|
Dineshvs
| |
| Monday, January 23, 2006 - 3:41 pm: |
|
|
Doce De Grao गोव्यातील क्रिश्चनांच्या लग्नात रुखवत म्हणुन केला जाणारा हा पदार्थ. ईतर शुभ प्रसंगी पण केला जातो. विशेष म्हणजे तो शाकाहारी आहे आणि जमायला तितका अवघड नाही. चवीला मात्र खुपच छान लागतो. बर्यापैकी टिकाऊदेखील आहे. अनेकवेळा हा पदार्थ चाखून, तो पाठवणार्या मिसेस सोनिया गोन्सालवीस, याना मी हि कृति लिहुन द्यायचा आग्रह केला. तुला हवा तेंव्हा सांग करुन पाठवते, अश्या त्या म्हणत राहिल्या. शेवटी आज त्यांचा पिच्छाच पुरवला, आणि हि कृति तुमच्यापुढे ठेवतोय. पाव किलो चण्याची डाळ स्वच्छ धुवुन भिजत घालावी. शक्यतो रात्रभर भिजत घालावी. सकाळी परत स्वच्छ धुवुन भरपुर पाण्यत शिजत ठेवावी. अशी धुवुन घेतल्यामुळे शिजताना फ़ेस कमी येतो. ती शिजेस्तोवर एक नारळ फ़ोडुन खवणुन घ्यावा. फ़क्त पांढरे खोबरेच घ्यावे. हे खोबरे रगड्यात गंधासारखे वाटुन घ्यावे. पाणी घालु नये. डाळ मऊ शिजली कि पाणी काढुन पुर्ण निथळावी. ती देखील अगदी बारिक वाटुन घ्यावी. वाटलेली डाळ, खोबरे एकत्र करुन त्यात पाव किलो साखर घालावी. मिश्रण जरा मुरू द्यावे. मग जाड बुडाच्या मोठ्या पातेल्यात अगदी मंद आचेवर मिश्रण ठेवावे. सतत घाटत रहावे. लाकडी उलाथने घ्यावे. आधी तुप घालु नये. मिश्रणाचा गोळा जमुन कडा सोडु लागले कि एक चमचा साजुक तुप घालावे. वासाला वेलची व चिमुटभर मीठ घालावे. परत घाटुन झटपट तुप लावलेल्या ताटात ओतुन वार्यावर ठेवावे. वार्याने वरची साखर सुकुन तो भाग कडक होतो, व आत वडी मऊ राहते. याच्या वड्याहि कापता येतात. किंवा छोट्या वाडग्यात तसेच ठेवता येते. सुकले कि यावर फ़ुलांचे वैगरे छाप मारतात. आपल्याला नारळ जास्त वाटेल पण या प्रमाणातच त्याला अपेक्षित गोडवा येतो. हा पदार्थ अतिगोड नसतो, त्यामुळे तोंडाला मिठी बसत नाही, व हवा तेवढा खाता येतो.
|
Lalu
| |
| Monday, January 23, 2006 - 3:55 pm: |
|
|
हे जरा निनाव सारखं लागत असणार चवीला.
|
Sas
| |
| Monday, January 23, 2006 - 7:02 pm: |
|
|
छान वाटेय क्रुती, पुरण पोळी चि आठवण झाली.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|