Dineshvs
| |
| Wednesday, March 08, 2006 - 4:57 pm: |
| 
|
आलू मटर पाव किलो फ़्रोझन मटार असतील तर दोन मध्यम बटाट्यांच्या चौकोनी फ़ोडी करुन घ्याव्यात. दोन लहान कांदे सोलुन त्याचे मोठे तुकडे करावेत. ऊकळत्या पाण्यात ते टाकावेत व जरा पारदर्शक झाल्या कि निथळुन घ्याव्यात. बटाट्याच्या फ़ोडी पण जरा वाफवुन घ्याव्यात. व मटारहि मीठाच्या पाण्यात घालुन ऊकडुन घ्यावेत. एक मोठा कांदा बारिक चिरुन घ्यावा. दोन तीन पिकलेले टोमॅटो ऊकळत्या पाण्यात मिनिटभर ठेवुन लगेच थंड पाण्यात घालावेत. त्याने साल निघेल मग त्याच्या बारिक फ़ोडी कराव्यात. बिया काढुन टाकाव्यात. चार सहा काजु किंवा दोन चमचे मगज यांची पाणी घालुन पेस्ट करुन घ्यावी. तेल आणि तुप मिक्स करुन गरम करावे. त्यात एकादी लसुण पाकळी व थोडे आले घालावे. मग कापलेला कांदा परतावा. तो सोनेरी होवु द्यावा. त्यात एखादा दालचिनीचा तुकडा व एका वेलचीचे दाणे घालावेत. त्यात टोमॅटोच्या फ़ोडी घालुन तेल सुटेस्तो परतावे. दरम्यान ऊकडलेल्या कांद्याची पेस्ट करुन घ्यावी. टोमॅटोला तेल सुटले कि हि पेस्ट घालावी. नीट एकजीव होवु द्यावे. त्यात काजु किंवा मगजची पेस्ट घालावी. परत सगळे ढवळुन घ्यावे. लाल तिखट घालावे. हळद घालावी. खमंग वास आला पाहिजे. मग हे सगळे जरा थंड होवु द्यावे. मिक्सरमधुन बारिक करुन घ्यावे. हि पेस्ट आधी करुन फ़्रीजमधे ठेवता येईल. आता परत थोडे तेल तुप गरम करुन त्यात मटार व बटाटे जरा परतावे. थोडा हिंग घालावा. मग वाटण घालावे. जरुरीप्रमाणे पाणी घालावे. मीठ घालुन मंद आचेवर गरम करावे. वरचा फ़ेस दुर झाला आणि ग्रेव्हीला चमक आली कि ऊतरावे. हवे तर वरुन क्रिम घालावे.
|
Kitkat
| |
| Thursday, March 09, 2006 - 7:08 am: |
| 
|
Dineshbhai, Thankyou so much!इतकी छान लिहीली आहे रेसिपी की वाचतानाच करायचा हुरुप आलाय! आता लगेच करून पाहाते. साहीत्य तर सर्व आहेच! आणि हो तुमची रेसिपी इतकी perfect असते की करून पाहाते आणि सान्गते म्हणायलाच नको. ती perfect होणारच याची पूर्ण खात्री आहे. तुम्हाला पुन्हा एकदा मनपासून धन्यवाद!
|
Dineshvs
| |
| Thursday, March 09, 2006 - 4:00 pm: |
| 
|
मी गरम मसाला सुचवलेला नाही. पण जर हवा थंड असेल तर शेवटी थोडा टाकुन झाकण ठेवले तर छान वास लागेल. गरम मसाला घालायचा आणखी एक प्रकार म्हणजे. थोडे तुप आणि गरम मसाला एका चमच्यात फ़ेसायचा. मग तो चमचा थेट गॅसवर धरायचा. तुप वितळले कि पटकन भाजीत सोडायचा.
|
Kitkat
| |
| Friday, March 10, 2006 - 11:55 am: |
| 
|
राहावले नाही सान्गीतल्याशिवाय पण काल केलेली ही भाजी excellent (even without garam masala) झाली होती. मी थोडा खवा पण काजू बरोबर मिक्स केला जाडपणासाठी त्यामूळे चव पण छान आली. पुर्या बरोबर मस्तच लागली हॉटेलपेक्षा छान.
|
Dineshvs
| |
| Friday, March 10, 2006 - 3:54 pm: |
| 
|
आपण घरी चांगले तेल तुप वापरतो. हॉटेलमधे खुपदा स्वस्तातले तेल वापरले जाते, म्हणुन ते जेवण अंगावर येते. शेवटी घरचे ते घरचे. खव्याने छान चव येणारच.
|
Moodi
| |
| Friday, March 10, 2006 - 3:57 pm: |
| 
|
दिनेश रेसेपी खुपच छान आहे हो, पण मी एकदा पनीरकरता म्हणुन उकडवुन घेतलेल्या कांद्याची पेस्ट केली, अन ती चव जी बिघडली की जाता जाईना ती भाजी. कशीतरी खाल्ली. या भाजीत कांदा नुसता फोडणीत वापरला तर नाही का चालणार? कांदा उकडायलाच हवा का? फार वास येतो तशा कांद्याला..
|
मूडी, कांदे उकडायचे नसतील तर तर कच्चेच अजिबात पाणी न घालता मिक्सर मधून काढ. आणि ती पेस्ट टाक तेलावर फोडणीला. पण त्यासाठी तेल मात्र जरा जास्त लागतं. आणि तेल चांगलं तापू दे. पेस्ट फोडणीला टाकल्यावर मोठ्ठा आवाज आला पाहीजे. आणि टाकल्या टाकल्या छान खमंग वास येतो. मी छोले करताना असच करते म्हणुन सांगतेय अनुभवावरुन.
|
Moodi
| |
| Friday, March 10, 2006 - 4:43 pm: |
| 
|
चालेल दिनेश आता तसेच करुन बघते. 
|
माझी आजी सांगायची की तेल आणि तुप मिक्स करू नये. पण रेसीपीत अर्धी वाटी तुप वगैरे असल की जीवावर येते इतक तुप वापरायचे. उगीच कॅलरीज कोलेस्ट्रोल वगैरे आठवते. असो, पण कारण आहे का काही मिक्स करून न वापरण्याबद्दल? की असच जुन्या लोकांच्या समजूती?
|
Savani
| |
| Friday, March 10, 2006 - 7:27 pm: |
| 
|
रचना, बरोबर आहे तुझे. माझी पण आई कधी तेल तूप एकत्र खाऊ नये असे म्हणायची. काय कारण आहे ह्या मागे?
|
Dineshvs
| |
| Saturday, March 11, 2006 - 1:39 am: |
| 
|
तेल तुप एकत्र न करायला मला तरी काहि शास्त्रीय कारण आढळले नाही. मूडि, कच्च्या कांद्याचे वाटण जास्त वेळ परतावे लागते. दो प्याजा हि जी कॉन्सेप्ट आहे त्यामधे दोन प्रकारे कांदे वापरायचे असतात. म्हणुन हे असे. कांदे ऊकडताना सोलुन चार फ़ोडी करुन घ्यायचा. ऊकळत्या पाण्यात बाहेरच ऊकळायच्या. ऊकडल्यावर ते मऊ आणि पारदर्शक व्हायला हवे होते. याला ऊग्र वास येणार नाही. हे आधीच शिजल्याने, तेलात कमी वेळ परतावे लागतात. शिवाय तळलेला कांदा आणि हा कांदा यांचा मेळ छान जमतो.
