|
Veenah
| |
| Friday, January 20, 2006 - 10:34 am: |
| 
|
बान्गड्याची उडीदमेथी अर्धा किलो बान्गडे साधारण ३-४ येतात्) ते साफ़ करून त्याचे प्रत्यकी तीन तुकडे करून धुवून त्याला १ चमचा हळद, १ चमचा तिखट व मीठ लावून ठेवणे. लिम्बा एवढ्या चिन्चेचा कोळ काढून ठेवावा. उडीदमेथीच्या मसाल्यासाठी: १ टिस्पून उडदाची डाळ, १ टिस्पून तान्दूळ, १/२ टिस्पून मेथी दाणे, ६-७ मिरी दाणे, १ १/२ टिस्पून धणे, ६-७ सुक्य मिर्च्या, एक अगदी लहानसा कान्दा व अर्धा वाटी ओले खोबरे. हे जिन्नस थोड्यश्या तेलात ब्राऊन रन्गावर भाजुन घ्यावे. भाज्लेला मसाला, चिन्चेचा कोळ आणी पाऊण वाटी ओले खोबरे एकत्र मिक्सर मध्ये बारीक वाटावे. वाटताना पाणी घालून सरबरीत करावे. पाव वाटी खोबरेल तेल जाड बुडाच्या भान्ड्यात तापवून त्यात एक बारीक चिरलेल्या कान्द्याची फोडणी करावी. कान्दा गुलाबी झाला की त्यात वाटण ओतावे आणी बान्गड्याचे तुकडे घालून ऊकळी आणावी. ह्यात चव पाहून मीठ घालावे. ऊकळी आल्यावर मन्द विस्तवावर ३/४ मिनिटे ठेवावे. जास्त ऊकळू नये.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|