|
Moodi
| |
| Wednesday, February 08, 2006 - 2:01 pm: |
| 
|
पेरुची जेली. साहित्य : अर्धा किलो चांगले पिकलेले पण न डागाळलेले पेरु, पाऊणपट साखर, एक चतुर्थांश सायट्रीक ऍसिड, एक चतुर्थांश टीस्पुन हिरवा कलर. कृती : पेरु धुवुन कोरडे करा. व सोलुन बारीक फोडी करा. नंतर या फोडी बुडतील एवढे पाणी व २ ते ३ थेंब सायट्रीक ऍसिड घालुन एका जाड बुडाच्या भांड्यात हे उकळत ठेवा. मिश्रण चांगले शिजवा. हे मिश्रण दुधाळ अन बुळबुळीत दिसेल. मग शिजल्यावर खाली उतरवुन मलमलच्या कापडावरुन दुसर्या स्वच्छ कोरड्या भांड्यात गाळा. खाली कपड्यावर स्वच्छ गाळ रहायला हवा. नंतर हा कापडावरचा चोथा परत थोड्या गरम पाण्यात घाला अन शिजवा. नंतर परत त्या कापडावर गाळा. मग भांड्यातील सर्व रस मोजुन घ्या अन त्या रसाच्या पाऊण पट साखर अन उरलेले सायट्रीक ऍसिड घालुन घालुन तो रस शिजायला ठेवा. चमच्याने सतत ढवळत रहा. फेस आला की तो चमच्याने काढुन टाका. रस चांगला शिजला की रंग घाला. जेली तयार होईल. जेली पूर्ण झालीय हे बघायला मिश्रणात फोर्क / काटा बुडवा अन वर उचला. फोर्कच्या फटीत मिश्रण चिकटलेले दिसले की जेली झालीय हे समजा. ही जेली गरम असतानाच एका पसरट बाऊलमध्ये ओतुन ठेवा. एका हाताने सूरीचे पाते बाऊलमध्ये उभे धरुन दुसर्या हाताने जेली त्यात ओता म्हणजे जेलीत हवेचे बुडबुडे रहाणार नाही. मग थंड झाली की फ्रिझमध्ये झाकुन ठेवा. फ्रुट सॅलेडमध्ये ही जेली वापरु शकता.
|
Dineshvs
| |
| Thursday, February 09, 2006 - 1:24 am: |
| 
|
मूडि फ़क्त एक छोटी सुचना, यात एखादा कच्चा पेरु घ्यायचा. त्यात जास्त पेक्टिन असल्याने, जेली लवकर सेट होते. पण हि जेली घरीच करावी लागते, मला नाहि वाटत बाजारात पेरुच्या स्वादाची जेली मिळत असेल म्हणुन.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|