Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कुर्ल्याचे सुके ...

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » मासे आणि इतर जलचर » कुर्ल्याचे सुके « Previous Next »

Veenah
Saturday, January 21, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुरल्या:
१.कुरल्या चिंबोरी खेकडे) नेहमी जिवंत घ्याव्यात.
२. साधारण अमावास्येच्या आसपास ह्या भरीव असतात म्हणजेच वजनाने जड व आत मांस जास्त असते.
३. वरच्या टणक कवच्याच्या आत केशरी लाख म्हणजे गाभोळी असेल तर ह्या चवीला जास्त चांगल्या लागतात.
४. कुरल्या नीट करताना त्याचे कवच काढून मधल्या भागचे २/२ तुकडे करावेत. मोठे डेंगे तसेच ठेऊन छोटे डेंगे ठेचून त्याचा रस काढून थोड्या पाण्यात शिजवून ते पाणि गाळून नंतर सुके करताना वापरावे.

साहित्य:
६/७ मोठ्या कुरल्या, २ मोठे कांदे, १ वाटी ओले खोबरे, ८/१० लसणीच्या पाकळ्या, २/३ लवंगा, छोटा दालचिनीचा तुकडा, ५/६ मिरे, १ चमचा धणे, बारीकसा जायफ़ळाचा तुकडा, थोडी खसखस, १ चमचा सण्डे/मालवणी मसाला, १ चमचा हळद, १ चमचा तिखट, चवी प्रमाणे मीठ, ५/६ आमसुले.
कृती:
कुरल्या साफ़ करून हळद, तिखट, मीठ लावून ठेवावे.
दोन कांद्या पैकी एक कांदा उभा पातळ चिरावा व दुसरा बारीक चिरावा.
कढईत २ चमचे तेल टाकुन लवंग, दालचिनी, जायफ़ळ, धणे, खसखस खमंग भाजुन घ्यावे. त्यातच उभा चिरलेला कान्दा ब्राऊन रंगावर भाजावा. मग खोबरेही तसेच भाजावे. खोबरे भाजताना लसूण पण जरा परतून घ्यावी. ह्यात संडे मसाला किंवा तयार मालवणी मसाला घालून सर्व एकत्र वाटून घ्यावे.
एका भांड्यात २ टेबलस्पून तेल टाकून त्यान बारीक चिरलेला कांदा परतून घेऊन त्यात कुरल्या,अख्खे डेंगे, डेंग्याचा रस, वाटण, व आमसुले घालून चांगले ढवळून ऊकळी आणावी व मंद विस्तवावर ८-१० मिनिटे शिजू द्यावे. लागल्यास थोडे गरम पाणी घालणे.



हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators