|
Moodi
| |
| Monday, February 13, 2006 - 9:22 am: |
| 
|
फिरनी. साहित्य : २ चमचे बासमती तांदुळ, २ चमचे काजु, १ लिटर दुध, अर्धी वाटी साखर, थोडा गुलाब इसेन्स, भिजवलेले ७ ते ८ बदाम, ८ ते १० पिस्ते. कृती : बासमती तांदुळ धुवुन कोरडे करावेत. थोडे भाजुन त्याची काजुबरोबरच मिक्सरमध्ये वाटुन पुड करावी. आधी मोठा चमचाभर थंड दुधात ती नीट कालवुन सर्व दुधात मिक्स करावी. व दुध शिजायला ठेवावे. शिजत असताना मधुन मधुन सारखे ढवळावे. ते दाट होवु लागले की साखर घालावी. अन थोडी परत आटवावी. मग साखर पूर्ण विरघळुन खीर दाट झाली की उतरवावी. मग त्यात गुलाब इसेन्स घालावा. किंवा वेलदोडा पुड पण चालेल. भिजवले बदाम अन पिस्ते वेफर्सच्या किसणीवर घासुन त्याचे पातळ काप करुन घ्यावेत. छोट्या छोट्या बाउलमध्ये फिरनी घालावी अन वर बदाम पिस्त्याचे काप पसरावेत. सर्व्ह करताना एकेक सुगंधी गुलाबाची पाकळी वर टाकावी. वाटल्यास ही फिरनी शिजवुन रुम टेंपरेचरला आली की थोडा वेळ फ्रिझमध्ये ठेवावी.
|
Veenah
| |
| Monday, February 13, 2006 - 10:12 am: |
| 
|
मुडी परवा टिव्ही वर फिरनी चे demo. झाले त्यात तांदळाची पेस्ट, खवा, वैगेरे घालून मातीच्या छोट्या भांड्यात सर्व्ह करायचे दाखवत होते पण मी व्यवस्थित नाही पाहु शकले पण ते पाहुन खूप interesting recipe वाटली. म्हणुन म्हटले इथे दिनेश नक्की सांगु शकतील. तुला पण मनापासुन ...
|
Dineshvs
| |
| Monday, February 13, 2006 - 5:26 pm: |
| 
|
बरोबरच आहे कि कृति, फ़क्त तांदुळ आणि काजु वेगवेगळे वाटावे. दोन्ही बारिक चाळणीने चाळुन घ्यावे, म्हणजे शिजल्यावर कण लागत नाहीत. काजु नको असतील तर थोडा खवा घालावा. ज्या भांड्यात फ़िरनी ठेवतात ते पसरट पणतीसारखे असते, त्याला शिकोरा म्हणतात. मला स्वताला यात केवडा ईसेन्स आवडतो. बाहेरहि ती सेट होते, पण फ़्रीजमधे ठेवली तर जास्त मजा येते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|