|
Dineshvs
| |
| Wednesday, October 05, 2005 - 2:52 pm: |
| 
|
पंजाबी फ़र्माईशी मछली अर्धा किलो कुठल्याहि माश्याचे तुकडे घेऊन त्याला कोरडे बेसन चोळावे व मग स्वच्छ धुवुन घ्यावे. मग अर्धा ईंच आले, थोडी कोथिंबीर आणि मीठ बारीक वाटुन माश्याच्या तुकड्याना चोळुन ठेवावे. मग परत धुवुन घ्यावे. अर्धा ईंच आले, एखादी लवंग, चार पाच वेलच्या, आणि चार चमचे धणे, दोन चमचे जिरे, व आठ दहा मिरीदाणे हे सगळे बारीक वाटुन माश्याला चोळावे. पॅनमधे तुप तापवुन त्यात ऊभे कापलेले दोन कांदे सोनेरी करुन काढुन ठेवावेत. त्याच तुपात मसाला लावलेले तुकडे तपकिरी रंगावर तळुन घ्यावेत. वर एका लिंबाचा रस, थोडेसे पाणी घालुन झाकुन ठेवावे. पाणी सुकले कि थोडी जायफ़ळ पुड शिवरावी. तळलेला कांदा घालावा आणि जरा परतावे. वरुन कोथिंबीर पेरावी.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|