|
Bee
| |
| Thursday, February 23, 2006 - 8:10 am: |
| 
|
कुणाला बटाट्याची कुरकुरीत लागणारी भाजी माहिती आहे का.. कृती मिळेल का? मी काल पाणी न घालता, टोमॅटो न घालता अशी भाजी करून पाहिली पण ती करपली. नंतर भांडे खरडावे लागले मला.
|
बी, काचर्या म्हणायच आहे का तुला? मी करते अशी कुरकुरीत भाजी. वरण भात तूप आणि त्याबरोबर ही भाजी. अहाहा, मस्तच ! बटाट्याच्या पातळ फोडी करुन घ्यायच्या. पाण्यातुन काढायच्या म्हणजे चिकटपणा जाईल. निथळुन कोरड्या होउ द्यायच्या. कढईत तेल तापवून त्यावर फक्त चिमूटभर हिंग टाकायच, त्यावर लगेच या फोडी टाकून परतायच. अजिबात पाणी न घालता गॅस अगदी बारीक ठेऊन वर झाकण द्यायच. साधारण ३ मिनिटे. झाकण काढून परतायच. बटाटा कुरकुरीत व्हायला लागेल. मग हळद, तिखट, मीठ टाकुन परत परतायचा. तुझ्या मनासारखा बटाटा कुरकुरीत झाला कि झाली भाजी तयार. या भाजीला कमी घाल तिखट. नाहीतर बटाट्याची चव जाईल. नेहमी पेक्षा तेल जरा जास्त घे. भाजी झाल्यावर जास्तीच तेल काढुन टाक, नाहीतर भाजी मऊ पडेल.
|
अजून एक पद्धत. बटाटे फ़्रेंच फ़्राईज साठी कापतो तसे कापून घे. कढईत तेल तापवून हिंगावर या लांबट फोडी टाकुन वरील प्रमाणे परत. परतताना थोडे तीळ, तिखट, मीठ घाल. परतल्यावर, साखर घाल. ढवळुन खाली उतरवून वरुन खवलेले खोबरे, कोथिंबीर घाल. हव्या असल्यास थोड्या ग्लेझ्ड चेरीज लांबट कापुन टाक. ही भाजीखूप कुरकुरीत नाही होत.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|