Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Aloo Punjabi

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » बटाट्याच्या रेसिपीज » Aloo Punjabi « Previous Next »

Sharmila_72
Wednesday, March 08, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आलू पंजाबी

५०० ग्रॅम बटाटे, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, पाव कप चिरलेली कोथिंबीर, १ टेबलस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून आमचूर (heaped) , अर्धा चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, थोडा कढीपत्ता, ३ ते चार टेबलस्पून तेल, पाव चमचा जीरे, a pinch of hing

तेल गरम करून जीरे, हिंग टाकून, मिरच्या, कढीपत्ता घालून जरा परतावे. धणेपूड, मीठ टाकून लगेच उकडलेल्या बटाट्याच्या फोडी टाकाव्या व परतावे. आमचूर घालावे, परतून गरम मसाला घालावा, कोथिंबीर घालावे. आणि हे सर्व १० मिनिटे परतत रहावे.

मी बटाट्याच्या फोडी जरा लहान लहान करते म्हणजे छान चव लागते मसाल्याची. थोडा mash झाला तरी चालतो मला.


Tanya
Wednesday, March 08, 2006 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला... thanks! खर तर मला अशीच रेसिपी हवी होती, आमच्या इथे असणार्‍या पंजाबी हाॅटेलमध्ये अशीच, थोडी सुके मसाले असलेली भाजी मिळते. exact recipe ठाऊक नव्हती, ती दिल्याबद्दल thanks!

Tanya
Thursday, March 09, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला... आजच तुझ्या recipe प्रमाणे बटाट्याची भाजी केली. मस्तच झाली. फक्त मी त्यात जरा हळद add केली. recipe बद्दल परत एकदा thanks!

Moodi
Friday, March 24, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला काल रात्री केली होती ग तुझ्या पद्धतीने लिहीलेल्या बटाट्याची भाजी. एकदम मस्त झाली होती, पण माझ्याकडे आमचूर नव्हता, तरी छान लागली. अन मिरची मात्र मी मिर्ची कटर मधुन काढुन फोडणीत घातली, तरी जास्त तिखट नाही झाली.
तुझे २ गालगुच्चे घेतलेत नेटवरच.


Marathifan
Friday, July 06, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि भाजी फ़ार म्हणजे फ़ारच छान होते अणि पटकन होते.... केलि कि सगळेजण तारीफ़ करतात (भाजिचि !!)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators