|
Bee
| |
| Sunday, January 22, 2006 - 4:26 pm: |
| 
|
कुणाला जर ह्या विषयावर लिहिता आले तर उत्तम होईल. असे म्हणतात ज्या ऋतुत जे पिकत ते शरीराला पचत.
|
Meggi
| |
| Sunday, January 29, 2006 - 5:36 am: |
| 
|
मूडीताई, दिनेश तुमचं लक्ष गेलं नाहि का या BB वर?
|
Dineshvs
| |
| Sunday, January 29, 2006 - 5:01 pm: |
| 
|
खुप लिहिता येईल, पण एक लक्षात ठेवायचे, आपल्याकडचे सण आणि त्या सणाला केले जाणारे पदार्थ, या विचारातुनच योजलेले असतात.
|
Shonoo
| |
| Sunday, July 30, 2006 - 2:46 am: |
| 
|
बरेच दिवस जाईन जाईन म्हणत शेवटी आज नव्या घरा जवळच्या फ़ार्मर मार्केट मधे गेले. घरून जायच्या डिरेक्शन बघून ठेवल्या होत्या. पण लेकीच्या पोहोण्याच्या शिकवणी नंतर तिथूनच गेले तर दोन तीन यू टर्न करत पोचले एकदाची. या आधी फक्त मेन लाईन भागातल्या Lancaster County Farmers Market मधे जायचा अनुभव होता. तिथे जाणं म्हणजे पन्चवीस तीस वर्षांपूर्वी पार्ले टिळक ( किन्वा नू म वि ) मधल्या मुलीने sophia मधे जाण्या सारखा प्रकार. पण चांगले शॅड मासे, वेगवेगळ्या प्रकारचे चीझ, आणि एकदम authentic baklava and taramasolata मिळतात म्हणून वर्षाकाठी ३-४ वेळा जात असू. त्या मानाने हे फ़ार्मर मार्केट म्हणजे अगदीच छोटेखानी, घरगुती निघाले. एका ऑफ़ीस च्या पार्किन्ग लॉट मधे फ़्ली मार्केट ला लावतात तसले १०-१२ तम्बू होते. ४-६ जणांकडे भाजी पाला, फळे होती. एक Alexis Lemonade आणि कॉफ़ी चा स्टॅंड, २-३ जणांकडे organic meets and egss and cheese एक ब्रेड्बिस्कीट वाले, एक कुत्र्यांकरता organic Treats वाले अशी पाले होती. अगदी आज सकाळी काढलेली कणसं होती. ती घेतली डझनभर. एका आमिश माणसाकडून टोमॅटो, बीट आणि पातिचे कान्दे घेतले. कित्येक वर्षांनी मुळासकट चे पाती चे कान्दे विकत घेतले. तर माझी लेक लगेच उद्गारली What is that muddy stuff on the scallions? ABCD शोभते खरी! एकाकडे चेरी पण मिळाल्या. जुलै सम्पत आल- आता किती दिवस अजून मिळतील असा विचार करून लगेच दोन पाउंड चेरी पण घेवून टाकल्या घरी येई पर्यन्त दोघीन्ना कडकडून भूक लागली होती. आधी कणसं वाफ़वायला लावली आणी लेकीला विसळून काढली. मग कणीस खाता खाता टोमॅटो चिरले त्यावर थोडे मीठ, पार्मेजान चीझ, मिरपूड आणि थोडे ऑलिव्ह तेल शिम्पडले आणि country bread म्हणून रोल घेतले होते त्याबरोबर खाल्ले. तोवर चेरी जराश्या गार झाल्याच होत्या. डेकच्या पायर्यांवर बसून चेरी खाल्ल्या. बिया सगळ्या birdie ला खाण्यासाठी अंगणात भिरकावून दिल्यात.भात नाही पोळी नाही, डोसा किन्वा पराठा पण नाही, गेला बाजार PBJ सुद्धा नाही म्हटल्यावर लेकीने परत शन्का काढलीच की हे lunch आहे का snack ? सन्ध्याकाळी परत पातिचे कान्दे टोमॅटो आणि ऑलिव्ह तेल घालून कोशिम्बीर केली. बीटाचे दाक्षिणात्य कूटु केलं. ऋतु प्रमणे आहार ज़िन्दाबाद!
|
या ठिकाणी वर्षानुवर्षे कुणी मुम्बईकर फिरकलेला दिसत नाही.वास्तविक पाहता मुम्बईत महिन्यानुसार बाजारात विविध भाज्या आणि फळे उपलब्ध असतात.पण त्या विकत आणून वापरायचे कष्ट फार कमी लोक घेतात.
|
Maku
| |
| Monday, February 12, 2007 - 5:08 am: |
| 
|
मी विचारले पण कोनिच ans देत नाही. मी एकदा bee ला पण yoga चे विचारले होते पण त्याने सुद्धा ans दिले नाही. i think नवीन लोकांना तुम्ही ans देत नाही . मला खरेच वाईट वाट्ते सान्गायला maayboli site चांगली नहीये.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|