Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नवलकोलाची (Kohlrabi) भाजी ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » कोबी, फ्लॉवर, नवलकोल » नवलकोलाची (Kohlrabi) भाजी « Previous Next »

Sampada_oke
Wednesday, February 22, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंगूताई, दिनेश त्यांची रेसिपी देतीलच, तोपर्यंत मी ही भाजी कशी करते हे सांगते.

साहित्य:- १. नवलकोल
(Kohlrabi) २ छोटे, जास्त मोठे असल्यास जून निघतात.
२. थोडीशी चणाडाळ आणि शेंगदाणे, भिजत घालून ठेवणे.
३. नारळाचे दूध विकतचे घेतल्यास घट्ट असते म्हणून १ वाटीभर.
४. बेसन १ मोठा चमचा भरून.
५.लवंग, दालचिनी, जिरे,धने पूड सर्व मिळून १ मोठा चमचा.
६. चिंचेचा कोळ १ चमचा.
७.गूळ व मीठ चवीनुसार.
८. फोडणीचे साहित्य.
९. आवडत असल्यास हिरवी मिरची, नाहीतर लाल तिखट छोट चमचाभरून.

कृती:- १. नवलकोलाची साले काढून छोटे तुकडे करावेत व कुकरमधे शिजवून घ्यावे. शिजवतानाच डाळ आणि शेंगदाणे सुद्धा त्यातच घालावेत.

२. नारळाच्या दुधात लाल तिखट, धने, जिरे इ. पूडी घालून, चिंचेचा कोळ, गूळ,मीठ घालून तयार ठेवावे. त्याला पाण्यात कालवून बेसन लावावे व अजून थोडे पाणी घालून थोडेसे पातळसर दूध बनवून ठेवावे.

३. पातेल्यात तेलाची फ़ोडणी करून, कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे घालून मग नवलकोलाचे तुकडे, डाळ आणि शेंगदाणे घालून परतावे.

४. मग तयार केलेले नारळाचे दूध घालून उकळावे, जास्त घट्ट होऊ देऊ नये.

५. वरती चिरलेली कोथिंबीर घालावी.

खाली नवलकोलाचे
(Kohlrabiआमच्याकडे मिळते तशा भाजीचे) चित्र देत आहे.


Kohlrabi

Psg
Wednesday, February 22, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, चित्रासकट परिपुर्ण recipe ! :-)
मी अशीच करते. नारळाचे दूध नाही, ओल खोबर घालून नुसतीच शिजवते, पण त्यामुळे नवलकोलाचा उग्र वास पुर्णपणे जात नाही. नारळाच्या दूधामुळे यायचा नाही. idea छान आहे!


Sampada_oke
Wednesday, February 22, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, या पद्धतीने नवलकोलाची भाजी केलीस तर उग्र वास येणार नाहीच आणि कोणाला कळणार सुद्धा नाही,त्यात नवलकोल आहे हे. खूप छान होते भाजी.

अगं चित्र यासाठी, की मी नक्की कशाला नवलकोल म्हणतेय हे कळलेले बरे. उगाच गोंधळ नको.


Nandita
Wednesday, February 22, 2006 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा चित्र टाकलस हे बर केलस हं, मलाही नवलकोल बद्दल confusion hÜt :-)

Moodi
Wednesday, February 22, 2006 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा मस्त आहे कृती. मी नेहेमी मुगडाळ घालुन करते, मात्र नारळाचे दुध नाही कधी वापरले, आता बघितले पाहिजे तसे करुन.

Sampada_oke
Wednesday, February 22, 2006 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी आई नेहमी याच पद्धतीने करते ही भाजी. असाही आमच्याकडे नारळ किंवा नारळाचे दूध आणि चिंच गूळ सर्वच भाज्यांत असतो.:-)
मला वाटते, सौ. निर्मला टिळक ह्यांच्या' पार्टी पार्टी' ह्या पुस्तकात अशीच कृती दिलेली आहे.


