Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
माशाची भरली शहाळी ...

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » मासे आणि इतर जलचर » मासे » माशाची भरली शहाळी « Previous Next »

Dineshvs
Saturday, July 20, 2002 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घाना या देशातली पण जरा आपल्यासाठी वाकवलेली ही रेसिपी. पावसाळी सहलीसाठी उत्तम.

एक मलईचे शहाळे घ्या. ते नेहमीप्रमाणे फ़ोडून थोडे पाणी काढून घ्या. झाकण बाजूला ठेवा. मलाई अलगद हाताने काढून घ्या. वाटीभर करन्दी किन्वा कूठलाही बारीक मासा साफ़ करून घ्या. ताजे पकडलेले असल्यास छान. तिथे टुना घेतात. त्याला मीठ व घाटी मसाला चोळा. घाटी मसला नसल्यास. शेकोटीत कान्दा भाजून घ्या. लसूणही भाजून सोलून घ्या. कान्दा व लसूण बरीक चिरून घ्या व त्यात लाल तिखट मिसळा. थोडी कोथिम्बिर तेल व शहाळ्याची मलाई घाला. हे सर्व शहाळ्यात भरा. वर झाकण लावून मातीने सील करा. मग हे शहाळे शेकोटीत उभे ठेऊन भाजा. मासे तयार झाल्यावर खमन्ग वास येईल. हा प्रकार फ़्रेन्च बागेत म्हणजेच पावाबरोबर खातात. आपला लादी पाव शेकोटीवर वरच्यावर भाजून घेता येईल. तर ही भरली शहाळी एखाद्या सहलीत करून बघाच.


Dineshvs
Tuesday, July 23, 2002 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

varIla ËutIt iXajatanaaca ek kccaa TÜmaTÜ Takavaa iknvaa tyaar Jaalyaavar BarpUr ilambaU ipLavaa

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators