|
अंड्याची भाजी ५-६ अंडी २ कांदे तिखट,मीठ, तेल थोडी कोथींबीर अंडी उकडुन, सोलुन प्रत्येक अंड्याचे ४ भाग करावे त्यावर तीखट,हळद,मीठ भुरभुरावे... कढैअत बारीक कापलेला कान्दा तेलावर परतावा, कान्दा लाल झालाकी अंडी (तीखट, मीठ हळद टाकलेली) टाकुन सग़ळ्या अंड्यांना कांदा सारखा लगेल असे परतावे आणि लगेच गॅसवरुन खाली उतर्वुन घ्यावे, खुप हळु परतावे लागते नाहीतर आंड्यातील पिवळा भाग चुरा होतो! ही भाजी फ़ार छान होते,पटकन होते, सुरवातीला तेल जरा जास्त टाका म्हणजे भाजी बिघडणार नाही.
|
same ! फक्त फोडणीला मिरे, लवंग, दालचिनी. आणि कांदा परतून झाला की आल-लसणाची पेस्ट. आणि थोडासा गरम मसाला टाकायचा.
|
हो ग शामली आशीच करते माझी आई, पण इकदे मसाला तेल असे काही चालत नाही ना म्हनुन!
|
Mrinmayee
| |
| Wednesday, September 06, 2006 - 1:15 pm: |
| 
|
मेथी अंडं भुर्जी: २ अंडी फेटून १ जुडी: ताजी मेथी फक्त पानं खुडून ३-३ लसूण पाकळ्या १लाल मिरची १ छोटा कांदा बारिक चिरून मीठ ४ काळ्या मिर्यांची पावडर तेल किंवा तुप २ लहान चमचे (अंड्याच्या पदार्थाला तेल्-तुप फारसं लागत नाही) कृती: तेल गरम करून त्यावर ठेचलेल्या लसूणपाकळ्या घालाव्या. त्या गुलाबी रंगावर आल्या की लाल मिरची आणि कांदा घालून परतावं. कांदा जरासा पार्दर्शक झाल्यावर स्वच्छ धूउन निथळवलेली मेथी पानं घालावी. (चिरल्यावर मेथी जास्त कडू होईल) यावर मीठ आणि मिरपूड घालून ४-५ मिनिटं शिजु द्यावं. (झाकण न ठेवता) या मेथीवर फेटलेली अंडी घालून ढवळावं. अंड्याचा बलक घट्ट होत आला की गॅस वरून उतरून गरम भुर्जी ब्रेड, पराठा किंवा फुलक्याबरोबर खावी.
|
Deepant
| |
| Thursday, October 25, 2007 - 4:55 am: |
| 
|
अंड्याची भुर्जी साहित्य-२ अंडी,१ मोठा कांदा बारीक चिरुन,१ छोटा टोमॅटो बारीक चिरुन,२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,लाल तिखट,गरम मसाला,धणे जीरे पावडर, हळद, मीठ, तेल, कोथिंबीर कृती-- पसरट कढईत जरा जास्त तेल घालावे. तेल तापले की कांदा, मिरच्या घालाव्यात.मध्यम गॅसवर कांदा गुलाबी परतुन घ्यावा. बारीक चिरलेला टोमॅटो घालुन झाकण ठेवावे.एका मिनिटानंतर झाकण उघडुन नीट परतावे. गॅस मंद करावा.त्यात हळद,लाल तिखट,धणे जीरे पावडर,गरम मसाला,मीठ घालुन नीट हलवावे. नंतर अंडी फ़ोडुन घालावीत. गॅस मध्यम करावा.मिश्रण कोरडे होइपर्यन्त परतत रहावे. अंड्याच्या गुठळ्या व्ह्यायला नको. नीट परतले तर भुर्जी रवाळ होते. आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. गरमच खावी. चपाती, ब्रेड, फ़ुलके बरोबर चांगली लागते.
|
Vrushs
| |
| Thursday, October 25, 2007 - 1:10 pm: |
| 
|
Thanks Mrinamayee and Deepant for quick help.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|