|
Dineshvs
| |
| Sunday, February 12, 2006 - 4:32 pm: |
| 
|
प्रकार १ अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी ऊडदाची डाळ तेलात खमंग भाजुन घ्यावी. त्यातच दहा बारा सुक्या मिरच्या परतुन घ्याव्यात. मग हे भरड वाटावे. आयत्यावेळी त्यात दहि घालावे व वरुन हिंग, जिरे व कडीपत्ता यांची फ़ोडणी द्यावी. मी यात लसुण पण घालतो. मुळगा पुडी एक वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी ऊडदाची डाळ व पव वाटी तुरीची डाळ, दोन चमचे तांदुळ सगळे अगदी थोड्या तेलात भाजुन घ्यावे. चमचाभर मिरीदाणे, थोडा कडीपत्ता, १५ ते २० लाल मिरच्या, हेहि परतुन घ्यावे.थोडा हिंग व हळदहि परतावी, मग हे सगळे भरड वाटावे. कोरडी पुड बाटलीत भरुन ठेवावी. आयत्यावेळी त्यात तेल व मीठ घालावे. किंवा चिंचेचा कोळ व मीठ घालावे. ईडलीवर तेल लावुन नुसती शिवरली तरी चालते, डोश्यावर पण अशीच पसरावी.
|
Supermom
| |
| Wednesday, February 15, 2006 - 7:10 pm: |
| 
|
दिनेश, खूप खूप धन्यवाद. किती दिवसांपासून हवी होती ही रेसिपी. मला वाटते की मी म्हणत होते ती पहिली रेसिपी. पण मुळगापुडी सुद्धा हवीच होती. परत एकदा धन्यवाद.
|
Chiku
| |
| Monday, August 14, 2006 - 8:42 pm: |
| 
|
मी इडलीची डोश्याची चटणी अशी करते १ नारळ खवुन, १ वाटी चण्याची डाळ, ( South Indian चटणीत उडिद डाळ वापरतात) ४-५ तास भिजत घालावी, १ हिरवी मिरची, पाव वाटी चिंच कोळुन त्याचे पाणी, पाउण वाटी कढिपत्त्याची पाने, ४ चमचे उडिद दाळ, ४ सुक्या लाल मिरच्या, मीठ. वरील साहित्यातील अर्धी कढिपत्त्याची पाने, उडिद डाळ, २ सुक्या मिर्चीचे तुकडे थोड्या तेलावर डाळ लाल होईपर्यंत परतुन घ्यावे व थंड होऊ द्यावे. नारळ, चण्याची डाळ, १ हिरवी मिरची, मीठ, वरचे परतलेले साहित्य, चिंचेचे पाणी हे सर्व मिक्सरमधुन वाटुन घ्यावे. पाहिजे तेवढे पाणी घालुन सरबरित चटणी करावी. आता छोट्या कढल्यात तेल तापवुन मोहरी, हिंग, कढीपत्ता, २ सुक्या मिरच्यांचे तुकडे ह्याची खमंग फोडणी करुन चटणीवर घालावी व सर्व मिक्स करावे. ही चटणी दोन्-तीन दिवस छान टिकते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|