Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
साबुदाण्याची लापशी / खीर ...

Hitguj » Cuisine and Recipies » आमटी, कढी, पिठले » साबुदाण्याची लापशी / खीर « Previous Next »

Bee
Thursday, February 23, 2006 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू पिळून आणि लाल तिखट घालून साबूदाण्याची खीर खूप छान लागते. फ़ोडणी तुम्हाला हवी तशी. पण एक मात्र विसरू नका. साबूदाणा छान भिजलेला हवा. अगदी टपोरा व्हायला हवा.

Sashal
Thursday, February 23, 2006 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाल तिखट घालून खीर? ही कशी करतात? recipe लिही बघू ..

Bee
Friday, February 24, 2006 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल, कृती अतिशय सोपी आहे. गोड खीरीमध्ये आपण दुध आणि साखर घालतो त्याऐवजी तिखट खीर करताना अनुक्रमे तेल आणि तिखट घालायचे फ़क्त प्रमाण मात्र भरपूर कमी कर. वेलदोडा, केसर वगैरे नको घालूस. त्या ऐवजी इतर फ़ोडणीचे साहित्य घालू शकतेस. पण माझ्या चवीला फ़क्त लिंबू, लाल तिखट, मीठ इतके पूरे आहे. साबूदाना मात्र फ़ुललेला हवा.

Psg
Friday, February 24, 2006 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे तिखट खीर शिजवायची कश्यात? पाण्यात? गोड खीर दूधात शिजवतात! कृती नीट दे कि: साहित्य किती, कस करायच म्हणजे असे प्रश्ण पडणार नाहीत!

Bee
Friday, February 24, 2006 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Psg- आधी फ़ोडणी करायची. कढीपत्ता, हिंग, जिरे आणि लाल तिखट इतकेच फ़ोडणीला लागते. हळद घालायची नाही. दोन चमचे तेल किंवा तुपात फ़ोडणी द्यायची. नंतर साबूदाण्याच्या तिप्पट पाणी घालून उकळी येऊ द्यायची. त्यात अर्धा लिंबू पिळायचा, मीठ घालायचे, थोडे ढवळायचे. बस झाली खीर. लिंबू आणि लाल तिखट हे साहित्य हवेच. थोडी साखर घातली तरी चालेल. जर खूप आंबट झाली असेल तर चिमूटभर साखर घालावी.

Moodi
Friday, February 24, 2006 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी इथे सगळ्या तरुण पोरी तुला हे विचारतायत ते बरय, एखादी तुझ्या शेजारचीच आजीबाई तुझ्या पाठीत रट्टा हाणुन तुला म्हणेल की उपासाच्या पदार्थात साबुदाण्याची खीर लिहीतो अन त्याला कढीपत्ता अन हिंगाची फोडणी कशी घालतोस रे?

आमच्या शेजारच्या काकु साबुदाणा चांगला भिजवुन त्यात थोडे ताक किंवा दही, बारीक चिरलेली हिरवी मिर्ची अन कोथिंबीर, चिमुटभर मीठ अन साखर तसेच दाण्याचे कुट घालुन तशीच खायच्या. मस्त लागायचे ते. करुन बघ. पण साबुदाणा मऊ भिजला पाहिजे अन ताक किंवा दही पण आंबट नको, ताजे हवे.


Bee
Friday, February 24, 2006 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपवासाला कढीपत्ता चालत नाही का? नसेल तर वर तो एक सोडून बाकी सगळे अचूक आहे. उपास बाटणार नाही.


Moodi
Friday, February 24, 2006 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग माझा तो जन्मसिद्ध हक्क आहे अन तो मी बजावणारच.

अरे बाबा खरच उपासाला हिंग सुद्धा चालत नाही.

खरे तर मुळात साबुदाणा अन बटाटा पण नाही कारण ते परदेशी आहेत अन त्यांच्याकडे कुठे ही कल्पना उपासाची?

एकदा आपले श्री. शंकराचार्य एकाला म्हणाले होते की उपासाला पोहे अन गुळ सुद्धा चालतात.
मात्र मला वरीचे तांदुळ बरे वाटतात उपासाला.


Psg
Friday, February 24, 2006 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, मी कढीपत्ता आणि हिंगाबद्दल लिहिणार होते, पण म्हणल हा उत्साहाने recipe सांगत आहे, आपण स्वयंपाक-कुशल आहोतच, समजून घेऊ


Bee
Friday, February 24, 2006 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, उपासाला धणे चालत नाही तेंव्हा माझे असे अनुमान आहे की कोथिंबीरही चालत नसेल. मूडी, वरई बरेच जण उपासाला खात नाहीत. प्रांतानुसार उपासाला काय चालते काय चालत नाही असे दिसते.

Psg- खरी सुगरण तुच आहेस इथे :-)


Moodi
Friday, February 24, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घ्या याचे अनुमान बघा, म्हणे कोथिंबीर चालत नाही. अरे बी वरई फक्त महाशिवरात्र, सोमवार अन प्रदोषाला चालत नाही, बाकी केव्हाही चालते.

पुनम...


Gajanandesai
Friday, February 24, 2006 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपासाच्या पदार्थात मसाल्यापैकी म्हटले तर आमच्यात फक्त मिरचीच चालते.
कोथिंबीर, जिरे, धने, कढीपत्ता वगैरे काहीच नाही.:-(


Nalini
Friday, February 24, 2006 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या गावीही उपवासाला कोथिंबीर, जिरे, धने, कढिपत्ता काहिच चालत नाही, आणि बर्‍याच ठिकाणी आपले साधे मिठपण चालत नाही, सैंधव मिठ घालतात.
नवरात्रात जे उपवास करतात त्यावेळी तर भेंडी पण चालते. त्यामुळे जी कृती दिलिय त्यातले जे जिन्नस आपल्याला चालत नाहीत ते वगळुन आपल्या सोईप्रमाणे प्रकार बनवायचे.
सगळेच जिन्नस घालुन करायचे असेल तर उपवासाव्यतिरीक्त एखाद्या दिवशी करायचे.. हाय काय अन नाय काय.


Varadakanitkar
Wednesday, March 08, 2006 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे अजुन सोपी रेसीपी आहे एक. ज़िर आणि तुपाची फ़ोडणी करायची मिरची पण घालायची त्यावर भिजवलेला साबुदाणा घालायचा मग त्यात ताक आणि दाण्याच कूट घालायच आणि मीठ घातल की झाली झाली तिख़ट खीर तयार.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators