|
Supermom
| |
| Tuesday, January 17, 2006 - 9:09 pm: |
|
|
मी बीट च्या वड्या अशा करते दोन वाट्या बीट बारीक किसलेले व दोन वाट्या ओले खोबरे कीस यात एक वाटी साखर मिसळावी.साखर आवडीप्रमाणे जास्त चालेल पण बीट व खोबरे दोन्ही गोड असते तेव्हा चव घेऊन बघावी. हे मिश्रण कढई मधे घालून घट्ट होईपर्यन्त परतावे.मी तूप घालत नाही. बरेच परतावे लागते.मग घट्ट झाल्यावर तुपाचा हात लावलेल्या थाळीत थापून फ़्रीझमधे सेट होऊ द्यावे.वर काजूचे तुकडेही लावता येतील. रंग तर सुन्दर येतोच पण चवही छान लागते. माझी मावशी या वड्या फ़ार छान करते.
|
Moodi
| |
| Tuesday, January 17, 2006 - 9:33 pm: |
|
|
सेम ग सुपरमॉम! माझ्या आईने केल्या होत्या या वड्या एकदा, फारच मस्त लागतात. पण मला प्रमाण माहित नसल्याने मी लिहिल्या नाहीत. मनापासुन धन्यवाद ग
|
Supermom
| |
| Tuesday, January 17, 2006 - 10:08 pm: |
|
|
अग मूडी पहिल्या वेळी केल्या तेव्हा मिश्रण घट्ट व्हायला वेळ लागला खूप.मग परतायचा कंटाळा आला तेव्हा बीट चा हलवा म्हणून खपवला पदार्थ.
|
Psg
| |
| Wednesday, January 18, 2006 - 4:52 am: |
|
|
धन्यवाद SM . पण बीट उकडून घेऊ का कच्चा? आणि दूध नको अजिबात? तसेच तूप किती लागेल?
|
Supermom
| |
| Wednesday, January 18, 2006 - 1:53 pm: |
|
|
पी एस बीट कच्चाच घे. नंतर शिजतोच खूप वेळ. दुधाची गरज नाही. तूप फ़क्त थाळीला लावण्यापुरतेच हवे. साखर मात्र अंदाजाने आवडीप्रमाणे घे.मला खूपच कमी लागते.इतराना माझे प्रमाण अगोड लागू शकते.
|
Psg
| |
| Monday, January 23, 2006 - 4:52 am: |
|
|
SM केल्या काल बीटाच्या वड्या! छानच लागत आहेत ग.. मुलानी आवडीनी खाल्ल्या पण वडी जरा ओलसर राहीली.. खुटखुटीत नाही झाली.. पण 1st try ला छानच.. थॅंक्स ग..
|
Shmt
| |
| Thursday, September 21, 2006 - 8:09 pm: |
|
|
psg, तु ह्या वड्या प्रमाणात किति साखर घातलिस? जास्त घातलिस का? मलाही ह्या वड्या करुन बघाच्या आहेत. धन्यवाद
|
Psg
| |
| Friday, September 22, 2006 - 5:39 am: |
|
|
अनेक वेळा बीटाच्या वड्या करून हे प्रमाण निश्चित केले आहे: मी बीट आधी उकडून घेते. मग किसते. जितका बीटाचा कीस, तितकीच साखर आणि निम्य्याच्या थोडं कमी दूध पावडर/ नारळ- जे available असेल ते. उदा: २ वाट्या कीस आणि २ वाट्या साखर शिजवत ठेवायची मंद आचेवर. घट्ट होत आलं की पाऊण वाटी दूध पावडर/ नारळ. वेलदोडा पावडर चवीला. अगदी मस्त खुटखुटीत वड्या होतात shmt नक्की कर आणि सांग..
|
Shmt
| |
| Tuesday, September 26, 2006 - 8:12 pm: |
|
|
psg,काल मी ह्या वड्या केल्या, खूप छान झाल्या आहेत, खुटखुटित झाल्या आणि रंग पण छान दिसतो.
|
Psg
| |
| Wednesday, September 27, 2006 - 5:59 am: |
|
|
thanks for the feedback shmt प्रमाण तेच का काही फ़ेरफ़ार करावे लागले?
|
Shmt
| |
| Wednesday, September 27, 2006 - 7:27 pm: |
|
|
मी साखर थोडी कमी घातली मण्हजे दीड वाटी. बाकी सर्व तु सांगितलेल्या प्रमाणे
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|