|
Arch
| |
| Thursday, January 26, 2006 - 10:47 pm: |
|
|
ही दाण्याच्या चिक्कीची Microwave मधे करायची recipe आहे. दाण्या ऐवजी काजू किंवा बदाम किंवा पिस्ता वापरला तरी चालेल. ह्याच मापाने दाण्यच्या ऐवजी भाजलेले तीळ आणि दाण्याचा कूट वापरला तर तिळगूळपण छान होतो. बघा try करून. १ कप साखर अर्धा कप corn syrup १ कप भाजलेले दाणे किंवा दाण्याचा कूट १ चमचा बटर, छोटे तुकडे करून १ चमचा बेकिंग सोडा 1. एका 1 1/2 quart च्या microwave मध्ये चालणार्या casserole मध्ये साखर आणि corn syrup मिसळून high वर microwave मध्ये ४ मिनिट ठेवा. 2. मग बाहे काढून ढवळून त्यात भाजलेले दाणे टाकून ढवळून casserole परत microwave मध्ये high वर ४ मिनिट ठेवा. 3. मग बाहे काढून त्यात butter मिसळा आणि व्यवस्थीत ढवळून परत दोन मिनिट ठेवा. 4. मग बेकिंग सोडा घालून हळूवारपणे ते मिश्रण light & foamy होईपर्यंत ढवळा. आता तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओता आणि base ला तूप लावलेल्या वाटिच्या सहाय्याने तुम्हाला जेवढा thickness हवा त्याप्रमाणे ट्रेमध्ये पसरा. लगेच सुरीने कापा. पूर्णपणे कापता नाही आले तरी चिरा करून ठेवा. आणि गार झाल्यावर तुकडे करा. फ़ार छान चिक्की होते. दुसर्या आणि तिसर्या steps ला microwave समोर उभ राहून लक्ष ठेवा कारण त्याची वेळ microwave च्या power वर अवलंबून आहे. माझ्या सध्याच्या microwave साठी मला दुसर्या step ला अडिच ते तीन मिनिटे पुरतात. आधिच्याला चार मिनिट लागायची. मी नेहेमी लक्ष ठेऊन आधीच काढते. एकदा लक्षात आल की अगदी सोप्पी वाटेल कृति. Microwave वर लक्ष ठेवायच कारण कुठच्याही step ला brown दिसता कामा नये. दिसायला लागल तर लगेच बाहेर काढून मिश्रण ढवळून पुढची step सुरु करायची.
|
Moodi
| |
| Friday, January 27, 2006 - 12:19 pm: |
|
|
आर्च thanks ग. मी मिश्र चिक्की करायचा विचार करतेय, या दाण्यातच काजू अन बदाम तुकडे टाकुन बघते. सुपरमार्केटला स्ट्रॉबेरीचे सुकवलेले तुकडे मिळतात बघ. एकदा अशी चिक्की करायची अन मग दुसर्या पद्धतीत ते तुकडे वापरायचे. मी ते केकसाठी आणलेत. अर्धे यात अन अर्धे केकमध्ये वापरते आता.
|
Arch
| |
| Friday, January 27, 2006 - 4:36 pm: |
|
|
मूडी, मी कधी ते Candid fruit pieces वापरले नाहीत चिक्कित. पण बघ ते करपून वगैरे जातील Microwave च्या high power ने. एखादवेळेस अगदी शेवट चालतील. पण try करायला हवा. May be अशाच नव्या recipes येत असतील. चिक्कित गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या बघितल आहे. आणि हो सांगायच राहिल मी चिक्किला rose essence वापरते. वरच्या प्रमाणाला साधारण १ छोटा चमचा.
|
Seema_
| |
| Friday, January 27, 2006 - 8:30 pm: |
|
|
कोकणात जे काजुचे लाडु मिळतात लांजा side ला तस होत का हे. मला आवडतात ते लाडु फ़ार. चालेल का लाडु सारख केल तर?
|
Arch
| |
| Friday, January 27, 2006 - 8:49 pm: |
|
|
मला काजुचे लाडू माहित नाहीत. ही बाजारात मिळते अगदी तशी चिक्की होते.
|
Dineshvs
| |
| Saturday, January 28, 2006 - 5:32 pm: |
|
|
न चालायला काय झाले लाडु केले तर? एक गम्मत म्हणुन सांगतो, मुंबईत मेड ईन उल्हासनगर असे नकली काजु मिळतात. शेंगदाण्याच्या पिठापासुन करतात ते, साचा वैगरे वापरुन.
|
Moodi
| |
| Monday, January 30, 2006 - 1:40 pm: |
|
|
आर्च मला कॉर्न सिरप नाही मिळाले, मेपल सिरप आहे मार्केटमध्ये. ते चालेल का? कॉर्न म्हणजे मक्याचे की त्यालाच मेपल पण म्हणतात? नाहीतर मला मोठ्या मार्केटमध्ये या पुढच्या शनीवारी बघावे लागेल.