Chingutai
Wednesday, February 22, 2006 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanx Sampada.
Aaj ghari gele ki karun pahate.
Mazi Aaji, Navalkolache don tukade karun te Naralasarakhe khavanayachi...itakach aathvatay

-chingi

Dineshvs
Wednesday, February 22, 2006 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि माझी खास आवडीची.
दोन मध्यम अलकोल किसुन घ्यावेत. पिळु नयेत. अर्धा ईंच आले, बारिक चिरुन घ्यावे.
तेलाची फ़ोडणी करुन त्यात मोहरी, कडीपत्ता व आले घालावे. हिंग हळद घालुन, हवा तर एक लहान बारिक चिरलेला कांदा घालावा. ( घातला नाही तरी चालेल ) मग त्यावर किस टाकावा. जरा परतुन पाण्याचे झाकण ठेवावे.
नीट शिजला कि त्यावर लाल तिखट घालावे, मीठ घालावे. हवे तर थोडे ओले खोबरे घालावे. व वरुन पाऊण कप बेसन शिवरावे. नीट परतुन साधारण कोरडे करावे. आंबटपणासाठी फ़ोडणीत एखादा टोमॅटो बारिक चिरुन घातला तर चव छान येते व रंगसंगती पण छान दिसते.
मंद आचेवर जरा खमंग भाजले तर मोकळी होते हि भाजी.


Dineshvs
Wednesday, February 22, 2006 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलकोल कसा बघुन घ्यायचा त्याबाबत मी लिहिले होतेच, परत लिहितो.
अलकोल जमिनीच्या वर लागतो, त्यामुळे त्याला माती नसते, खाली मुळ असेल तर चांगले, भारतात ते तासुन टाकलेले असते.
पाने पिवळी पडलेली नसावीत. बाहेरचे पान ओढले तर ते चटकन तुटायला हवे. त्या बरोबर जर काहि शिरा आल्या तर, अलकोल जुन असतो. साधारण ५ सेमी पेक्षा जास्त व्यासाचा घेऊ नये, जांभळट छटा असली तरी घेऊ नये.
अलकोलच्या पानाची पण चणा डाळ घालुन भाजी करतात.


Arch
Wednesday, February 22, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आईची खास recipe :

नवलकोल जसा नारळ खऊन घेतो तसा खऊन घ्यायचा. वरच टरफ़ल नारळाच्या करवंटीप्रमाणे रहात. मग हिंग, मोहोरी, कढिपत्ता, आणि हिरव्या मिरच्याची फ़ोडणी करून थोडी हळद घालायची. त्यात भिजवलेली मूगाची डाळ टाकायची. ती थोडी परतली की त्यात खवलेला नवलकोल घालायचा. एक वाफ़ आली की भरपूर खवलेला नारळ, कोथिंबीर, चविपुरती साखर आणि मिठ घालायच. हव असेल तर थोड लिंबू पिळायच. ह्या भाजीला अजिबात उग्र वास येत नाही. खूपच पटकन होते आणि दिसतेपण छान.


Charu_ag
Tuesday, April 04, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा, तुझ्या पद्धतीने भाजी बरेचदा केली होती. यावेळी थोडा वेगळा प्रकार केला. अर्थात मूळ कृती तुझीच आहे. फक्त भाजी ऐवजी सूप केले. चिंच, गुळ, डाळ घालुन नवलकोल कुकरमध्ये शिजवला. गार झाल्यावर हे मिश्रन चांगले घोटुन घेतले. जिर्‍याची फोडनी केली आणि बेसन न घालता फक्त नारळाचे दुध घालुन उकळले. चवीला छान लागते हे सूप.

Dineshvs
Tuesday, April 04, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्यापेक्षा यरोपीअन अलकोल चवीला जास्त गोड असतात. हो ना ?

Sampada_oke
Tuesday, April 04, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंय दिनेश. मी अशा पद्धतीने केलेली नवलकोलाची भाजी मिटक्या मारत खाते हे माझ्या घरच्यांना खरंच वाटत नव्हते.:-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators