| |
| | Wednesday, March 15, 2006 - 11:51 am: |
| 
|
/hitguj/messages/103383/59991.html?1141883325 बी ही लिंक आहे बटाट्याच्या भाज्यांच्या रेसिपी ची. अश्याच बर्याच रेसिपी मिळतील, जरा शोधाव लागेल. पन स्पर्धेत भाग घेत आहेस, तर इतके कष्ट घ्यायला हरकत नाही, नाही का? आधी म्हणले तसे तू नक्की काय शोधत आहेस ते ठरव आणि मग विचार.
|
Bee
| |
| | Wednesday, March 15, 2006 - 11:56 am: |
| 
|
ठीक आहे सर्वांच्या प्रेमळ सुचनेबद्दल धन्यवाद. मी आहेत त्या बटाट्याच्या कृती बघितल्यात. मला भाजी हा प्रकार नको आहे. खरे तर रोजच्या आहारातील कुठलीच कृती स्पर्धेसाठी योग्य ठरू शकणार नाही. भाज्या नकोत, पराठे नकोत, बटाटे साबूदाणा वडे नकोत, पाववडा नको, फ़्रेन्च फ़्राईज नकोत, मासाहारी कृती नको. ह्यापेक्षा इतर काही मराठी, अमराठी आणि भारताबाहेरच्या बटाट्याच्या कृती चालतील
|
Bee
| |
| | Wednesday, March 15, 2006 - 12:02 pm: |
| 
|
आणखी एक लिहितो, की जर कुणाला वाटले ही कृती बटाट्याच्या बीबीवर लिहावी तरी चालेल. मी रोज नाहीतरी लिंक चेक करणारच आहे. तेंव्हा नेमस्तकांचे कष्ट वाचविण्याच्या दृष्टीकोणातून आपण तिथेही लिहू शकता. दुसरे असे की कृती खूप detail मध्ये नाही दिली तरी हरकत नाही. नंतर मला जर माहिती विचारावीशी वाटली तर मी आहेच एक नाही अनेक प्रश्न विचारायला तयार
|
Bee
| |
| | Wednesday, March 15, 2006 - 12:08 pm: |
| 
|
मंडळी हे work out होऊ शकेल का? माझ्याकडे खवा उरला आहे. मी विचार करत होतो बटाटे उकळवून त्याचा लगदा तयार करायचा. त्यात खवा मिसळून तुपात गुलाबजाम तळायचे नि मग पाकात सोडायचे. हे असे होऊ शकेल का? मी ह्याला बटाट्याचे गुलाबजाम असे नाव देतो आहे. अजून काही innovative ideas चालतील.
|
Psg
| |
| | Wednesday, March 15, 2006 - 12:12 pm: |
| 
|
बहुदा नाही होणार. बटाट्यात पाक जाईल क खव्यात जातो तसा? मला नाही वाटत. नुस्तेच तळले जातील. पाक जर मुरला नाही, तर गुलाबजामला मजा नाही! तरी तज्ञ लोक सांगतीलच. sorry नाही म्हणल्याबद्दल!
|
Moodi
| |
| | Wednesday, March 15, 2006 - 12:14 pm: |
| 
|
अरे हो बी होतात त्याचे गुलाबजाम तसे. उलट उपासाला पण चालतात.
|
Karadkar
| |
| | Wednesday, March 15, 2006 - 3:37 pm: |
| 
|
तो दिनेश नी बटाट्याचा शिरा दिलाय ना, तो बनव आणि पुरणासारखा (पराठ्यासारखा) वपरुन बटाट्याच्या पुरण्पोळ्या बनव हाय काय अन नाय काय.
|
Dineshvs
| |
| | Thursday, March 16, 2006 - 10:27 am: |
| 
|
मिनोति ने लिहिल्याप्रमाणे पोळ्या छान होतात, फ़क्त त्यात थोडा बारिक रवा भाजुन मिसळायचा व थोडे ओले खोबरे घालायचे. म्हणजे नीट लाटता येतात. बटाट्याच्या जिलेब्या, म्हैसुर पण करता येतो. दिल्लीवाल्यांची बटाटा टिक्की किंवा हल्लीच प्रसारात आलेले बटाटा बास्केट चाट पण करता येईल.
|
ही एक बटाटा क्रुती, competetion आहे म्हणुन सजावट जास्त असलेली क्रुती आहे. साहीत्य: एक, किंवा अर्ध किलो जसे लागतील तसे बटाटे एक वाटी वाटाणे,सोयाबेअन्चा चुरा मिळतो तो, थोडा मोकळा शिजवलेला वाटीभर भात, ब्रेड्च्या २ स्लाइस टोमटो साॅस हिरव्या रंगाची टूटीफ़ुटी, कोथिंबीर,लसुण,आले,हीरवी मिरची,कांदा किसलेले चीज, चेरी लेटुसची पाने, क्रुती:१: ४ बटाटे शिजवुन त्यात पाण्यात भिजवलेल्या ब्रेड नीट मळुन घ्यायच्या आता ह्या मिश्रणाचे दोन भाग करायचे २: सोयाबीन्चा चुरा पाण्यात भिजत ठेवायचा नंतर दोन पाणी बदलवुन घट्ट पिळुन घ्यायचे, ह्यात तीखट मीठ, आले लसुण पेस्ट घालुन थोड्या तेलावर पर्तुन वर बाजुला ठेवलेल्या बटाट्याच्या एका मिश्रणात mix करावे, त्याचे छोटे छोटे गोळे बनवुन तळावे. फ़डफ़्डीत भाताला एका ताटात पसरावे त्यवर हे गोळे फ़ीरवावे म्हणजे कण्या ball ला पक्क्या चिकटतील, भातात जर कोणताही खाद्य रंग मिसळला तर फ़ार छान दीसते. हे गोळे आता एका बजुल ठेवुन द्या. ३:आता दुसर्या बटाट्याच्या भागात, वाटाणे वाफ़वुन किंचीत गरम मसाला, आले लसुण पेस्ट टाकुन मिक्स करा,त्याचेही मागच्या सोया बाॅल्च्या आकाराचे बाॅल बनवा, तळुन घ्या ४: आता २ बटाट्यांचे fingerchips करुन त्यावर थोडा गरम मसाला भुर्भुरा(अगदी थोडा) ५: एका प्लेट मध्ये ४ लेटुसची पाने ठेवा, निमुळते टोक मधल्या बाजुला आले पाहीजे, जीथे मध्यभाग आहे तीथे भातावरुन फ़ीरवलेला मोठ्ठा (त्यातलाच निवडुन) सोया ball. ठेवा त्याभोवती वाफ़वलेले वाटान्यांची एक रींग काढा, रेंगेभोवती ४ दीशांना ४ समोरासमोर एक सोया बाॅल, एक वाटाने बाॅल ठेवा, दोन बाॅल च्या मधे चिप्स रचा,वाटाने बाॅल वर चीज टाका वर चेरी ठेवा. चिप्सवर एक रेष, टोमॅटो साॅसची काढायची आणि तुटीफ़्रुटीचे हिरवे तुकडे टाकायचे, वरुन हिरवीगार कोथींबीरीची आख्खी पाने ठेवायची रंगीत छान दीसते, शिवाय सगळीकडे फ़क्त बटाटाच!!!
|
Mbhure
| |
| | Tuesday, April 04, 2006 - 10:18 pm: |
| 
|
बी, गुढीपाडवा झाला. त्या स्पर्धेचे काय झाले?
|
Bee
| |
| | Wednesday, April 05, 2006 - 1:36 am: |
| 
|
अल्सरमुळे मी घरीच बसून होतो. शिवाय माझी काहीच तयारी नव्हती. सध्या खूप काही चाललय. या वेळी नाहीतर पुढल्या वेळी. इथे ह्या स्पर्धा असतात नेहमी आमच्या मंडळात. पण भुरे तुम्ही इतके उत्सुक होता स्पर्धेबद्दल हे वाचून बरे वाटले. तुम्ही पण घरी कूक बिक करता का बायकोसाठी
|
Mbhure
| |
| | Wednesday, April 05, 2006 - 9:21 pm: |
| 
|
मी खवय्या आहे आणि खाण्याचे (पदार्थाच्या कृती असलेले) कुठचेही सदर किंवा कार्यक्रम आवडीने पहातो. घरी ' सहभोजन' करतो. रोजचे बर्याचदा बायको कुक करते. खास करुन कोणी येणार असेल तर एखाद दुसरी डिश OR Specail डिश मी बनवतो. बाकी सर्व बायको बघते. एकच अट असतेः जेवणा आधी काहीही (चपाती सोडुन) कुकींग करीन पण नंतरचे आवरणे No नाय NEVER .
|
Chinnu
| |
| | Thursday, April 06, 2006 - 2:37 am: |
| 
|
भुषण तुमची पत्नी भाग्यवान हो!
|
Arch
| |
| | Thursday, April 06, 2006 - 3:15 am: |
| 
|
का बाई चिनु? भूषणनी केलेला पसारा आवरायला लागतो म्हणून 
|
Chinnu
| |
| | Thursday, April 06, 2006 - 2:50 pm: |
| 
|
Lol Arch! तस नाही ग. परदेशी आल्यावर आपली लोक बर्याचदा घरातली कामे केवळ तडजोड म्हणुन स्वीकारतात. (काही काही ते ही करत नाहीत!) पण इथे इतके दिवस राहुनही आनंद द्यावा घ्यावा या चालीवर भुषण मनापासुन सहभागी होतात हे पाहुन छान वाटले एवढंच.
|
|
| चोखंदळ ग्राहक |
 |
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
| पांढर्यावरचे काळे |
|
| गावातल्या गावात |
|
| तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
| आरोह अवरोह |
|
| शुभंकरोती कल्याणम् |
|
| विखुरलेले मोती |
|
|
|
| हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|