|
Bhagya
| |
| Wednesday, October 12, 2005 - 12:49 am: |
| 
|
घोळीची ताकातली भाजी साहित्य १ मोठी जुडी ताजी घोळ ३ ते ४ लसूण पाकळ्या ३ सुक्या लाल मिरच्या ३ वाट्या आंबट ताक २ ते ३ मोठे चमचे डाळीचे पीठ फोडणीचे साहित्य घोळ स्वच्छ धुवून चिरून घ्या. लोखंडी कढईत फोडणी करा. तेलात मोहरी, हिंग, हळद आणि जीरे घाला. लसूण ठेचून टाका, खरपूस करा, मिरच्या टाका. त्यावर घोळ टाका आणि शिजू द्या. ताकात डाळीचे पीठ मिसळा आणि कढईत टाका. मीठ टाका आणि चांगली उकळी येउ द्या. पातळ हवी असल्यास पाणी मिसळा आणी उकळा. गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खा.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|