Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
वरण भात

Hitguj » Cuisine and Recipies » भाताचे प्रकार » वरण भात « Previous Next »

Prajaktad
Thursday, February 16, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kitkat साठी वरण भाताची क्रुति
कुकर मधे पाउण ग्लास पाणी घालुन gas वर ठेवावा
कुकरच्या २ डब्यांपैकी मोठ्या डब्यात तुरिचि डाळ धुवुन ३पट पाणी घालावे(फ़ार चोळुन धुवु नये).
हिंग चिमुट्भर, आतपाव चमचा हळद,५ - ६ थेंब तेल घालावे.
आता भातासाठी तांदुळ धुवुन दुप्पट पाणी घालावे.
कुकर चा stand असेल तर खाली वरणाचा(डाळिचा) डबा त्यावर भाताचा तांदुळाचा)डबा ठेवुन stand lock करावा. stand नसेल तर कुकर मधे खाली भोकाची जाळी ठेवुन त्यावर डबे ठेवावे.झाकन लावुन pressure लावावे.
मध्यम आचेवर ३ शिट्या कराव्या.वाफ़ जिरुन झाकण निघाले कि झाले.
वरण गरम असताना घोटुन घ्यावे.मिठ आणि थोडे पाणि टाकुन उकळावे.


Maanus
Thursday, February 16, 2006 - 10:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि एकच पाककृती मी रोज खातोय हो...

फक्त मला कुणी हे सांगेल का की त्या फ्युच्यूराच्या कुकर मधे किती पाणी टाकायचे असते, दर वेळेस माझे गणित चुकते व सगळ्या गॅस वर पाणी पाणी होते.

मुग डाळिच्या वेळेस तर हमखास पाणी कुकर मधुन बाहेर येते.


Prajaktad
Friday, February 17, 2006 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

futuraa ज्याच्याकडे आहे त्यांनि सागर ला उत्तर द्या बर
माझ्याकडेच साधेच कुकर आहेत.
सागर रोज फ़क़्त वरण भातच कशाला खायला पाहिजे.जरा शोधले तर अनेक सोप्पे प्रकार तुला मिळतिल या बीबी वर
नाही सापडले तर विचार


Maanus
Friday, February 17, 2006 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपुलकेने चोकशी केल्याबद्दल आभारी आहे.

ऑफीस मधुन घरी गेल की काही काही करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे होते हे सगळे काही.

घरातल्यांना सांगतो आता ऑन्दा कर्तव्य आहे, अस सांगा दहा लोकांना... म्हनजे होईल माझी जेवनाची सोय.


Jayavi
Saturday, February 18, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर, मी वापरते futura . तू वरण भात एकत्र शिजवतोस का ? कुकरमधे जर भांड्यांमधे अन्न शिजवत असशील तर कुकरची खालची जाळी भिजेल इतकं पाणी घाल. तांदुळ आणि डाळीत साधारण दुप्पट पाणी घालावं. आधी pressure ठेवायचं नाही. थोडी वाफ़ निघायला लागली की pressure ठेव. मग थोड्या वेळानी शिट्टीसारखा फ़ुरफ़ुर आवाज यायला लागला की गॅस हळू करायचा आणि १० मिनिटानंतर बंद करायचा. futura ची शिट्टी वाजत नाही ती कुकर झाला की आपण वाजवायची असते :-)

Varadakanitkar
Thursday, February 23, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर तु करशील त्या भाताला थोडी जिर आणि मिरची ची फ़ोडणी दे आणि वरणात थोडा मसाला घालुन त्यालाही थोडी तीच फ़ोडणी दे. तुला जरा छान वाटेल.

Arun
Friday, February 24, 2006 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर : रोज रोज वरणभात खाऊन कंटाळा येणे स्वाभाविक आहे. त्यात बदल म्हणून पुढीलप्रमाणे करून बघ ........

Grocery shop मधून cut vegetables चं एक पॅक आण. कूकर मध्ये, प्रथम थोडं तेल घेऊन, हिंग, जिरं, मीरी, हळद, तिखट घालून फोडणी कर त्या फोडणीमध्ये cut vegetables टाकून नीट परतून घे. ५ मिनीटे नीट परतल्यानंतर स्वच्छ धुतलेले तांदूळ त्यात टाक. कूकर बंद करून साधारण ३ शिट्या होऊ देत.

