Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मिश्र डाळीचा पराठा. ...

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पराठे » मिश्र डाळीचा पराठा. « Previous Next »

Dineshvs
Tuesday, February 28, 2006 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिश्र डाळींचा पराठा.

मुंबईत हल्ली मिश्र डाळी बाजारात मिळतात. अर्थात घरीहि अश्या मिसळुन ठेवता येतील. तुर, मुग, मसुर आणि ऊडिद डाळी मिसळुन घ्याव्यात. त्यात थोडे पिवळे वा हिरवे मुग घातले तरी चालतील. ऊडदाची डाळ जरा कोरडीच भाजुन घेतली तर छान.
या डाळी घोळुन धुवुन घ्याव्यात. स्वच्छ पाणी निघेस्तो धुवाव्यात. मग दोन तीन तास भिजत ठेवाव्यात. नीट भिजल्या कि निथळुन त्याला हळद व हिंग चोळुन, पाणी न घालता, कुकरच्या डब्यात आठ मिनिटे ऊकडुन घ्याव्यात. ( याची दाल फ़्रायहि करता येते ) मग थंड झाले कि लसुण व हिरवी मिरची घालुन मिक्सरमधुन काढाव्यात. त्यात मीठ, हिंग व लाल तिखट घालावे. दोन कप पुरण असेल तर अर्धा चमचा सुंठ पावडर घालावी. हे मिश्रण खुपच कोरडे होते. त्यात ओलेपणासाठी, एक लहान कांदा किसुन घालावा. सारण जरा जास्त तिखटच हवे. तसेच त्यात अर्धा चमचा साखरहि घालावी.

एवढ्या प्रमाणासाठी दोन कप कणीक घ्यावी. त्यात मुठभर कोथिंबीर बारिक करुन घ्यावी. किंचीत हळद, हिंग, मीठ व तेल घालुन चपातीपेक्षा थोडी घट्ट कणीक मळावी.
सारनाचे सहा भाग करुन, कणकेचे ऊंडे करुन त्यात सारण भरावे. हे ऊंडे काळजीपुर्वक करावे, कारण पराठे लाटताना फ़ुटायची शक्यता असते.
तांदळाच्या पिठीवर जाडसर पराठे लाटुन, मंद आचेवर तेल सोडुन दोन्हीकडुन भाजुन घ्यावेत. खाली ऊतरुन वर तुप लावावे व वरुन चाट मसाला शिवरावा. दह्याबरोबर खावेत.



Moodi
Tuesday, February 28, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश मस्त रेसेपी आहे हो, अगदी दहीच काय कैरीचे झणझणीत लोणचे पण मस्त लागेल याच्याशी.

Prady
Tuesday, February 28, 2006 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,

खूप छान आहे ही रेसिपी. आजच करून बघीन. पूरण पोळी आणी त्या प्रमाणेच भरून करायचे पराठे करताना माज़ी आई तो भरलेला कणकीचा उन्डा मोठी प्लास्टीक ची पिशवी कापून अपना बाजार वगैरेच्या जशा येतात थोड्या दणकट्) त्याच्या आत ठेऊन लाटते. अस केल्याने हवा तसा पराठा पसरवता येतो. लाटताना पिठी कमी लगते.फ़ुटून सारण बाहेरही येत नाही आणी खूप सोप जात लाटायला. कदाचित तुम्हाला माहितही असेल मी आपली सगळीकडे जाऊन काही न काही लिहित असते. बर्याचदा ती माहिती तुम्हीच आधी कुठेतरी दिलेली असते.


Bee
Wednesday, March 01, 2006 - 2:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ही कृती आवडली पण खूप कठीण वाटते आहे. तरीही मी एकदा तरी करूनच बघणार आहे.

Prady
Wednesday, March 01, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी करून पाहिले आज हे पराठे.मसूर डाळ नव्हती मग चणा डाळ घातली. आणी कान्द्या ऐवजी गाजर घातल ओलेपणासाठी. पण अजून थोडा वेरिएशन करता येइल का. थोड अजून चट्पटीत करायला. चाट मसाला सारणात घातला तर कदाचित.पण हेल्थी रेसेपी.धन्यवाद दिनेश.

Dineshvs
Wednesday, March 01, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prady कणकेत पण मिरची बारिक करुन घालता येईल. पुदिनाहि बारिक करुन घालता येईल. असे कणकेत हळद व हिरवे काहितरी घातले कि पराठे छान दिसतात.
चाट मसाला वरुन घातला तरच चटक मटक लागतो. सारणात चव नाही लागणार.


