|
Gajanan1
| |
| Wednesday, February 22, 2006 - 5:10 am: |
| 
|
I want to cultivate mushrooms, especially oysters. Anybody has idea?
|
Gajanan1
| |
| Wednesday, February 22, 2006 - 5:21 am: |
| 
|
मला खालील शन्का आहेत... १. मश्रूम कुठल्या पदार्थावर चान्गले येतात. २. या पदार्थान्चे sterilization कसे करावे. ३. Infections कसे टाळावेत ४. याबाबत एखादी वेबसाइट आहे काय.
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 22, 2006 - 4:31 pm: |
| 
|
मश्रुम तांदळाच्या वा गव्हाच्या कडब्यावर चांगले येतात. त्यावर ऊकळत्या पाण्याची प्रक्रिया करावी लागते. बियाणे तयार मिळते. वेबसाईटपेक्षा शॉर्ट कोर्स करणे चांगले. रोजच्या वर्तमानपत्रात जाहिराती असतात. पण जर व्यवसाय करायचा असेल तर नीट स्टडि करायला हवा.
|
Vaatsaru
| |
| Wednesday, February 22, 2006 - 11:21 pm: |
| 
|
http://www.shroomery.org/index.php/par/3 BaartIya vaatavarNaat iktI ]pyaÜgaI pDola maaihtI naahI pNa google zindaabaad 
|
Moodi
| |
| Friday, February 24, 2006 - 12:01 pm: |
| 
|
मश्रुमसाठी. गोणपाट, चिंध्या, कागद अथवा पेंढा यांचे बारीक तुकडे करुन रात्रभर पाण्यात भिजवावेत. दुसर्या दिवशी सकाळी ते कापडी थैलीत भरुन पाण्यात उकळवुन निर्जंतुक करावेत व मग निथळावेत. बेड भरण्यासाठी 14" गुणिले 21" आकाराची प्लॅष्टीकची पारदर्शक पिशवी घ्यावी. पाव किलो दर्जेदार बियाणे व निर्जंतुक केलेल्या वरील गोष्टींपैकी एक वस्तु हे एकावर एक थर बसवुन पिशवी भरावी व तोंड दोरीने बंद करावे. बेड सावलीत २ आठवडे ठेवावा. नंतर तो पिशवी फादुन बाहेर काढावा व दमट पण थंड जागी तिवईवर अथवा बांबुच्या रॅकवर ठेवावा. व दिवसातुन ४ वेळा पाणी घालावे. बेड उघडल्यापासुन ६ व्या दिवशी अळंबी म्हणजे मश्रुम येते. घरगुती उत्पादनात जम बसला की ४०० चौरस फुटाचा शेड घेऊन पेंढाच वापरावा तो स्वस्त पडतो. तर ९ किलो पेंढा पुरतो तो बारदानात घट्ट भरुन पाण्यात ८ ते १० तास भिजवुन मग १ तास उकळवुन घ्यावा. यातील पाणी निथळुन गेले की १२ बेडस बनवावेत. सकाळी बेडवरुन तोडलेली अळंबी उर्फ मश्रुम त्याच दिवशी पॅcक करुन विक्रीस न्यावी. नाहीतर २ दिवस शीतपेटीत ठेवावी. नसेल जमत तर २ दिवस फडक्यावर अथवा कागदावर उन्हात वा सावलीत ठेवावी. ही सुकुन कडकडीत झालेली अळंबी वर्षभर सहज टिकते, अन पाण्यात १५ मिनिटे बुडवुन ठेवली असता ताज्यासारखी होते. अधिक माहितीसाठी खालील पत्ता आहे. डॉ. अशोक घाणेकर ३, जयश्री अपार्टमेंट, बी केबीनजवळ, नौपाडा,ठाणे पश्चिम. फोन नं आता बदलला असेल.
|
Moodi
| |
| Friday, February 24, 2006 - 12:13 pm: |
| 
|
ऑयीस्टरलाच मराठीत धिंगरी म्हणुन ओळखले जाते. अन जागतीक स्तरावर पर्ल मश्रुम म्हटले जाते. तसेच प्ल्युरोटस अन साजोरकाजू या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. २२ ते ३० तापमानाला उगवते. सरकारी कृषी विद्यापीठे हिचे बियाणे विकतात म्हणजे राहूरीला मिळायला हरकत नाही. हिला दर्जेदार बियाणे, पेंढा, पाणी अन मेहेनत बास. ताज्या अळंबीत 92 % पाणी, 4% प्रथिने, 3% तंतु, 1% खनिज अन ब व क जीवनसत्व आहेत.. इतर भाज्यांच्या तुलनेत ही चांगली कारण बद्धकोष्ठतेला लगाम घालते म्हणजे प्रथिने तर पुरवतेच पण पोटही साफ ठेवते. यात तांबे, लोह अन पोटॅश भरपूर. अळंबीच्या काही जाती कर्करोग विरोधी असुन रक्तदाब व मानसीक तणावही कमी करतात.
|
Champak
| |
| Friday, February 24, 2006 - 3:02 pm: |
| 
|
मुडी, धन्यवाद माहितीबद्दल! गजानन, माझ्या महाविद्यालयात म्हंजे पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात botany चे प्राध्यापक याबद्दल मार्ग दर्शन करतात अन ते ही विनामुल्य! तुम्ही तुम्हाला जवळ असेल अश्या loacal collage च्या botany dept. ला चौकशी केली तरी उपयुक्त माहिती मिळेल!
|
Gajanan1
| |
| Sunday, March 05, 2006 - 10:41 am: |
| 
|
Thanks to all. धन्यवाद. अतिशय सुन्दर माहिती दिलित सर्वानी.
|
Gajanan1
| |
| Friday, March 10, 2006 - 8:48 pm: |
| 
|
आज माझ्या मश्रूमच्या बेडवर मश्रूमचा एक पुन्जका उगवलेला आहे. त्यात सुमारे आठ ते दहा मश्रूम आहेत. काल छोटे बड होते. आणि बर्याच ठिकाणी आज बड आलेले आहेत. मला ट्रेनिन्ग देणार्याने लाकडाचा भुसा वापरायला सान्गितला होता. [ बहुतेक त्याच्या डोक्यातसुद्धा भुसाच भरलेला असणार] लाकडाचे ओन्ड्के बराच काळ पावसात पडून असतात. त्यावर इतर बुरशी मुळातच असतात. लाकडाचा भुसा होतानादेख़ील त्याचे अन्श त्यात येतात. sterilization करुनही अशा बेडवर हिरवी बुरशी येते. शिवाय असा भुसा पाणी जास्त शोशुन चिकट बनतो. त्यातून बुरशीचा त्रास आणि वाढतो मश्रूमची वाढ मात्र खुन्टते. शिवाय लाकूड जुनाट [ आपल्या बा- आज्जा- पणजाच्या काळातल ]असणार. त्यात किती neutrition असणार. त्यामुळे मी नन्तरचे बेड हरबर्याच्या आणि भाताच्या काडावर केलेले आहेत. त्यात मात्र चान्गली वाढ आहे. बेड भरणे हाताळणे याबाबत भाताचे पिन्जर the best . मी sterilization साठी formalin वापरत आहे. कारण उकळ्ण्याची प्रक्रिया अवघड वाटते. शिवाय formalin परिचित आहे. MBBS च्या पहिल्या वर्षाला dissection च्या डेड बॉडीज साठी ते वापरले जाते. शिवाय operation theatre शुद्ध करायलाही आम्ही ते वापरतो. त्यामुळे formalin [ आणि त्याचा नाकाला झिणझिण्या आणणारा आणि डोळ्याला पाझर फ़ोडणारा वास] माहीत आहे. सान्गलीचे विवेक बोडस देख़ील मश्रूममध्ये यशस्वी आहेत.[ ते सकाळी computer चे काम करतात. दुपारी DTP WORK करतात. रात्री भावगीते आणि गीतरामायणाचा कार्यक्रम करतात. ... मधल्या काळात मश्रूम्स दिवस चोवीसच तासान्चा म्हणून एवढच.. नाही तर आणखी काय काय केले असते ते 'श्रीक्रुष्णच' जाणे. ] बेडची मान्डणी कशी करावी याबाबत अजून विचार करणे चालू आहे. एकदा वापरलेले भाताचे पिन्जर आणि दहा वेळा वापरता येते असे मला एकाने सान्गितले आहे.[ मी देख़ील त्याला दहा वेळा विचारुन तो खरेच बोलत असल्याचे तपासलेले आहे.] क्रुपया याबाबत काही माहिती कुणी सान्गू शकेल काय? भाताचे पिन्जर असे 'दशावतारी' होऊ शकते का? बेड आणि मश्रूम्स यान्चे फ़ोटो लवकरच याहू वर टाकणार आहे. त्याची link येथे देईन. पेशन्ट एकदा बेडवर admit केला की त्याची फ़ार उसाभर करावी लागते. त्यामानाने मश्रूम बेडवर admit करणे कमी त्रासाचे आहे. शिवाय admit केलेले पेशन्ट रात्री डॉक्टरची झोपमोड करतात. तसा त्रास मश्रूमचा नसतो. शिवाय Discharge च्यावेळी पेशन्ट्ची बिलासाठी घासाघीस असते. तसा त्रास बहुधा मश्रूम देत नसावेत! आणि सर्वात महत्वाचे... admit झालेल्या पेशन्टला नातेवाइक असतात, जे मश्रूमला नसतात!!
|
Dineshvs
| |
| Monday, March 13, 2006 - 4:25 pm: |
| 
|
लाकडाच्या भुश्यात काय असणार ? पण वादळात पडलेल्या माडावर म्हणजेच नारळाच्या झाडावर जे मश्रुम ऊगवतात, ते फ़ार चवदार लागतात. " ऋतुचक्र " मधे दुर्गाबाईनी, लाकडाच्या फ़ळीवर ऊगवलेल्या मश्रुमला, लाकडाची फुले, असा शब्द वापरलाय.
|
Gajanan1
| |
| Tuesday, March 14, 2006 - 4:21 pm: |
| 
|
http://in.pg.photos.yahoo.com/ph/gajananprofits/album?.dir=/b40a मश्रूम फोटोग्राफ़्स १. स्पॉन भरलेले बेड्स २. लाकडाच्या भुश्याच्या बेडवर आलेले बड्स ३.४.उगवलेले मश्रूम्स ५.६.७. पूर्ण उगवून तोडलेले मश्रूम्स ८. Hanging Beds
|
Moodi
| |
| Tuesday, March 14, 2006 - 4:29 pm: |
| 
|
व्वा! गजानन अभिनंदन. मेहेनत रंग लायी, खर्या अर्थाने फळाला आली. 
|
Gajanan1
| |
| Sunday, April 09, 2006 - 6:49 pm: |
| 
|
स्पॉन कसे तयार करतात? ड्राय मश्रुम विकत घेणार्या पुण्यातील सन्स्थान्ची माहिती मिळेल काय?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|