|
Kitkat
| |
| Saturday, March 11, 2006 - 7:35 am: |
| 
|
मुडी काही वासबीस येत नाही कान्द्याचा दिनेशभाईन्नी सान्गीत्ल्याप्रमाणेच केलीस तर. अगदी step by step वर लिहील्याप्रमाणे करून पहा. मी ह्या आधी आले लसूण, कान्दा टोमॅटो वापरून स्टॅन्डर्ड रेसिपी वापरून केले होते पण त्या चवीत खूप फरक पडतो. method did the trick. सान्गीत्ल्यासारखेच आले लसूण पण कमी घाल त्याचा mild flavour अगदी कळतनकळत बरा वाटतो. ट्राय कर फरक कळेल तुला.
|
Moodi
| |
| Wednesday, March 15, 2006 - 10:17 am: |
| 
|
दिनेश काल रात्री केले होते आलू मटार. पण मी त्यात आयत्यावेळेवर फ्लॉवर सुद्धा थोडा उकडवुन घातला. छान झाले होते. पण उकडलेल्या कांद्याची अजुनही मनात भिती आहे ग किटकॅट, म्हणुन कांदा कच्चाच किसुन घातला. अन नेमके काजु संपल्याचे लक्षात आले, मगज पण नव्हता. मग बदाम अन पिस्ते भिजवुन सोलुन वाटुन घातले तरी छान लागले. काजुची चव वेगळी असते हे मान्य पण हा प्रकार पण वेगळाच वाटला. 
|
Kitkat
| |
| Wednesday, March 15, 2006 - 11:01 am: |
| 
|
वा! , हे म्हणजे तुझे अगदी शाही आलु मटार झाले की ग मुडी! फ़्लॉवर घालून पण ह्या ग्रवी मधे तुझ्यासारखे ट्राय करायला पाहीजे. मला पण ह्या ग्रेव्हीची चव खूप आवडलीय! 
|
Aashu29
| |
| Saturday, July 08, 2006 - 8:34 am: |
| 
|
magaj mhanaje kaay dineshda? (ek. bha. pra.)
|
Saj
| |
| Monday, July 30, 2007 - 9:28 pm: |
| 
|
dinesh tumachya padhatine mi parva aalo-matar-paneer kele hote. ekdam zakas. hotelchi bhaji fiki padel itki chan chav alli hoti. Thank you sooooo much.
|
Aditi
| |
| Thursday, August 16, 2007 - 1:06 pm: |
| 
|
दिनेश दादा, तुमच्या पद्धतीने आलू-मटर केले होते. खूप छान झाले होते. स्वत्: वरच खूष झाले होते पण खरे श्रेय तुमच्या रेसिपिला आहे. किती थोडा मसाला वापरून किती सुन्दर चव येते हे कळले. Thank you so much !!
|
मटर्-मसाला २ वाट्या ताजे किंवा फ्रोझन मटर दाणे चवीपुरतं मीठ २ हिरव्या मिरच्या एक जुडी कोथिंबीर १ वाटी खवलेला ओला नारळ पळीभर तेल ३-४ लवंगा १ छोटा तुकडा दालचिनी १ तमालपत्र (तेजपान) १ लहान चमचा लिंबाचा रस (हळद, टोमॅटो घालून रंग बदलायचा नाही ) नारळ, कोथिंबीर, मिरच्या, लवंग, दालचिनी मिक्सरमधून बारिक वाटून घ्यायचं. गरम तेलात तेजपान घालून हे वाटण परतून घ्यायचं. मटार घालून पुन्हा ३-४ मिनिटं परतायचं. मसाला कितपत घट्ट हवा ह्यावर अवलंबून आधणाचं पाणी घालायचं. मीठ घालून, उकळी आली की गॅस बंद करून लिंबाचा रस घालायचा. हवं तर ह्यात पनीर तुकडे किंवा बटाटे तळून घालता येतात.
|
Chioo
| |
| Tuesday, April 15, 2008 - 2:25 pm: |
| 
|
मृ, खूप खूप धन्यवाद. ही छान वाटते आहे आणि पार्टीलापण चालेल.
|