|
Bittu
| |
| Thursday, March 09, 2006 - 12:05 am: |
| 
|
प्राजक्ता, मी केली होती ही भाजी. द्राक्षामुळे गोडसर चव येते तिला. मसालेदार नको असेल तर काळा मसाला जरा कमी घाल. पण खूप छान होते अगं, पार्टीसाठी परफेक्ट आहे. दिनेश, खूपच चांगली रेसिपी दिलीत.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 09, 2006 - 4:10 pm: |
| 
|
रुपाली कोथिंबीर सिलांट्रो नावाने मिळेल तिथे. रताळं नाही मिळाले तर भोपळा मिळेलच. काळा मसाला नाही मिळणार पण गरम मसाला मिळेल. आणि द्राक्ष तर म्हणे तिथे, अक्षरश : पायदळी तुडवतात. खरं कि काय ?
|
Chingutai
| |
| Saturday, March 11, 2006 - 4:41 am: |
| 
|
दिनेश तुमची रेसिपी सुपर्-डुपर हिट! वीकेन्ड ला केली. केवळ महान!!!
|
Pendhya
| |
| Saturday, March 11, 2006 - 5:06 am: |
| 
|
दिनेश, Finally ही भाजी करण्याचा योग आला. मी सरसों च्या तेलातले पदार्थ खाऊन बघितले आहेत. पण मला ते फ़ारसं आवडत नाही, म्हणुन कनोला तेलातच केली, पण सगळ्यांना आवडली. कोथिंबीर, भाजी शिजतांनाच घातली असल्याने छान वास आला. एक वेगळाच प्रकार, जो सगळ्यांना आवडला. धन्यवाद. तुमच्या मुळे, माझे ही थोडे कौतुक झाले.
|
Asira
| |
| Thursday, April 13, 2006 - 6:12 pm: |
| 
|
दिनेश, भाजी केली. सही झाली होती. माझा नवरा सान्गत होता की MP मधे द्राक्ष पनीर आणि द्राक्ष चिकन असे करतात.त्या रेसिपीस माहिती आहेत काय कोणाला
|
Bage
| |
| Thursday, April 27, 2006 - 6:17 pm: |
| 
|
दिनेश, भाजी करुन बघीतली आप्रतीम झाली. thanks तुमच्या recipes नेहमी वेगळ्या आणि छान असतात.
|
Sonchafa
| |
| Thursday, May 04, 2006 - 3:23 pm: |
| 
|
शेवटी योग आला ही भाजी बनविण्याcआ!बियांवाली काळी द्राक्शे बिया काढून, बटाटे सोलुन सूर्यफ़ूल तेलाच्या फ़ोडणीत घातले. काळा मसाला, मीठ, थोडी साखर. कांदा, टोमॅटो अणि इतर काय काय घालायcअ ते विसरले होते त्यामुळे एवढच आठवले ते साहित्य वापरले. पण तरीही छान लागली अवीला
|
Anilbhai
| |
| Thursday, May 04, 2006 - 3:44 pm: |
| 
|
पण तरीही छान लागली अवीला >> अवी कोण?
|
Milindaa
| |
| Thursday, May 04, 2006 - 3:58 pm: |
| 
|
च काढायला ch वापरा
|
Dineshvs
| |
| Thursday, May 04, 2006 - 4:51 pm: |
| 
|
रुपाली, तुझी कालच आठवण काढली होती. कुणालातरी भाषांतरकार हवे होते ईथे.
|
Prachi_b
| |
| Thursday, May 11, 2006 - 2:49 am: |
| 
|
दिनेश, "बटाट्या बरोबर शिंगाडे म्हणजे चेसनट्स घालता येतील. " हे तुमचं वाक्य वाचलं. काय सांगता? खर कि काय शिंगाडे म्हणजे चेस्टनट्स ते लंडन मधे भाजून मिळतात तेच का ते?? भारतात नाही का मिळत तसे ओले मी फ़क्त वाळवलेलेच पाहिले आहेत. कधी खाऊन पाहिले नाहीत. प्लिज कोणाला अधिक माहिती असेल तर द्या.
|
Bee
| |
| Thursday, May 11, 2006 - 6:05 am: |
| 
|
शिंगाडे हे त्रिकोणी आकाराचे असतात. रंगाने काळेभोर असतात. दुरून बघितले तर वाटेल दगडी कोळसा असेल. बाजारात शिंगाडे विकत मिळतात. ते वरून जरी कोरडेसे वाटत असले तरी आतून शुष्क ओलसर असतात. शिंगाड्याचे पिठ बाजारात विकत मिळते नि ते पोष्टीक असते.
|
Sonchafa
| |
| Thursday, May 11, 2006 - 2:33 pm: |
| 
|
काय हो अनिलभाई चेष्टा करता? वाटलच होते कोणीतरी ही शंका काढणार म्हणून.. मिलिंदा, अरे एका ठिकाणी नुसते c लिहून सुद्ध च दिसत होता आणि दुसरीकडे c च काय पण ch लिहूनही दिसत नव्हता.. वेळ थोडा होता म्हणून शेवटी नाद सोडला आणि तसाच मेसेज पोस्ट केला.. असो हो दिनेश मेल आली मला त्यांची
|
Dineshvs
| |
| Thursday, May 11, 2006 - 3:29 pm: |
| 
|
प्राची, बी म्हणतोय ते वॉटर चेस्टनट्स. ते तळ्यात होतात. कच्चे तसेच ऊकडलेले अश्या दोन्ही प्रकारात ते मिळतात. मुंबईला वसई भागातल्या तळ्यात ते होतात. त्यातला गर सुकवलेला बाजारात मिळतो.ते तिकडे टिनमधे मिळु शकतील. तु म्हणतेस ते साधे चेस्टनट्स. ते भाजुन मिळतात. चॉकलेटी रंगाचे लांबट असतात, भाजल्यावर फणसाच्या बियासारखे लागतात. दोन्हीपैकी कुठलेहि या भाजीत चालतील.
|
Garva
| |
| Thursday, May 11, 2006 - 6:09 pm: |
| 
|
Dinesh, celery badam karayla ajun tari jamle nahi,pan soup chaan zhala!.... ya post ver...ya bhaji chi itki ka tarif hotay, yache uttar pahije hote... uttar midale...kaalch.. agdi...ultimate,fantastic....all in all..'mahol'bhaji zhali hoti..thnx.
|
Manuswini
| |
| Wednesday, February 21, 2007 - 7:33 pm: |
| 
|
दिनेश, तुमच्या ह्या भाजि कडे आता लक्ष गेले. खुप सुपर डुपर हीट दिसते. पण एक प्रश्ण, मला उगाच भरपुर सरसोंका तेल आणुन ठेवायचे नाही. कारण मला सहसा त्याचा वास आवडत नाही, शिवाय ते फुकट सुद्धा जाणार, तर तिळाचे तेल वापरु का? तीळ नी शेंगदाणा तेल चालेल?
|
Prady
| |
| Wednesday, February 21, 2007 - 9:51 pm: |
| 
|
मनू अगं मी साध्याच तेलात केली होती ही भाजी. माझ्याकडे मी कनोला आणते. तशीही सुरेख होते ही भाजी.
|
Manuswini
| |
| Wednesday, February 21, 2007 - 9:58 pm: |
| 
|
prady, thanks गं एकदम पटकन reply दिलास म्हणुन. करुन पाहते.
|
Savani
| |
| Thursday, March 15, 2007 - 12:52 pm: |
| 
|
दिनेशदा, मला शनिवारी एक पार्टीसाठी ही भाजी करून न्यायची आहे. साधारण ४० लोकांसाठी. मला जरा प्रमाण सांगता का प्लीज. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे तर काही स्पेशल टीप्स आहेत का?
|
Dineshvs
| |
| Thursday, March 15, 2007 - 1:17 pm: |
| 
|
४० जणांसाठी प्रत्येकी १०० ग्रॅम बटाटे म्हणजे ४ किलो बटाटे लागतील, त्या प्रमाणात बाकिचे साहित्य घ्यायचे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर करायची तर दोन चार भांड्यात विभागुन करावी. बटाटे एकाच आकाराचे असावेत, म्हणजे सगळे बटाटे एकदम शिजतात.
|
Savani
| |
| Thursday, March 15, 2007 - 1:46 pm: |
| 
|
दिनेशदा, धन्यवाद. इतक्या लगेच उत्तर दिल्याबद्दल.
|
Savani
| |
| Thursday, March 22, 2007 - 12:43 pm: |
| 
|
दिनेशदा, २-३ दिवस इकडे यायला जमलं नाही त्यामुळे सांगायचं राहिलं की त्या दिवशी पार्टीला भाजी सुपरहिट ठरली. धन्यवाद! इतकी छान रेसिपी सगळ्यांबरोबर शेअर केल्याबद्दल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|