Bee
Thursday, March 02, 2006 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरुन म्हणजे कसे दिनेश, पराठे करून झाल्यानंतर का? म्हणजे हलकेच चाट मसाला भुरभुरायचा का?

आणि हा चाट मसाला म्हणजे गोलगप्प्यात टाकतो तोच ना?


Chafa
Thursday, March 02, 2006 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तू हे सगळं मुद्दाम करतोस का? का उगाच प्रश्न विचारायचे म्हणून विचारतोस? आता चाट मसाला म्हणजे कुठला असा प्रश्न कोणाला का पडावा? चाट मसाल्याच्या पाकीटावर स्पष्ट लिहीलेलं असतं चाट मसाला म्हणून. तो कुठल्याही ' चाट' मधे वापरता येतो. पण तिथेच वापरावा असा लिखित नियम नाही. माझ्या माहीतीत वेगवेगळ्या प्रकारचे चाट मसाले मिळत नाहीत. तुमच्याकडे तसे मिळतात का? आणि म्हणून तू हा प्रश्न विचारला आहेस का?

दुसरा प्रश्न ' वरुन म्हणजे कसे ' ? अरे हा काय प्रश्न झाला का? वरुन म्हणजे जे खालून नाही ते. आणि पराठे करुन व्हायच्या आधीच घातलास तर चिकटणार नाही का सगळा तव्याला? आणि हलकेच भुरभुरायचा का हे कशाला विचारायला पाहीजे? बदाबद ओतून तुला आवडणार आहे का? नाही ना? मग?

माफ करा दिनेश, प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते पण मला राहवलं नाही.


Bee
Thursday, March 02, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्या, तुझ्या इतकाचा मीही दिनेशचा चाहता आहे तेंव्हा त्यांच्याशी तरी मी थट्टा करणार नाही. तसे मी कुणाचीच थट्टा इथे करत नाही.

मी मागेही इथे विचारले होते चाट मसाल्याबद्दल मला त्याचे उत्तर नाही मिळाले म्हणून आता दिनेशला विचारतो आहे. इथे मी चाट मसाला खूप शोधला. इथे अनेक प्रकारचे मसाले मिळतात पण मग चाट मसाला कुठला ह्या संभ्रमात मी पडलो. एक पाणीपुरीचा मसाला मिळाला त्यालाच मी विकत घेतले नि हाच चाट मसाला असणार असे गृहीत धरले आहे. अजून माहिती नाही चाट मसाला नेमका कुठला.

चाट मसाला जर पिठात मिसळला तरी तो वरतून शिंपडूनच घालावा लागेल. जर तो परठ्यावर भुरभुरुन घालायचा असेल तरी तो वरुनच भुरभुरावा लागेल. म्हणून मी परत एकदा संभ्रमात पडलो की नेमका वरुन चाट मसाला घालायचा म्हणजे कसा. मी असे अनुभवले आहे आपली मेनू करायची थोडी जरी रित चुकली तर हवी असलेली चव त्याला येत नाही. मी अजून नवशिक्याच आहे तेंव्हा मला अशा मुलभूत माहितीची गरज आहे. दिनेश आणखी इतर मला सतत माहिती पुरवणार्‍यांना मी संकोच न बाळगता विचारतो. ते माहिती देतातही, मला त्याचा उपयोगही होतो. इथे त्या सर्वांचे आभार मानतो.

गैरसमज टाळण्यासाठी मी तुला प्रामाणिक उत्तरे दिलीत ती तुला पटली असतील अशी मी अपेक्षा करतो.


Shyamli
Thursday, March 02, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय बी....
चाट मसाला असा वेग़ळा मीळतो.....
नाहीच मिळाला तर तुम्हाला मिळालेला पाणिपुरी मसाला पण चालु शकतो...
ह्यात असणारे घटक मुख्य म्हणजे....
सैंधव आणि अनार दाणा याची चव हे आहेत

आणि हा वरुन घालायचा म्हणजे
पराठा तयार झाल्यावर ताटात वाढुन घेताना अगदी जरासा भुरभुराय्cअच....


Lalu
Thursday, March 02, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी अरे हे बघ त्याचे चित्र. असा दिसतो तो.


तरी गोन्धळ होत असेल तर तयारच का करत नाहीस घरी? ही बघ रेसिपी.
http://www.recipezaar.com/111581

पिठात घालयचा असेल तर पराठा तयार व्हायच्या आधी घालावा लागेल. आणि पराठ्यावर घालायचा असेल तर तो ( पराठा ) तयार झाल्यावर. पण दोन्ही वेळी वरुनच घालावा लागेल.

