|
Beti
| |
| Monday, January 20, 2003 - 11:12 pm: |
| 
|
माझ्या तमिळ मैत्रिणीची hostel recipie... authentic आहे कि नाही माहीत नाही. नारळाचा चव, थोडी भिजवलेली उडीद डाळ किंवा डाळे, चवीनुसार मीठ, जिरे, साखर (हे घाटी modification असावे) मिक्सरमधे जरा पाणी घालून जाडच वाटायचे. त्यात दही घालायचं आणि तुपाची फ़ोडणी जिरे, मोहरी, तांबड्या मिरच्यांचे मोठे तुकडे, कढीलिंब आणि थोडी जास्त उडीद डाळ घालून करायची. जरा कोमट झाली कि चटणीत घालायची. नाही तर दही फ़ुटते. दही नको असेल तर पाणी घालून चटणी सारखी करायची.गरम फ़ोडणी चालते.
|
Chiku
| |
| Friday, August 04, 2006 - 7:54 pm: |
| 
|
मी इडलीची डोश्याची चटणी अशी करते १ नारळ खवुन, १ वाटी चण्याची डाळ, ( South Indian चटणीत उडिद डाळ वापरतात) ४-५ तास भिजत घालावी, १ हिरवी मिरची, पाव वाटी चिंच कोळुन त्याचे पाणी, पाउण वाटी कढिपत्त्याची पाने, ४ चमचे उडिद दाळ, ४ सुक्या लाल मिरच्या, मीठ. वरील साहित्यातील अर्धी कढिपत्त्याची पाने, उडिद डाळ, २ सुक्या मिर्चीचे तुकडे थोड्या तेलावर डाळ लाल होईपर्यंत परतुन घ्यावे व थंड होऊ द्यावे. नारळ, चण्याची डाळ, १ हिरवी मिरची, मीठ, वरचे परतलेले साहित्य, चिंचेचे पाणी हे सर्व मिक्सरमधुन वाटुन घ्यावे. पाहिजे तेवढे पाणी घालुन सरबरित चटणी करावी. आता छोट्या कढल्यात तेल तापवुन मोहरी, हिंग, कढीपत्ता, २ सुक्या मिरच्यांचे तुकडे ह्याची खमंग फोडणी करुन चटणीवर घालावी व सर्व मिक्स करावे. ही चटणी दोन्-तीन दिवस छान टिकते.
|
Samira
| |
| Monday, March 26, 2007 - 3:59 am: |
| 
|
Mi aaj hi chutney keli hoti. khup mast zali hoti. thanks to u and maayboli
|
Madhura
| |
| Monday, March 26, 2007 - 10:38 pm: |
| 
|
चिकु, मी सुद्धा ही चटणी try केली. मस्तच होते. thanks!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|