|
Maanus
| |
| Tuesday, January 24, 2006 - 8:03 pm: |
|
|
वाढणी:२ पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे पाककृतीचे जिन्नस १ वाटी तांदुळ ४ वाटी पाणी क्रमवार मार्गदर्शन: हा भाताचा प्रकार मी नुकताच शिकलो. कुकर किंवा microwave पेक्षा ह्या प्रकाराने भात चांगला व पटकन होतो. - तांदूळ धुऊन घ्या. - एका भांड्यात, जमलेच तर कुकर मध्ये पाणी उकळायला ठेवा, भांड्यावर झाकण ठेवा म्हणजे पाणी लवकर उकळेल. - पाणी चांगले उकळले की त्यात तांदूळ टाका, व परत झाकण ठेवा - साधारण ५ मिनिटे चांगल्या मोठ्या गॅस वर तांदूळ उकळू द्या - तांदूळ शिजले असे वाटले की लगेच गॅस बंद करा व एका चाळनीतुन तो भात निथळून घ्या, म्हणजे त्यातले सर्व पाणी काढून टाका. - चाळनीतच त्याला ५ मिनीत झाकून ठेवा झाला एकदम मस्त मोकळा भात तयार. माहितीचा स्रोत: मधे गावी गेलो होतो तेव्हा १०० लोकांचा भात कसा करतात ते पाहीले, गावात ह्याला टोपलीतला भात म्हनतात.
|
Veenah
| |
| Wednesday, January 25, 2006 - 8:21 am: |
|
|
अजुन एक प्रकारे Steamed Rice करता येतो. आपण इडल्या उकड्ताना जशा steam करतो ना तसाच हा भात करावा. जर एक वाटी तांदूळ घेतले तर स्वच्छ धुवून कुकर च्या डब्यात घालून त्यात अडीच वाट्या पाणी घालावे व वीस मिनिटे तसेच भिजत ठेवावे. वीस मिनिटांनी कुकरची शिटी काढून त्या ऐवजी एक वाटी उपडी ठेवून इडली प्रमाणे घड्याळ बघून वीस मिनिटे हा भात वाफवावा. वाफ पडली की मऊ, मोकळा, सळसळीत भात तयार. अजीबात लक्ष द्यावे लागत नाही की ढवळावे लागत नाही. जरूर करून बघा बिघडायची भीती नाही!
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|