|
Arch
| |
| Monday, January 30, 2006 - 2:56 pm: |
|
|
मूडी नाही अग corn syrup च हव.
|
Moodi
| |
| Monday, January 30, 2006 - 3:39 pm: |
|
|
ठीक आहे आर्च, आता छोट्या मार्केटमध्ये आले असेल तर बघते. काल नव्हते.
|
Moodi
| |
| Tuesday, January 31, 2006 - 7:52 pm: |
|
|
आर्च काल मी आमच्या इथल्या सेन्सबरी मार्केट मध्ये गेले अन तिथे शोधल कॉर्न सिरप मग मिळले नाही म्हणुन विचारले तर ती मॅनेजर म्हणाली की तिने हे नाव आयुष्यात पहिल्यांदा ऐकले. मला मजा वाटली. नंतर आणखी २ दुकाने बघीतली, तिथेही नाही मिळाले. आता फक्त दुसरे सेफवे नावाचे मोठे मार्केट राहिलेय तिथे बघेन या शनिवारी. नाहीतर वॉलमार्केटची ASDA नावाने एक branch आहे तिथे बघेन.
|
Anaghang
| |
| Thursday, July 06, 2006 - 11:41 am: |
|
|
मला उपासचे नविन वेग्ळे पदार्थ हवे आहेत! उदा.काकडीचे,सुरणाचे,इ.. तसेच माझी एक शंका आहे,आपल्याकडे उपासाला वेगवेगळ्या भाज्या वापरतात,उदा. काकडी,सुरण,अळु,लाल भोपळा,अरबी,आले,कोथिबीर इ.मग दुधी भोपळा,पडवळ,बीट,मुळा, इ. का नाही वापरत??? तसेच तेल व तुपाचाहि गोंधळ आहेच???? कोणी सांगु शकेल का????
|
अनघा!इथे जा बरं भरपुर रेसिपी सापडतिल तुला.. आणी हो!तुझी शंकाही तिथेच विचार. /hitguj/messages/103383/94272.html?1147971304
|
Hi Moodi, Jar tujhya kade corn syrup nasel tar, khaalil kruti karoon paha. Americet corn syrup milalylach hava.... mi try karat aahe arc chi reciepe... if you do not have Corn syrup try following for 1 cup corn syrup 1 cup sugar plus ¼ cup milk or water. Dark can be substituted for light, but there may be flavour differences
|
Moodi
| |
| Wednesday, August 09, 2006 - 11:53 am: |
|
|
रुपाली नाही गं. मी अमेरीकेत नाही uk मध्ये आहे. इथे सुपरमार्केट मधल्या बाईने मला विचारले की हे काय अन कसे असते( दूरवर चक्क भारतात मिळते पण युरोपात नाही ह्याचेच आश्चर्य वाटले मला, कारण मका हेच लोक जास्त खातात.) आता भारतात जाईन तेव्हा तिथुनच घेऊन येईन, कारण तिथे कुठे पण मिळू शकेल.
|
Arch
| |
| Wednesday, August 09, 2006 - 12:30 pm: |
|
|
रुपाली, चिक्कितला चमचा म्हणजे teaspoon आहे.
|
टीस्पून का? मला वाटलच होत...
|
मूडी मला पण बघाव लागेल शोधून इथे ऑस्त्रेलियात... नाहि मिळाल तर मग करा आपला कारभार
|
अग मूडी सापडला कॉर्न सीरप मला, हेल्थ फ़ूड च्या शॉप मधे बघ, तिथेच मिळाला मला, लन्च ब्रेक मधे मॉल मधे भटकत असताना!
|
आर्च ट्राय केलि मि चिक्कि..एकदम झकास झालि होति...जास्तिचि खबरदारि म्हनून मि २ मिनिट च वापरलि प्रत्येक स्टेप ला... त्यात आमच्या पतिदेवना कूठून सुबूद्धि सुचलि देव जानो त्यानि त्यान्च बोट घातल त्या गरम गरम उकळत्या पाकात आनि चान्गलच भाजुन घेतल.... हा मोठा फ़ोड आला होता.... पण एकदम मस्त झालि चिक्कि, पूढच्या वेळेस काजु चि चिक्कि बनवनार आहे.... रेसिपि शेअर केल्या बद्दल धन्यवाद..... रूपाली
|
Saket
| |
| Monday, September 25, 2006 - 4:31 pm: |
|
|
आर्च, तुझ्या पद्धतीने दाण्याची चिक्की केली होती, फक्त मी मिक्स नट्स घेतले. छान झाली आहे. रेसिपीबद्दल थॅन्क्स.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|