तुझं बरोबर आहे, रेसिपी बरोबरच तंत्रही महत्वाचं असतं. हे वाटल्यास नन्तर उडवा.

Chafa
Thursday, March 02, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण दिनेशनी स्पष्ट लिहीलंय ना वरती की सारणात चव नाही लागणार. याचा अर्थ पराठा करुन मग सगळ्यात शेवटी वरुन भुरभुरायचा. आणि फक्त पीठात नुसता वरुन भुरभुरता येणारच नाही ना. मग त्यात आहे काय अन् नाही काय. हे सगळं लक्षात घेतलं तर, ताटात वाढून घेतांना वरुन भुरभुरणे असा एवढा एकच अर्थ निघू शकतो. असो, पण तुला खरोखर प्रामाणिकपणे हे प्रश्न पडले असतील तर मग हरकत नाही.

Bee
Thursday, March 02, 2006 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु, धन्यवाद माझी गरज समजून घेतल्याबद्दल. पण इथे हा बादशहा ब्रॅंड मिळत नाही. इथे चाट मसालाच मिळत नाही असे मला वाटते आहे. नाहीतरी माझ्या नजरेला तो कधीतरी आला असता.

चाफ़्या अरे सारण आपण उंड्यात भरतो. कधीकधी सारणा खेरीज उंड्यातही काहीबाही वरुन टाकतोच ना.. मी ओवा टाकतो.. म्हणजे आता वरुन चाट मसाला टाकण्याचे तीन प्रकार झाले. तू म्हणतो तेंव्हा ताटात वाढून घेतानाचा चौथा प्रकार. मला सारणाचे लक्षात आले आहे आधीच.


Seema_
Thursday, March 02, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु,चाफ़ा
या चर्चेसाठी एक bb का उघडीत नाही? ते बर पडेल


Bee
Thursday, March 02, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रकार एक - पिठ मळवताना
प्रकार दोन - सारणात
प्रकार तीन - पराठे करून झाल्यानंतर त्यावर
प्रकार चार - ताटात वाढून घेताना

चाट मसाला वरुन घेण्याचे हे चार प्रकार झालेत. आणखी पाचवा नसेल म्हणजे झाले.


Moodi
Thursday, March 02, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी आता तू इथे जा बर, नाहीतर पाठीत धपाटा, पराठा घालेन.

/hitguj/messages/103383/54830.html?1141317658 .

Seema_
Thursday, March 02, 2006 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,मुडी खरच बास आता . HHPV अगदी .


Moodi
Thursday, March 02, 2006 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा आता तू अनुक्रमे health , कांदापोहे इथे पण जाऊन ये. पोट मग खुपच जास्त दुखेल.

Dineshvs
Friday, March 03, 2006 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाट मसाला हा नेहमीच वरुन पसरुन घालायचा असतो. शिजवल्यावर त्याची चव जाते.

Prady
Friday, March 03, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पर्वा हे पराठे केले तेव्ह डाळ जरा जास्तच भिजवली गेली.पहिल्यान्दाच करायचे पराठे म्हणून सगळी डाळ नाही वापरली. आणी मग आता त्या शिजवलेल्या डाळीच काय करायचा. नवरा म्हणाला डाळवडे कर. हितगुज वर थोडी शोधाशोध केली तर कोबीच भानोल' म्हणून रेसेपी दिसली. मी विचार केला त्या रेसेपी मधे ही डाळ भरड वाटून घातली तर छान कुरकुरीत वड्या होतील.पण सगळ करून प्रयोग फ़सला. इतक सगळ करून फ़ेकून देण जिवावर आला होत पण काय करवा कळत नव्हत. हताश पणे मी तो एकूणच झालेला विचका बघत होते. आणी अचानक नजर सासुबाईनी पाठवलेल्या थालिपिठाच्या भजणी वर पडली. म्हन्टल चला अजुन एक प्रयोग. आणी खरच छान कुरकुरीत खमन्ग थालिपिठ झाली. शेवटी एक प्रयोग फ़सता फ़सता सावरला.

Dineshvs
Friday, March 03, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाळ शिजवली नसती तर कोबीची भजी वा वडे छान झाले असते.
शिजवलेल्या डाळीचे थालीपीठ चांगले होतेच, धपाटेहि होतात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators