|
Supermom
| |
| Monday, December 19, 2005 - 11:28 pm: |
|
|
हा अजून एक विदर्भात आवडीने खाल्ला जाणारा प्रकार. काकडीची पीठभाजी हा प्रकार तसा झुणक्यासारखाच पण खूप वेगळा आणि छान लागतो. आधी बेसन खमंग भाजून वेगळे ठेवावे. दोन मोठ्या काकड्या किसाव्यात. यासाठी खमग काकडीसाठी घेतली जाणारी लहान पिवळी काकडी नको. मोठी जाडसर मिळते ती घ्यावी. साले काढून किसाव्यात. चाॅपर मधून बारीक केल्या तरी चालेल. पाणी पिळू नये. मग भरपूर तेलाची मोहरी हिन्ग हळद व हिरव्या मिरचीचे तुकडे घालून फ़ोडणी करावी.त्यात हा कीस घालावा.मीठ घालावे.झाकण ठेवावे. थोडी वाफ़ आली की बेसन हळूहळू ढवळत घालावे.पुन्हा झाकण ठेवून चांगली वाफ़ काढावी. (फ़ोडणीत मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे कमीजास्त टाकाव्यात.) लसणीचे तिखट, घट्ट दही, ही पीठभाजी आणि भाकरी. एकदम मस्त मेनू.
|
यालाच काकडीचा कोर्डा असे म्हणतात ना? मस्त लागतो.माझ्या सासूबाई यात फ़ोडणीमधे लसूण पण घालतात. छान लागते तेही. शिवाय वरून घालायला हिन्गाचे तेल हवेच यावर!
|
Varshac
| |
| Monday, May 01, 2006 - 3:43 pm: |
|
|
I tried this recipe. It was too good. Thanks.
|
Sunidhee
| |
| Friday, October 05, 2007 - 9:37 pm: |
|
|
supermom मी तु वर लिहीलेली भाजी नेहमी करते. मला तर प्रचंड आवडतेच पण माझी मुलगी देखील मुटुमुटू खाते पोळीबरोबर. जर कोणी मूल नीट खात नसेल तर गरम पोळीवर भरपूर तूप टाकून, ह्या भाजीबरोबर देउन पहा. गुमान खाईल. thank you SM
|
Gajanan1
| |
| Thursday, October 30, 2008 - 7:15 am: |
|
|
मी ही भाजी आज केली... पण काल गडबडीत वाचताना बेसन भाजून घ्यायचे हे वाचले गेले नाही.. पीठ लाऊनच भाजी केली छान झाली आहे. MY NEW ID JAGOMOHANPYARE
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|