या भाताला काय म्हणतात माहित नाही, पण करायला एकदम सोप्पा आहे, म्हणून suggest करतोय.

दही किंवा ताकाबरोबर असा भात खूप छान लागतो.

Bee
Friday, February 24, 2006 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, रोज रोज वरण भात खातोस ह्याचा अर्थ तुझ्यात कुठेतरी आळस दडला आहे. हळूहळू तू भाज्या करणे शिक, पोळ्या करायला शिक. बटाट्याची भाजी, वांग्याचे भरीत, कढी, चपाती हे सगळे फ़ार अवघड नाही रे फ़क्त आवड निर्माण व्हायला पाहिजे. हे काम फ़क्त बायकाच चांगल्या करू शकतात असे नाही. श्री दिनेश बघ बर.. सगळ्यांपेक्षा इथे त्यांना ठावूक आहे cooking बद्दल. त्यांचा आदर्श समोर ठेवायचा. परदेशात एक बरे की निवडून पाखडून स्वच्छ करून असलेले खायचे सामान मिळते. आणखी काय सुविधा असायला हव्यात.

तुझ्याकडे जर पातेले असेल तर भातासाठी कूकर वापरायची गरज नाही. उलट अर्धा वाटीभर तांदळाचा भात घालायला साधे चहाचे पातेले जरी असले तरी चांगले आहे कूकरपेक्षा. मूगाची दाळ पातेल्यात अधिक छान मोकळी शिकते. शिवाय उतू गेले की आपले लक्षही राहते. विविध भाज्या घालून सांभार जर करायचा असेल तर तोही पातेल्यात गरम पाणी आधिच ठेवून, सरसर भाज्या कापून सरळ पातेल्यात घालायच्यात की लवकरात लवकर कामे आटोपली जातात आणि हवा न लागल्यामुळे सत्व उडून जात नाही कापलेल्या भाज्यांमधले.

तू मला काहीही विचार. माझ्या परिने मी तुला उत्तर देईन. मार्गदर्शाला इथे भरपूर जण जणी आहेत तेंव्हा चिंता नसावी. welcome aboard!


Maanus
Friday, February 24, 2006 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे इथे लक्षच गेले नाही माझे २-३ दिवसात. वरदा, जयश्री, अरुण, बी आभारी आहे. तुमचे सल्ले मी नक्की लक्षात ठेवेल.

सध्या मी एक नविन प्रकार सुरु केलाय, रविवारी ५-६ दिवसाचा मसाला, म्हनजे ते कान्दा, जिरे, मोहरी, तिखट, नारळ वैगेरे वैगेरे, सगळे भाजुन मिक्सर मधुन काढुन ठेवतो. म्हनजे रोज भाजी करायला २० मिनटाच्या वर वेळ लागत नाही. भाजी करते वेळी २ चमचे मसले भाजायचे, त्यात भाज्या टाकायच्या की झाले काम :-)

हा weekly मसाला बनवायच्या काही recipies आहेत का?


Kitkat
Sunday, February 26, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, ह्या लिन्कवर आहे माहीती आठवड्याचा मसाला बनवायची
/hitguj/messages/103383/46076.html?1041163537

Moodi
Sunday, February 26, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस इथे पण आहे रे मसाले.

/hitguj/messages/103383/92933.html?1133204739 .

Maanus
Sunday, February 26, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा, काय सुंदर माहीती दिलीय तुम्ही... आभारी आहे

Mai
Tuesday, March 07, 2006 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खालिल प्रमाणे साधे वरण करुन बघावे
प्रथम थोडे पाणी उकळ्त ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ, गुळ, हिन्ग, हळद, व २ चमचे साजुक तूप घालुन मग शिजलेली तुर डाळ घालावी.
हे वरण वेगळेच लागते.


Saj
Wednesday, March 08, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi roj varan kartana tyatach 1 lasanachi pakali thechun,halad, hing,jeere, methi-dane aani thode tel ghalte. mhanje nantar nuste mith takun garam kele tari chan lagte.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators