Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चिली गार्लिक पापलेट ...

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » मासे आणि इतर जलचर » मासे » पापलेट » चिली गार्लिक पापलेट « Previous Next »

Dineshvs
Tuesday, December 20, 2005 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिली गार्लिक पापलेट

दोन मोठ्या पापलेटांचे काटे काढुन तुकडे करावेत, त्याना मीठ, लिंबुरस व हळद चोळुन ठेवावे.
पाचसहा हिरव्या मिरच्या, दहाबारा लसुण पाकळ्या, व एक वाटी कोथिंबीर बारिक वाटावी. पाच सहा पातीचे कांदे व त्यांची पात वेगवेगळी चिरुन घ्यावी.
तेलाची हिंग घालुन फ़ोडणी करुन त्यात कांदा परतावा मग त्यात आलेलसुण वाटण परतावे. त्यात दोन चमचे टोमॅटो सॉस, २ चमचे सोया सॉस, दोन चमचे व्हीनीगर घालावे. व ऊकळु द्यावे. त्यात मासे व कांद्याची पात घालावी. मासा शिजला कि एक चमचा कॉर्नफ़्लोअर थोड्या पाण्यात मिसळुन घालावे. व ते शिजले कि ऊतरावे.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators